Posts

Showing posts from January, 2024

Inauguration and blessings for our new company Hamaad Air Charters LLC-FZ dubai UAE.

Image
Inauguration and blessings for our new company Hamaad Air Charters LLC-FZ dubai UAE.  by the   Union Cabinet Minister Shri Nitinji Gadkari  Nagpur Airport, and first charter flight ✈️ Inauguration and Pooja by Daughter Sanjana, I thank all who supported in this journey,  especially Captain Rishikesh pendse, Dr Ashok Vikhe patil.and Ex Union law minister Mr Ramakant Khalap for beautiful lunch in Goa.We will be doing , charter services, pilot training and ground school, Air Ambulance, Hobby flying. Etc

*Karnataka Tourism to host Roadshow in Pune*

Image
*Karnataka Tourism to host Roadshow in Pune* Department of Tourism, Government of Karnataka in association with Karnataka State Tourism Development Corporation Ltd, Jungle Lodges and Resorts, and a group of stakeholders from Karnataka are set to enchant the vibrant city of Pune as it is set to organize an exclusive Roadshow dedicated to promoting the diverse and captivating tourism offerings of the state. This event will bring together travel agents, tour operators, and media representatives for an immersive experience of Karnataka's rich cultural tapestry, breathtaking landscapes, and unique travel opportunities. Scheduled for 6th February 2024, at Amanora The Fern - An Ecotel Hotel, Pune at 06:00 pm, the Roadshow aims to create a dynamic platform for Karnataka Tourism to engage with key stakeholders in the travel industry. Travel agents and tour operators from Pune will have the opportunity to explore the treasures Karna

सायकलवरून तिर्थक्षेत्राचे दर्शन

Image
सायकलवरून तिर्थक्षेत्राचे दर्शन पुणे ते गिरनारजी - सोमनाथ 1100 कि.मी. सायकलवर यशस्वी प्रवास फक्त 9 दिवसात पार पुणे : विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेल्या व्यक्ती समाजात विधायक बदल घडवितात आणि असे व्यक्ती इतिहास घडवितात. असाच एका ध्येयाने प्रेरित झालेले उत्तम धोका यांनी सायकलवरून ही भारतातील तिर्थक्षेत्रचा प्रवास होवू शकतो असा संदेश देण्याच्या उद्देशाने अनेक साहसी मोहिमा यशस्वी केल्यानंतर या उत्तम धोका आणि आकाश राठोड ह्यांनी या वर्षी पुन्हा एकदा  पुणे ते गिरनारजी -सोमनाथ 1100 कि.मी. चा सायकल व्दारे 9 दिवसात प्रवास मोहीम पूर्ण केली आहे.  पुणे सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटी येथून  सुरु केलेली मोहिम 9 दिवसात गुजरात मधील राजकोट येथील जैन धर्मियांचे श्रध्दास्थान गिरणारजी तिर्थक्षेत्र 1100 कि. मीटरचा प्रवास 18 जानेवारी 2024 ला पुर्ण केला. तसेच सोमनाथजी आणि गिरनारजी येथील दत्त मंदीराचा ही प्रवास सायकल व्दारे पुर्ण केला.  या सायकल मोहिमेत उत्तम धोका यांच्या नेतृत्वाखाली आकाश राठोड, सुरेश पिताणी, विर उत्तम धोका  हे वॉरिअर्स सहभागी झाले होते. दररोज 120 ते 130 क

चत्रभुज नरसी स्कूल, अमनोरा पार्क टाऊनमध्ये क्विंटेसन्सचे आयोजन केले जाते

Image
 चत्रभुज नरसी स्कूल, अमनोरा पार्क टाऊनमध्ये क्विंटेसन्सचे आयोजन केले जाते  इंट्रा-स्कूल स्पोर्ट्स आणि परफॉर्मिंग आर्ट्समध्ये एलिव्हेटिंग एक्सलन्सची दुसरी आवृत्ती  पुणे, 27 जानेवारी, 2024: एकात्मता आणि प्रतिभेची भावना आत्मसात करून, क्विंटेसन्स, एक आंतर-शालेय महोत्सव, सन्माननीय चत्रभुज नरसी स्कूल - अमनोरा पार्क टाऊन येथे त्याची ज्वलंत दुसरी आवृत्ती उलगडण्यासाठी सज्ज आहे.  हा महोत्सव त्याच्या दुसऱ्या आवृत्तीतील दूरदर्शी श्री. सुजय जयराज यांच्या अध्यक्षतेखालील पाच शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सामूहिक उत्साहाचा दाखला आहे.  या वर्षीच्या जल्लोषात मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूल आणि गिफ्ट सिटी (गुजरात), मुंबईतील जमनाबाई नरसी इंटरनॅशनल स्कूल आणि मुंबई आणि पुण्यातील चत्रभुज नरसी स्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग पाहायला मिळेल.  संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील 150 हून अधिक श्रेणी उद्याच्या उज्ज्वल मनांमध्ये गतिमान आणि निरोगी स्पर्धेसाठी मंच तयार करतील.  श्री. सुजय जयराज, चेअरपर्सन आणि ट्रस्टी म्हणतात, "क्विंटेसन्स हा आमच्या विद्यार

पुण्यात पहिल्यांदाच महानाट्या मधून उलगडणार श्री बालाजींचा इतिहास

Image
*पुण्यात पहिल्यांदाच महानाट्या मधून उलगडणार श्री बालाजींचा इतिहास*  *-5 मजली रंगमंच, 250 कलाकार, 70 नृत्य कलावंत, घोडे, रोबोटिक हत्ती ठरणार प्रमुख आकर्षण*  *-महानाट्यातून उभारला जाणार निधी मंदिर निर्माण आणि सामाजिक उपक्रमांसाठी दिला जाणार* पुणे : गोविंदा कल्चरल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने  महानाट्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पुण्यामध्ये अतिशय भव्यदिव्य असे  'श्री बालाजी महानाट्य - इतिहास, लीला आणि समर्पण' आयोजित करण्यात येत आहे. या हिंदी महानाट्याचे सादरीकरण भव्य अशा 5 मजली रंगमंचावर होणार आहे. तर यामधील 250 कलाकार, 70 हून अधिक नृत्य कलावंत, घोडे, रोबोटिक हत्ती हे या महानाट्याचे खास आकर्षण असणार आहे. या महानाट्यातून उभारला जाणार निधी मंदिर निर्माण आणि अन्य सामाजिक उपक्रमांसाठी दिला जाणार आहे, अशी माहिती या महानाट्याचे लेखक, दिग्दर्शक विशाल दीपक धुमावत आणि ॲड. सनी रवींद्र कोळपकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.  पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विशाल धुमावत म्हणाले की,  गोविंदा कल्चरल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने पुण्यात पहिल्य

सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीने खराडीत विक्रमी ३६७१ जणांचे रक्तदान

Image
सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीने खराडीत विक्रमी ३६७१ जणांचे रक्तदान - ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित रक्तदान महाशिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद पुणे : 'नसे केवळ हे रक्तदान, जीवनदानाचे हे पुण्य काम' हा विचार घेऊन सुरेंद्र पठारे फाउंडेशनने ७५ व्या प्रजासत्ताकदिनी आयोजिलेल्या रक्तदान महाशिबीरात विक्रमी ३६७१ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. तरुण-तरुणी, महिला-पुरुष अशा सर्वांनीच दिलेल्या उदंड आणि अभूतपूर्व प्रतिसादात झालेल्या रक्तदान महाशिबीराने गेल्या तीन वर्षांचा विक्रम मोडीत काढला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुरेंद्र पठारे फाऊंडेशनतर्फे खराडी गावातील राजाराम भिकू पठारे इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित या महाशिबिराला जत्रेचे स्वरूप आले होते. सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत उत्साहात झालेल्या या शिबिराला सकाळपासूनच परिसरातील नागरिकांनी रक्तदान करण्यास गर्दी केली. आरोग्य तपासणी करून पात्र दात्यांना रक्तदानासाठी सोडण्यात आले. रक्तदात्यांची योग्य काळजी घेतली जात होती. त्यामुळे प्रत्येक रक्तदात्यांकडून फाउंडेशचे आभार व्यक्त होत होते. प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र व अल्पोपहार देऊ

युवराज सिंह, हरभजन सिंह और शोएब अख्तर

Image
 युवराज सिंह, हरभजन सिंह और शोएब अख्तर 

श्रीमद् रामायण’ मालिकेत भूमिका करणारी प्राची बन्सल म्हणते, “सीतेची व्यक्तिरेखा साकारणे सहज वाटते.”*

Image
*‘श्रीमद् रामायण’ मालिकेत भूमिका करणारी प्राची बन्सल म्हणते, “सीतेची व्यक्तिरेखा साकारणे सहज वाटते.”*   या आठवड्यात, ‘श्रीमद् रामायण’ मध्ये राम-सीता विवाहाचा मंगल सोहळा प्रेक्षक बघणार आहेत. या विवाहाच्या तयारीची धामधूम सध्या पडद्यावर सुरू आहे. या भव्य विवाह सोहळ्यासाठी दशरथ राजा मिथीला नगरीत येऊन पोहोचला आहे. तिकडे अयोध्येत राणी कैकेयी नवविवाहित जोडप्याच्या स्वागताची तयारी करत आहे. समस्त विश्वच नव्हे, तर साक्षात शिव पार्वती देखील राम आणि सीतेचा हा विवाह सोहळा बघण्यास आतुरले आहेत.   1] जेव्हा माता सीतेची भूमिका तुला देऊ करण्यात आली, तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?   - अनेक ऑडिशन आणि मॉक शूट्सनंतर जेव्हा मला समजले की सीतेची भूमिका मला मिळाली आहे, तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ते सगळं अगदी स्वप्नवत होतं.    2] तुझी वेशभूषा, केशभूषा, मेकअप हे सगळे खूप तपशीलवार केलेले आहे. त्याविषयी आम्हाला सांग.    - माझी केशभूषा, मेकअप आणि पोशाख नक्की करण्यासाठी आम्ही अनेक लुक टेस्ट केल्या, प्रत्येक लुक साठी 10-12 तास खर्च केले. सुमारे 8 ते 10 चाचण्यांनंतर आम्हाला हा वर्तमान

टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्स प्लस' ऑटोरिक्षा सादर

Image
टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्स प्लस' ऑटोरिक्षा सादर पुष्पक बरीक यांची पत्रकार परिषदेत माहिती; 'टीव्हीएस किंग का वादा' योजनेचाही शुभारंभ पुणे : "ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रणी कंपनी टीव्हीएस मोटर्स लिमिटेडने नवीन वैशिष्ट्यपुर्ण अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या २२५ सीसी क्षमतेचे लिक्वीह कुल्ड इंजिन असलेली 'टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्स प्लस' ऑटोरिक्षा ग्राहकांसाठी बाजारात आणली आहे. 'हर रस्ते का हमसफर' असलेल्या ऑटोरिक्षामध्ये आजवर न अनुभवलेले तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. अधिक शक्तिशाली, नवतंत्रज्ञानयुक्त, वेगवान आणि आरामदायी अशी ही रिक्षा आहे. यासह 'टीव्हीएस किंग का वादा' या योजनेचा शुभारंभ आज करत आहोत," अशी माहिती टीव्हीएस मोटर्सच्या कमर्शियल मोबिलिटीचे प्रमुख पुष्पक बरीक यांनी दिली. पुणे स्टेशन येथील हॉटेल लेमन ट्री प्रीमिअरमध्ये टीव्हीएस मोटर्सच्या वतीने 'टीव्हीएस किंग ड्युरॅमॅक्स प्लस' ऑटोरिक्षाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पुष्पक बरीक बोलत होते. याप्रसंगी टीव्हीएस म

पुण्यातील अलका चौकात साकारले प्रभू श्रीरामांचे भव्य शिल्प !

Image
पुण्यातील अलका चौकात साकारले प्रभू श्रीरामांचे भव्य शिल्प ! कोट्यावधी देशवासीयांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले असून प्रभू श्रीराम अयोध्यानगरीत परतले आहेत. या सोहळ्यामुळे देशवासीयांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. या भव्य-दिव्य अशा सोहळ्याचे औचित्य साधत पुणे शहरात प्रख्यात शिल्पकार पद्मश्री श्री. प्रमोदजी कांबळे यांनी प्रभू श्रीरामांचे भव्य शिल्प साकारले. देशातील विविध भागांत श्रीराम भक्तांकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपल्या संयोजनातून प्रथमच पुणे शहरात प्रभू श्रीरामाचे भव्य मुर्ती शिल्प साकारण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. अयोध्येत जाऊन प्रत्यक्ष त्यांचे दर्शन घेणे आपल्याला जमले नसले, तरी प्रत्यक्षात मुर्ती साकारताना पाहणे, ही पुणेकरांसाठी खास पर्वणी ठरली आहे. आज सकाळी ८ वाजेपासून अलका टॉकीज येथे हे भव्य शिल्प साकारण्यास प्रारंभ करण्यात आला. सर्व पुणेकरांनी हा सुंदर क्षण आपल्या डोळ्यांत आणि कॅमेराच्या डोळ्यांनी टिपून घेतला. तसेच शिल्प साकारणारे प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे यांचे तोंडभरून कौतुक केले.  य

हसत-खेळत, प्रयोगांतून विज्ञान आत्मसात करावे

Image
हसत-खेळत, प्रयोगांतून विज्ञान आत्मसात करावे अरविंद गुप्ता यांचे प्रतिपादन; मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्रातर्फे आंतरशालेय प्रकल्प स्पर्धा पुणे : "पुस्तकांत लिहिले आहे किंवा मोठ्यांनी सांगितले म्हणून डोळेझाकपणे कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आपल्यातील कुतूहल, जिज्ञासा जागृत ठेवून प्रत्येक गोष्टींचा प्रात्यक्षिकांतून अनुभव घ्या आणि मग निष्कर्ष काढा. विज्ञान हे हसत-खेळत, प्रयोगांतून आत्मसात करायला हवे. निसर्गात आपल्याभोवती असलेल्या प्रत्येक गोष्टींतून काहीतरी निर्मिती करून त्यातील विज्ञान समजून घेता येते," असे प्रतिपादन प्रसिद्ध संशोधक पद्मश्री अरविंद गुप्ता यांनी केले. भारतीय विद्या भवनच्या मुक्तांगण विज्ञानशोधि का केंद्रातर्फे आयोजित आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी अरविंद गुप्ता बोलत होते. याप्रसंगी भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे, संस्थेच्या उपसंचालिका नेहा निरगुडकर, भारती बक्षी आदी उपस्थित होते. स्पर्धेचे हे सोळावे वर्ष असून, यासाठी विविध शाळांमधून कनिष्ठ व वरिष्ठ गटातून सुमारे ३५० प्रकल्प पाठविण्यात

ओमराजे निंबाळकर, राजेंद्र गावीत, संजय जाधव, अशोक नेते यांना आदर्श खासदार पुरस्कार

Image
 ओमराजे निंबाळकर, राजेंद्र गावीत, संजय जाधव, अशोक नेते यांना आदर्श खासदार पुरस्कार जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयुस् तर्फे ७ वी युवा संसद ; भास्कर पेरे पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार पुणे : युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्याकरीता जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयुस् तर्फे आयोजित ७ व्या युवा संसदेत ओमराजे निंबाळकर, राजेंद्र गावीत, संजय जाधव, अशोक नेते यांना आदर्श खासदार पुरस्कार आणि सरपंच भास्कर पेरे पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार यांना प्रदान करण्यात येणार आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे, अशी माहिती इन्स्टिटयूटचे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.   न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट तर्फे रविवार, दिनांक २८ व सोमवार, दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी संस्थेच्या सभागृहात ही संसद होणार आहे. युवा संसदेत भास्कर जाधव, संजय शिरसाट यांना आदर्श आमदार पुरस्कार, हेमंत रासने, साईनाथ बाबर, दत्ता धनकवडे, गणेश बीडकर यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार, दिलीप घोलप यांना आदर्श सरपंच तर सनी निम्हण, अक्षय जै