Posts

Showing posts from May, 2024

या रविवारी, ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये येणार चंकी पांडे

Image
या रविवारी, ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये येणार चंकी पांडे   या रविवारी, चंकी पांडेच्या उपस्थितीत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा कॉमेडी शो प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे. आपल्या माकड चेष्टांनी या शोमधले कसलेले कलाकार सगळ्यांना खळखळून हसवतील. कुशल बद्रिके, गौरव दूबे आणि कावेरी प्रियम एक मस्त स्केच सादर करतील, ज्यात कुशल बद्रिके चंकी पांडेने उभी केलेली ‘आखरी पास्ता’ ही व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. यात तो एक कुक बनला आहे, जो किचनमधल्या गोष्टींना एक मसालेदार वळण देताना दिसेल! त्याचा हा अॅक्ट पाहून चंकी पांडे आणि ‘मॅडनेस की मालकीन’ हुमा कुरेशी त्याला स्टँडिंग ओव्हेशन देताना दिसतील.   आपल्या या आगामी गॅगविषयी बोलताना तूफान परफॉर्मर कुशल बद्रिके म्हणतो, “आखरी पास्ताची नक्कल करताना मी मनातून घाबरलो होतो कारण प्रत्यक्ष आखरी पास्ताच्या समोर मला ती नक्कल करायची होती. पण मला आनंद वाटतो, की चंकी पांडे जींना मी उभी केलेली त्यांची ही प्रसिद्ध व्यक्तिरेखा आवडली! गौरव दूबे आणि कावेरी प्रियम सोबत का

अक्षय्य हिंदू पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. १९ मे)* अक्षय्य हिंदू पुरस्कार समिती तर्फे आयोजन : काशी -अयोध्या -मथुरेसाठी न्यायालयीन लढाई लढणारे सुप्रसिद्ध वकील विष्णू जैन यांची उपस्थिती

Image
*अक्षय्य हिंदू पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. १९ मे)*  अक्षय्य हिंदू पुरस्कार समिती तर्फे आयोजन : काशी -अयोध्या -मथुरेसाठी न्यायालयीन लढाई लढणारे सुप्रसिद्ध वकील विष्णू जैन यांची उपस्थिती पुणे : हिंदू हितासाठी कार्य करणाऱ्या देशभरातील कार्यकर्त्यांना अक्षय्य हिंदू पुरस्कार समिती तर्फे 'अक्षय्य हिंदू पुरस्काराने' गौरविले जाते. यंदा हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दिनांक १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे होणार आहे. यावेळी काशी - अयोध्या- मथुरेसाठी न्यायालयीन लढाई लढणारे सुप्रसिद्ध वकील विष्णू जैन हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समितीचे तुषार दामगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला शेफाली वैद्य, सौरभ वीरकर, स्नेहल कुलकर्णी, रिषभ परदेशी, निलेश भिसे, चंद्रभूषण जोशी, सारिका वाघ, महेश पवळे, रुपेश कुलकर्णी, शिवानी गोखले आदी उपस्थित होते. यंदाचा मुख्य पुरस्कार ऋषिकेश सकनूर यांना हिंदू एकतेच्या कार्याकरिता, प्रभाकर सूर्यवंशी यांना व्याख्याते म्हणून, गुड्डी शिलू यांना जनजाती कल्याण कार्याकरिता आणि आचार्य के. आर. मनोज यांन

तांबे बिल्डिंग येथे राहणारा तरुण भारतीय जनता पार्टीचा कट्टर कार्यकर्ता श्री शंकर मिरगणे

Image
मूळचा बार्शी तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील परंतु सध्या कर्वेनगर येथील हिंगणे होम कॉलनी तांबे बिल्डिंग येथे राहणारा तरुण  भारतीय जनता पार्टीचा कट्टर कार्यकर्ता श्री शंकर मिरगणे याचे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावरील निस्सिम प्रेम व भक्ती त्याने त्याच्या टू व्हीलर थ्री व्हीलर व छातीवर टॅटू काढून दाखवण्याचा आगळावेगळा प्रयत्न केले

सामाजिक उपक्रमांच्या निधी उभारणीसाठी सीएसआर हेल्पलाईनचा शुभारंभ*

Image
*सामाजिक उपक्रमांच्या निधी उभारणीसाठी सीएसआर हेल्पलाईनचा शुभारंभ* *सोशल रिस्पॉन्सिबीलिटी समूहाचा नावीन्यपूर्ण उपक्रम  ; उद्योग समूह व सामाजिक उपक्रमांच्या सहकार्यासाठी सीएसआर हेल्पलाइनची निर्मिती व मोफत कार्यशाळेचे आयोजन* पुणे : सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण व्हावे, याउद्देशाने पुण्यात सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या पुढाकाराने सीएसआर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. अनेक सामाजिक संस्था उपक्रम राबवितात. मात्र, त्यांना निधीची कमतरता असते. त्यामुळे या कार्यशाळेद्वारे त्याबद्दल मार्गदर्शन व  निधी उभारणीसाठी सीएसआर हेल्पलाइनचा शुभारंभ देखील शनिवार, दिनांक १८ मे रोजी फर्ग्युसन महाविद्यालयातील सी ६ केमेस्ट्री हॉल येथे दुपारी ४ वाजता आयोजित कार्यशाळेत होणार आहे, अशी माहिती सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाचे संस्थापक अध्यक्ष विजय वरुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.   पत्रकार परिषदेला अनिल नाईक, चेतन मराठे, सागर पाटील, पौर्णिमा कुलकर्णी, सारिका साठे, आदी उपस्थित होते.   सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह, फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्

कला, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना 'ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया' 2024 पुरस्कार जाहीर*

Image
*कला, सामाजिक, सांस्कृतिक  क्षेत्रातील मान्यवरांना  'ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया' 2024  पुरस्कार जाहीर* *- लढताना अपंगत्व आलेले भारतीय लष्करातील जवान सदाशिव घाडगे यांना विशेष पुरस्कार*  *- समीर चौघुले, हार्दिक जोशी, हर्षद अत्तकरी, सुरूची अडारकर - रानडे, चिन्मय उदगीरकर, योगेश शिरसाट, मिलिंद शिंत्रे,आरजे संग्राम यांचा होणार सन्मान*  पुणे : कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने ' ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया' या पुरस्काराने  विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येतो. या  पुरस्कार सोहळ्याचे यंदा पाचवे वर्ष आहे. यामध्ये चित्रपट सृष्टीसह फॅशन, बिजनेस, डॉक्टर,पत्रकार, समाजकार्य  अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना यंदा  पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. दरवर्षी प्रमाणे या पुरस्काराच्या माध्यमातून जमा होणारा निधी सामाजिक उपक्रमांसाठी वापरला जाणार आहे, अशी माहिती कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पुण्याचे 'पॅड मॅन'  योगेश पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला 'पॅड मॅन'  योग

Dreamtime Learning Hub Launches its Evolving Micro-School Concept in Pune, Redefining Educational Landscape

Image
  Dreamtime Learning Hub Launches its Evolving Micro-School Concept in Pune, Redefining Educational Landscape   ~ School to focus on interactive and immersive Learning catering to the age group of 3 to 16 years ~ Pune, 16 th May 2024: Dreamtime Learning Hub adds another feather to its success by opening a new micro-schooling centre in Pune. The centre is situated in the prime location of eastern Pune -Kalyani Nagar, and it aims to provide an immersive and interactive learning environment.  The hub is partnered with Goenka Education and named as Goenka Education's Dreamtime Learning Hub. Its Hyderabad hub is witnessing a huge success in a span of one year, aiming to achieve a similar milestone, Dreamtime Learning Hub  recently organized a press meet giving first-hand experience of all modules and space.  The event aims in highlighting the legacy of Ms Lina Ashar in the field of education, the need for creative educational models and the increasingly popular idea of micro-sc

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘पुकार – दिल से दिल तक’ मालिकेत उग्र स्वभावाच्या कोयलची भूमिका साकारणार अनुष्का मर्चंडे

Image
*सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘पुकार – दिल से दिल तक’ मालिकेत उग्र स्वभावाच्या कोयलची भूमिका साकारणार अनुष्का मर्चंडे*   सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर 27 मे पासून रात्री 8:30 वाजता सुरू होत असलेली ‘पुकार – दिल से दिल तक’ ही मालिका म्हणजे दुरावण्याची, भेटण्याची आणि सुटकेची एक आकर्षक कहाणी आहे. जयपूर शहराच्या पार्श्वभूमीवर बेटलेल्या या कहाणीत एक आई आणि तिच्या दोन मुलींची ही गोष्ट आहे, ज्यांना एका दुष्ट योजनेने एकमेकींपासून दूर करण्यात आले आहे. पण, नशीब सरस्वती, वेदिका आणि कोयल या तिघींना नकळत, अनपेक्षित परिस्थितीत पुन्हा एकत्र घेऊन येते. त्यांच्या कुटुंबाची वाताहत करणाऱ्या शक्तीविरुद्ध त्या तिघींना एकजुटीने लढा द्यावा लागणार आहे.   अनुष्का मर्चंडे या गुणी अभिनेत्रीला कोयलच्या भूमिकेसाठी घेण्यात आले आहे. कोयल एक महत्त्वाकांक्षी, धाडसी आणि खटपटी मुलगी आहे. एका दुर्दैवी अपघातात ती आपली जन्मदात्री आई आणि बहिणीपासून दुरावली आहे. कोयल आपल्या भूतकाळाबद्दल संपूर्ण अनभिज्ञ आहे. मयूरी नावाच्या एका गुंड स्त्रीने तिचा सांभाळ केला आहे.   ही भूमिका साकारण्याच

मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये हेमांगी कवी आणि कुशल बद्रिकेसोबतच्या आपल्या आगामी गॅगविषयी सांगत आहे, गौरव मोरे

Image
‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये हेमांगी कवी आणि कुशल बद्रिकेसोबतच्या आपल्या आगामी गॅगविषयी सांगत आहे, गौरव मोरे   सूर, ताल आणि कॉमेडी! आपल्या शोची रंजकता आणखी वाढवण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ शो मध्ये या आठवड्यात सुपरस्टार सिंगर 3 चे स्पर्धक पिहू शर्मा, आविर्भाव एस. आणि क्षितिज सक्सेना यांचे स्वागत करण्यात येणार आहे.   होस्ट हर्ष गुजराल एक खळखळून हसवणारा स्टँड अप अॅक्ट देईल ज्यात तो सुपरस्टार सिंगरमधल्या प्रतिभावान मुलांशी आपल्या बालपणाची गंमतीदार तुलना करताना दिसेल. कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी ही तूफान जोडी ‘नवरा बायको के घर में आया चोर’ या स्किटमध्ये गौरव मोरेसोबत दिसेल. या स्किटमध्ये नेहमीप्रमाणे कुशल एक सतत त्रासलेला ‘नवरा’ साकारेल आणि हेमांगी त्याची उत्साही ‘बायको’ साकारेल. गौरव या स्किटमध्ये एका मिश्किल चोराच्या भूमिकेत दिसेल.   काम करून दमलेल्या नवऱ्याला शांतता हवी आहे पण त्याच्या बायकोने शॉपिंगला जाण्यासाठी त्याच्यामागे लकडा लावला आहे. या गोंधळात एक चोर काही ‘संस्कार’ शोधत त्यांच्या घरात शिरतो आण

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर श्री कसबा गणपतीचा पवित्र मृदा पूजन सोहळा संपन्न

Image
अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर श्री कसबा गणपतीचा पवित्र मृदा पूजन सोहळा संपन्न पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक अशा अक्षय्य तृतीया या शुभ मुहूर्तावर सायंकाळी 7:30 वाजता पुण्यनगरीचा मानाचा पहिला श्री कसबा गणपती  यांची मूर्ती घडविण्यात येणार्‍या मृदेचा, पवित्र मृदा पूजन सोहळा मंडळाच्या वतीने मूर्तिकार अभिजीत धोंडफळे ह्यांच्या स्टुडिओ मध्ये करण्यात आला. हे मृदा पूजन भक्तिभावाने मंडळाचे अध्यक्ष  श्रीकांत शेटे व सर्व पदाधिकार्‍यांनी तसेच, लोकसेवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष  श्रीधर भाऊ चव्हाण, रवींद्र चौक गणेश मंडळाचे अध्यक्ष  राजेंद्र गवारे, विश्‍वस्त  राज नाईक तसेच कसबे पुणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष  संदेश कसबे ह्यांच्या हस्ते करण्यात आले. अतिशय मंगलमय अशा वातावरणात हा सोहळा पार पडला.

महिंद्रा पाॅवरऑल चे अत्याधुनिक CPCB-4 जनरेटर लाँच

Image
 महिंद्रा पाॅवरऑल चे अत्याधुनिक CPCB-4 जनरेटर लाँच  श्याम ग्लोबलच्या खेड शिवापूर प्लांटमध्ये जनरेटरचे उत्पादन सुरू पुणे - जनरेटरच्या वापराबाबत नुकताच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या अंतर्गत 1 जुलै 2024 पासून फक्त CPCB-4 जेनसेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. हे पाहता महिंद्र पॉवरॉलने नुकतेच CPCB-4 जनरेटर लाँच केले. पुण्यातील प्रसिद्ध कंपनी श्याम ग्लोबल टेक्नोव्हेंचर्स प्रा. लि. खेड शिवापूर प्लांटमध्ये या जनरेटरचे उत्पादन सुरू झाले आहे. जनरेटर उत्पादनासोबतच श्याम ग्लोबल महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांसाठी मुख्य वितरक म्हणून काम करत आहे. श्याम ग्लोबलच्या सहाव्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्र आणि गोव्यातील डीलर्ससाठी डीलर्स मीटचे आयोजन करण्यात आले होते. महिंद्रा पॉवरॉलचे बिझनेस हेड संजय जैन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय श्याम ग्लोबल कंपनीचे संचालक नरेंद्र गोयल आणि रुची गोयल, महाराष्ट्र पोलीस विभागाचे एडीजी कैसर खालिद, भंडारी पेपर्सचे एमडी विजय भंडारी, महिंद्रा वेस्ट टू एनर्जी सोल्युशन्स लि. पी. पलानिप्पनचे सीईओ, त्रिया हाऊसिंगच

गेरा डेव्हलपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडने पूर्व खराडीमध्ये गेराझ आयलँड ऑफ जॉय घोषितगेराच्या चाइल्ड सेन्ट्रिक होम्स ला १० वर्षे पूर्ण

Image
गेरा डेव्हलपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडने पूर्व खराडीमध्ये गेराझ आयलँड ऑफ जॉय घोषित गेराच्या चाइल्ड सेन्ट्रिक होम्स ला १० वर्षे पूर्ण प्रकल्प १२. ५ एकरमध्ये पसरलेला असून खाजगी गो-कार्टिंग रेस ट्रॅक,  वेव्ह पूल आणि बॉलिंग ॲलीचे घर आहे, जे १८०० हून अधिक कुटुंबांसाठी डिझाइन केलेले आहे. पुणे, भारत — मे ८, २०२४ — गेरा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड, रिअल इस्टेटमधील प्रख्यात पायनियर आणि पुणे, गोवा आणि बंगळुरूमधील त्यांच्या प्रीमियम निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांसाठी अनेक पुरस्कार प्राप्तकर्ते, त्यांचा नवीनतम प्रकल्प, गेराज आयलंड ऑफ जॉय सादर करण्यास उत्सुक आहेत. हे प्रक्षेपण गेराच्या समृद्ध वारशात नवोन्मेषक आणि अग्रेषित-विचारक - गेराच्या चाइल्डसेंट्रिक® होम्सच्या दशकातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड साजरे करण्याशी एकरूप आहे. आधुनिक कुटुंबांच्या गरजेनुसार २०१४ मध्ये चाइल्डसेंट्रिक® होम्स लाँच करून गेरा नाविन्यपूर्णतेमध्ये आघाडीवर आहे. सॉन्ग ऑफ जॉय आणि रिव्हर ऑफ जॉय सारख्या प्रकल्पांनी मुलांचे संगोपन करण्यासाठी पालकांच्या गरजा समजून घेणे आणि त्यांना प्रतिसाद देणे आणि प्रतिष्ठित अकादमी

