प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी’ चित्रपटाच्या प्रमोशनने पुणेकरांना अनुभवली सिनेमाची ताकद!
‘प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी’ चित्रपटाच्या प्रमोशनने पुणेकरांना अनुभवली सिनेमाची ताकद! पुणे, १० ऑक्टोबर २०२६ : ‘प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी’ या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त पुण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम, बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री वामिका गब्बी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या विशेष प्रमोशनमुळे पुण्यातील चित्रपटप्रेमींना कलाकारांना भेटण्याची आणि चित्रपटाविषयी जाणून घेण्याची संधी मिळाली. प्रभावी कथानक, दमदार अभिनय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची कहाणी मोठ्या पडद्यावर सादर करणाऱ्या या चित्रपटाच्या प्रमोशनमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुणे आणि हिंदी चित्रपटसृष्टी यांच्यातील नाते अधिक दृढ झाले. चित्रपटाची कथा अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हा प्रमोशनल उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. या कार्यक्रमाचे इव्हेंट आणि प्रमोशनचे संपूर्ण व्यवस्थापन फ्रीकआउट एंटरटेनमेंट यांच्या वतीने करण्यात आले. या संपूर्ण प्रमोशनल दौऱ्याचे नियोजन ...