'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न*
*'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न* *राज ठाकरे आणि रोहित शेट्टी यांची उपस्थिती* मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांची विशेष उपस्थिती होती. या दोन दिग्गजांच्या उपस्थितीने या ट्रेलर लॉन्च सोहळयाला चारचांद लागले. यावेळी त्यांनी ट्रेलरचे कौतुक करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. यापूर्वीच प्रदर्शित झालेल्या गाण्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता ट्रेलरने त्या उत्सुकतेत आणखीनच भर घातली आहे. ट्रेलरमध्ये ५ करोड रुपये आणि सोन्याच्या बिस्किटांसाठी चाललेली प्रचंड धावपळ आणि गोंधळ पाहायला मिळतोय. सगळ्यांचेच लक्ष त्या पाच करोड रुपयांवर आहे. मात्र या ५ करोड रुपयांचा खेळ कोण जिंकणार? हे प्रेक्षकांना १८ जुलैपासून चित्रपटगृहात समजणार आहे! राज ठाकरे यांनी चित्रपटाविष...