भुंडीस' चित्रपटाच्या धमाकेदार टिझर नंतर चित्रपटाची उत्कंठा वाढवणार ट्रेलर प्रदर्शित...*

Image
*'भुंडीस' चित्रपटाच्या धमाकेदार टिझर नंतर चित्रपटाची उत्कंठा वाढवणार ट्रेलर प्रदर्शित...* *'भुंडीस'चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा दिमाखात संपन्न*  *'भुंडीस'चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला*  ए स्क्वेअर ग्रुप निर्मित 'भुंडीस' या मराठी चित्रपटाच्या टिझरला मिळालेल्या भव्य प्रतिसादानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा दिमाखात संपन्न झाला.ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.नुकतचं चित्रपटातील 'कोयतं कुऱ्हाडी' गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यूट्युबर या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. येत्या १७ मे पासुन संपूर्ण महाराष्ट्रतील प्रेक्षकांना जवळच्या चित्रपटगृहात जावून चित्रपट पाहता येणार आहे. *या चित्रपटात मुख्य भूमिकेत भरत शिंदे , रामभाऊ जगताप ( चांडाळ चौकडी फेम बाळासाहेब , रामभाऊ),यशराज डिंबळे (रौदळ फेम बिट्टू ), सुरेखा डिंबळे, माणिक काळे, कुमार पाटोळे , अश्विन तांबे , सुभाष मदने, आशुतोष वाडेकर तर याचबरोबर  अभिनेते माधव अभ्यंकर, नवनाथ काकडे मेघराज राजेभोसले हे सुद्धा वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे

उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी'**प्रसाद लाड असे कोणाला म्हणाले?*

Image
*'उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी'* *प्रसाद लाड असे कोणाला म्हणाले?* _शरद पवार यांच्या म्हणण्यानुसार समान विचारधारेचा छोटा प्रादेशिक पक्ष उबाठा गट पण कॉंग्रेसमध्ये विलीन होणार का? आमदार लाड यांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न_ मुंबई, ८ मे : काँग्रेस आणि आमच्या विचारधारेत फरक नाही. उद्धव ठाकरे देखील आपल्याच विचारधारेचे आहेत. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरु यांच्या विचाराचे आहोत. यामुळे येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हे मत व्यक्त केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह उबाठा गट देखील काँग्रेसमध्ये विलीन होणार का? अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) ट्वीट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे गटाला काही प्रश्न विचारले असून, 'उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी' अशी अवस्था उद्धव ठाकरे गटाची झाली

