सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’ या आगामी मालिकेत शिवांगी सावंतच्या भूमिकेत झळकणार खुशी दुबे

*सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’ या आगामी मालिकेत शिवांगी सावंतच्या भूमिकेत झळकणार खुशी दुबे*
 
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने आपल्या नवीन मालिकेची जाहिरात केली आहे – ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’! ही एक रोमॅंटिक आणि उत्कट मालिका आहे, ज्यात महाराष्ट्रातील एका छोट्या शहरातल्या शिवांगी सावंत नावाच्या विनम्र पण आधुनिक विचारसरणीच्या मुलीची गोष्ट सांगण्यात येणार आहे. तिला सिनेमाचे प्रचंड वेड आहे, यातूनच तिला आपल्या वडिलांच्या ‘संगम सिनेमा’ला भरभराटीचे दिवस पुन्हा मिळवून देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करण्याची प्रेरणा मिळते.
 
या मालिकेत अभिनेत्री खुशी दुबे शिवांगी सावंत या नायिकेची भूमिका साकारणार आहे. शिवांगी ही शक्ती, प्रामाणिकपणा आणि एखाद्या प्रयोजनासाठी झटून काम करण्याच्या भावनेने भरलेली एक आधुनिक स्त्री आहे. आपल्या वडिलांच्या ‘संगम सिनेमा’चा वारसा तिलाच मिळालेला आहे. आव्हानांचा सामना करताना तिच्यातील दृढनिश्चय दिसून येतो आणि संगम सिनेमा हा तिच्यासाठी केवळ एक व्यवसाय नाही; तर एक अशी जागा आहे, जेथे स्वप्ने साकार होतात!

व्हिडिओ येथे बघा: https://www.instagram.com/p/C7ErjQiPjMM/
 
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’ मालिकेत शिवांगी सावंतची भूमिका साकारत असल्याचा उत्साह व्यक्त करताना खुशी दुबे म्हणते, “ही गोष्ट मला फारच आवडली आहे! हे कथानक मला जेव्हा पाहिल्यांना विशद करण्यात आले, तेव्हा मी त्यात गुंगून गेले होते आणि मला वाटते, प्रेक्षकांची देखील हीच गत होईल. संगम सिनेमा पुनरुज्जीवित करण्याच्या ध्यासाबरोबरच शिवांगीच्या प्रवासात अनेक अनपेक्षित वळणे, आडवळणे आहेत ज्यातून आकार घेणारी शिवांगीची गोष्ट नक्कीच सगळ्यांना खिळवून ठेवेल. ही व्यक्तिरेखा माझ्या समोर आलेले हे नवे आव्हान आहे. आपले कुटुंब आणि स्वप्ने याबाबत शिवांगीची अढळ निष्ठा आणि चिकाटी या गुणांनी मला विशेष आकर्षित केले आहे.”
 
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’ लवकरच येत आहे, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला