श्रीमद् रामायण’ मालिकेत भूमिका करणारी प्राची बन्सल म्हणते, “सीतेची व्यक्तिरेखा साकारणे सहज वाटते.”*
*‘श्रीमद् रामायण’ मालिकेत भूमिका करणारी प्राची बन्सल म्हणते, “सीतेची व्यक्तिरेखा साकारणे सहज वाटते.”*
या आठवड्यात, ‘श्रीमद् रामायण’ मध्ये राम-सीता विवाहाचा मंगल सोहळा प्रेक्षक बघणार आहेत. या विवाहाच्या तयारीची धामधूम सध्या पडद्यावर सुरू आहे. या भव्य विवाह सोहळ्यासाठी दशरथ राजा मिथीला नगरीत येऊन पोहोचला आहे. तिकडे अयोध्येत राणी कैकेयी नवविवाहित जोडप्याच्या स्वागताची तयारी करत आहे. समस्त विश्वच नव्हे, तर साक्षात शिव पार्वती देखील राम आणि सीतेचा हा विवाह सोहळा बघण्यास आतुरले आहेत.
1] जेव्हा माता सीतेची भूमिका तुला देऊ करण्यात आली, तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?
- अनेक ऑडिशन आणि मॉक शूट्सनंतर जेव्हा मला समजले की सीतेची भूमिका मला मिळाली आहे, तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ते सगळं अगदी स्वप्नवत होतं.
2] तुझी वेशभूषा, केशभूषा, मेकअप हे सगळे खूप तपशीलवार केलेले आहे. त्याविषयी आम्हाला सांग.
- माझी केशभूषा, मेकअप आणि पोशाख नक्की करण्यासाठी आम्ही अनेक लुक टेस्ट केल्या, प्रत्येक लुक साठी 10-12 तास खर्च केले. सुमारे 8 ते 10 चाचण्यांनंतर आम्हाला हा वर्तमान लुक पसंत पडला. विवाह सोहळ्यात मी जो लहंगा परिधान केलेला दिसत आहे, तो सुमारे 15 किलो वजनाचा आहे. त्यावरील आभूषणे वगैरे मोजल्यास एकंदर वजन अंदाजे 20 किलो होईल. हा पोशाख मखमली वस्त्रातून बनवला आहे. यात वाईन, मरून, लाल आणि हळदी रंग वापरुन त्याला सणासुदीच्या मोसमाचा मूड दिला आहे. डोक्यावरून घेतलेले वस्त्र 15 मीटर लांब असून, त्यावर चांदण्यांचे बारीक काम केलेले आहे. आत्तापर्यंतचा आमचा प्रवास खूप रोमांचक आहे. आम्हाला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि सीतेच्या भूमिकेत लोकांनी मला स्वीकारल्यामुळे आमचे कष्ट सार्थक झाल्यासारखे वाटते आहे. आम्हाला मिळालेल्या कौतुकाबद्दल आणि आधाराबद्दल मी प्रेक्षकांची ऋणी आहे.
3] राम-सीता विवाह हा एक लक्षणीय क्षण आहे, सुजय रेऊ या सह-कलाकारासोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा आहे?
- जेव्हा मी या सेटवर असते, तेव्हा सीतेची व्यक्तिरेखा साकारणे सहज वाटते. सुजय सोबत काम करणे खूप आनंददायक आहे. तो विनम्र, सौम्य आहे आणि चटकन मदत करतो. आमच्या परफॉर्मन्सबाबत आमच्यात चांगला ताळमेळ आहे. एकमेकांना मोकळीक द्यायला हवी हे आम्ही जाणतो, त्यामुळे कोणत्याही व्यत्ययाशिवाय आम्ही आपापल्या भूमिका समरसून करू शकतो. आमच्यातील या समजूतदारपणामुळे पडद्यावरील आमचे एकत्रित प्रयत्न सुधारतात असे मला वाटते.
4] अशी भूमिका करताना अभिनेत्यामध्ये बदल घडून आल्याचे अनुभव बऱ्याचदा आपण ऐकतो, त्याप्रमाणे, सीतेची भूमिका करताना तुझ्या आयुष्यात काही बदल घडले का?
- सीतेची भूमिका साकारताना माझ्या जीवनात लक्षणीय बदल घडले आहेत. मी आधी खूप उतावळी होते, मला धीर धरता यायचा नाही, पण आता मी मानसिक दृष्ट्या खूप स्थिर झाले आहे, असे मला वाटते. पुनर्निरीक्षण आणि सखोल विचार केल्यामुळे मी बरीच शांत झाले आहे. एकंदरीतच मन समाधानाने भरून गेले आहे. माझ्या जीवनातील या मार्मिक बदलांमुळे माझ्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडला आहे.
बघत रहा, ‘श्रीमद् रामायण’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!
Comments
Post a Comment