पुण्यात उभारणार टिपू सुलतान यांचे भव्य स्मारक : अनिस सुंडके

Image
पुण्यात उभारणार टिपू सुलतान यांचे भव्य स्मारक : अनिस सुंडके   पुणे,०३ मे,२०२४: पुणे लोकसभा निवडणूक रंगतदार होताना दिसत आहे. या निवडणुकीसाठी विविध पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. भेटीगाठी, पदयात्रा रोज सुरू आहेत. अशाच पदयात्रेदरम्यान एमआयएम पक्षाचे पुण्यातील लोकसभेचे उमेदवार अनिस सुंडके यांनी पुण्यामध्ये टिपू सुलतान यांचे भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा केली. भव्य असे स्मारक उभारण्याचा त्यांनी आपला निश्चय बोलून दाखवला. टिपू सुलतान हे खरे स्वातंत्रवीर होते, भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते इंग्रजांशी लढले आणि आपल्या प्राणाची आहुती दिली, पुण्यातील नागरिकांना खासकरून तरुणांनादेखील त्यांच्या शौर्याची गाथा कळली पाहिजे, या हेतूने हे स्मारक उभारले जाणार आहे, असे ते पुढे म्हणाले.   कर्नाटकात टिपू सुलतान जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी चांगलेच तापले होते. भाजपने या प्रकरणात टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्याच्या निर्णयाला विरोध करत आक्रमक पवित्र घेतला. टिपू सुलतान यांनी  हिंदूंची जबरदस्तीने धर्मांतरे घडवून आणली, हिंदूंवर अत्या

वक्फ बोर्डाचा मोक्याचा भूखंड बळकावून धंगेकर बांधताहेत कॉम्प्लेक्स

Image
वक्फ बोर्डाचा मोक्याचा भूखंड बळकावून धंगेकर बांधताहेत कॉम्प्लेक्स पुणे, ता.०६: मूळ वक्फ बोर्डाची मालमत्ता काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि आमदार रविंद्र धंगेकर यांनी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याबरोबर संगनमत करून बळकावली असल्याचा आरोप एमआयएमचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनिस सुंडके यांनी केला आहे. मूळ वक्फ बोर्डाची मालमत्ता रविंद्र धंगेकर यांनी राजकीय प्रभाव टाकून बळकावला आहे. धंगेकरांनी हा भूखंड त्यांच्या पत्नीच्या नावावर घेतला असून आता खासगी विकसक उत्कर्ष असोसिएट्सच्या मदतीने त्या ठिकाणी निवासी-व्यावसायिक इमारत बांधली जात आहे, असेही सुंडके यांनी नमूद केले. गेल्या वर्षी कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जिंकल्यानंतरच धंगेकरांच्या पत्नी आणि उत्कर्ष असोसिएट्स यांनी हा व्यवहार पूर्ण केला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. रविवार पेठेत लक्ष्मी रस्त्यानजीक सि.टी.एस. नंबर 966/1 हा तब्बल 1 हजार 607 चौरस मीटर क्षेत्रफळ असणारा भूखंड वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात तो भाडेकराराने देण्यात आला. सन 1947 नंतर कायद्याचा भंग करुन वक्फ बोर्डाची ही मालमत्ता

डाबर ग्लुकोजने केले खेळाडूंसाठी विशेष जनजागृती सत्राचे आयोजन

Image
डाबर ग्लुकोजने केले खेळाडूंसाठी विशेष जनजागृती सत्राचे आयोजन पुणे, ०७ मे २०२४ : डाबर ग्लुकोज, डाबरच्या इन्स्टंट एनर्जी ड्रिंकने तरुणांमधील क्रीडा प्रतिभेला वाव देण्यासाठी आणि देशभरातील क्रीडा अकादमींच्या तरुण खेळाडूंना उर्जेचे महत्त्व पटवून देण्यासाठी 'एनर्जीइज इंडिया' ही मोहीम सुरू केली आहे. स्टॅमिना लाँच केले आहे. या मोहिमेअंतर्गत डाबर ग्लुकोजने स्टार बॉक्सिंग अकॅडमी, एनर्जी आणि स्टॅमिना मॅनेजमेंट या विषयावर विशेष जनजागृती सत्राचे आयोजन केले , यावेळी सुप्रसिद्ध डॉक्टर आणि तज्ज्ञ उपस्थित होते. सत्रादरम्यान, खेळाडूंना खेळादरम्यान त्यांची कामगिरी कशी सुधारता येईल आणि त्यांची पूर्ण क्षमता कशी वापरता येईल याची माहिती देण्यात आली. डाबरने या अकादमीतील  - जाह्नवी सांगळे , साक्षी मीना , रुद्र घारे  या खेळाडूंचा गौरव केला, ह्या वेळी डाबर इंडियाचे दिनेश कुमार  , देशसेवा फाउंडेशन चे नरेंद्र पारखे , स्टार बॉक्सिंग अकॅडमी कोच  निलेश खुडे, विजय पवार , अदित्य जाधव आणि इतर सहकारी उपस्थित होते. तरुण खेळाडूंना ऊर्जा आणि तग धरण्याची क्षमता याविषयी जागरूक करण्यासाठी ‘एनर्ज

"कासरा" चित्रपटातून घडणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन!!*

Image
*"कासरा" चित्रपटातून घडणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन!!* *अभिनेत्री स्मिता तांबेची मध्यवर्ती भूमिका !!* *शेतीप्रधान विषयावरील  "कासरा" चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च*   *"कासरा" २४  मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात* शेतकऱ्याचं जगण्याच्या संघर्षाचं दर्शन घडवणाऱ्या  कासरा चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. शेती, शेतकरी या विषयावर आजवर अनेक चित्रपट झाले असले, तरी कासरा वेगळा ठरणार असून, सकस कथानक, उत्तम अभिनय असलेला हा चित्रपट २४ मे रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. रवी नागपूरे यांच्या साई उत्सव फिल्म्स या निर्मिती संस्थेनं कासरा चित्रपटाची निर्मिती केली आहे. विकास विलास मिसाळ यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रवी नागपूरे यांच्याच कथेवर महेंद्र पाटील यांनी पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. अविनाश सातोसकर यांनी छायांकन, प्रशांत नाकती, संकेत गुरव यांनी संगीत दिग्दर्शन, प्रशांत नाकती यांनी गीतलेखन केलं आहे. चित्रपटात स्मिता तांबे, गणेश यादव, जनमेजय तेलंग, तन्वी सावंत, राम पवार, प्रकाश धोत्रे, डॉ. वंदना पटे

MIT-ADT University Excels in QS World University Rankings*

Image
*MIT-ADT University Excels in QS World University Rankings*  *Pune:* In a remarkable display of academic prowess, MIT-ADT University has once again demonstrated its commitment to excellence by securing a prestigious position in the QS World University Rankings by Subject 2024, specifically in the Art and Design category. With an impressive rank band of 150-200, MIT-ADT has solidified its reputation as a leading institution in higher education on a global scale. The QS World University Rankings by Subject are widely regarded as a crucial measure of academic quality and institutional performance, serving as a beacon for assessing and promoting excellence in education. MIT-ADT's inclusion in this esteemed list underscores its dedication to providing world-class education and fostering a culture of innovation and excellence. This achievement is a testament to the relentless dedication and hard work of the entire MIT ADT community, from faculty and st

*'एमआयटी-एडीटी'ला 'क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी' रँकिंग*

Image
*'एमआयटी-एडीटी'ला 'क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी' रँकिंग*  *पुणेः* विद्यार्थ्यांना कायमच गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी कटीबद्ध असणाऱ्या एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाने नुकतीच आपली शैक्षणिक कटिबद्दता सिद्ध करताना क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी-२०२४(वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग) च्या प्रतिष्ठित कला आणि डिझाइन श्रेणीमध्ये १५०-२०० अशा प्रभावी रँक बँडसह स्थान मिळवले आहे. या यशामुळे एमआयटी एडीटी विद्यापीठाने जागतिक स्तरावर उच्च शिक्षणातील अग्रगण्य संस्था म्हणून आपली प्रतिष्ठा मजबूत केली आहे. क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग हे शैक्षणिक गुणवत्तेचे आणि संस्थात्मक कार्यक्षमतेचे महत्त्वपूर्ण मापदंड म्हणून ओळखले जाते, जे शिक्षणातील उत्कृष्टतेचे मूल्यांकन आणि प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपूर्ण काम करते. एमआयटी एडीटी विद्यापीठ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डॉ.मंगेश कराड यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि कार्यकारी संचालिका प्रा.डॉ.सुनिता कराड या

एमआईटी-एडीटी' को 'क्यूएस वर्ल्ड यूनिवर्सिटी' रैंकिंग में स्थान

Image
*'एमआईटी-एडीटी' को 'क्यूएस वर्ल्ड यूनिवर्सिटी' रैंकिंग में स्थान* *पुणे* : एमआईटी यूनिवर्सिटी ऑफ आर्ट, डिजाइन एंड टेक्नोलॉजी, जो अपने छात्रों को हमेशा गुणवत्तापूर्ण शिक्षा प्रदान करने के लिए प्रतिबद्ध है, अपनी शैक्षणिक प्रतिबद्धता साबित करते हुए, हाल ही में 150-200 के प्रभावशाली रैंक बैंड के साथ क्यूएस वर्ल्ड यूनिवर्सिटी रैंकिंग-2024 (वर्ल्ड यूनिवर्सिटी रैंकिंग) की प्रतिष्ठित कला और डिजाइन श्रेणी में स्थान प्राप्त किया है।  इस उपलब्धि ने विश्व स्तर पर उच्च शिक्षा के अग्रणी संस्थान के रूप में एमआईटी एडीटी विश्वविद्यालय की प्रतिष्ठा को मजबूत किया है। क्यूएस वर्ल्ड यूनिवर्सिटी रैंकिंग को शैक्षणिक गुणवत्ता और संस्थागत प्रदर्शन के एक महत्वपूर्ण उपाय के रूप में मान्यता प्राप्त है, जो शिक्षा में उत्कृष्टता का आकलन करने और उसे बढ़ावा देने में महत्वपूर्ण भूमिका निभाती है। कार्यकारी अध्यक्ष और कुलपति प्रोफेसर डॉ. मंगेश कराड और कार्यकारी निदेशक प्रोफेसर डॉ. सुनीता कराड के दूरदर्शी नेतृत्व में एमआईटी एडीटी विश्वविद्यालय कला, डिजाइन और प्रौद्योगिक

कष्टकरी महिला आहेत म्हणून घर आहे - ममता सिंधूताई सपकाळ*

Image
*कष्टकरी महिला आहेत म्हणून घर आहे - ममता सिंधूताई सपकाळ*   *-कष्टकरी महिलांचा 'गृहस्वामिनी पुरस्कार' देऊन सन्मान*  पुणे : कष्टकरी महिला आहेत म्हणून घर आहे,समाज आहे, देश आहे. महिला वेगवेगळ्या बिकट परिस्थितीत काम करत असतात. करोना काळात तर महिलांनी जीवावर उदार होऊन जनतेची सेवा केली. तुमच्या कर्तव्यतत्पर सेवेला माझा मानाचा. मुजरा आहे. अशा शब्दात प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या ममता सिंधुताई सपकाळ यांनी एका कार्यक्रमात आपल्या भाषणात बोलताना व्यक्त केल्या. महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त महात्मा गांधी वसाहत व पाटील इस्टेट झोपडपट्टी वसाहतीमधील २१६ कष्टकरी महिलांचा 'गृहस्वामिनी पुरस्कार' देऊन या कष्टकरी महिलांचा खास सन्मान करण्यात आला त्यामध्ये धुणे भांडी काम करणाऱ्या  घरेलू कामगार महिला, स्वयंपाक करणाऱ्या, शिलाईकामं करून उदरनिर्वाह करीत स्वतःचा कुटुंबाचा संसार चालवणाऱ्या कष्टकरी महिलांचा समावेश होता. महात्मा गांधी झोपडी संघ,महात्मा गांधी मित्र मंडळ, चैतन्य मित्र मंडळ, व जेतवन बौद्ध विहार, मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्धमानाने या गृह