पुण्यातील अलका चौकात साकारले प्रभू श्रीरामांचे भव्य शिल्प !

पुण्यातील अलका चौकात साकारले प्रभू श्रीरामांचे भव्य शिल्प !
कोट्यावधी देशवासीयांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले असून प्रभू श्रीराम अयोध्यानगरीत परतले आहेत. या सोहळ्यामुळे देशवासीयांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. या भव्य-दिव्य अशा सोहळ्याचे औचित्य साधत पुणे शहरात प्रख्यात शिल्पकार पद्मश्री श्री. प्रमोदजी कांबळे यांनी प्रभू श्रीरामांचे भव्य शिल्प साकारले.
देशातील विविध भागांत श्रीराम भक्तांकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपल्या संयोजनातून प्रथमच पुणे शहरात प्रभू श्रीरामाचे भव्य मुर्ती शिल्प साकारण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
अयोध्येत जाऊन प्रत्यक्ष त्यांचे दर्शन घेणे आपल्याला जमले नसले, तरी प्रत्यक्षात मुर्ती साकारताना पाहणे, ही पुणेकरांसाठी खास पर्वणी ठरली आहे. आज सकाळी ८ वाजेपासून अलका टॉकीज येथे हे भव्य शिल्प साकारण्यास प्रारंभ करण्यात आला. सर्व पुणेकरांनी हा सुंदर क्षण आपल्या डोळ्यांत आणि कॅमेराच्या डोळ्यांनी टिपून घेतला. तसेच शिल्प साकारणारे प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे यांचे तोंडभरून कौतुक केले. 
यावेळी मा. विरोधी पक्षनेते श्री. दत्ताभाऊ सागरे, माजी नगरसेवक श्री. बाळासाहेब बोडके, कायदेतज्ञ श्री. उल्हास बापट सर, पोलीस अधिकारी कल्याणी पाटोळे, श्री. जितेंद्र भुरुक, कार्याध्यक्ष श्री. प्रदीप देशमुख, महिला अध्यक्ष प्रिया गदादे, युवती अध्यक्ष पूजा झोळे, विद्यार्थी अध्यक्ष श्री. शुभम माताळे, कोथरूड अध्यक्ष श्री. हर्षवर्धन दादा मानकर, सांस्कृतिक अध्यक्ष श्री. विजय राम कदम, महिला अध्यक्ष तेजल दुधाणे, महिला कार्याध्यक्ष सुनीता मोरे, शालिनी जगताप, युवक कार्याध्यक्ष श्री. आनंद सागरे, श्री. मिलिंद वालवडकर, उषा नेटके, श्री. गिरीश मेंगे, श्री. रामदास गाडे, श्री. गोरखनाथ भिकुले, श्री. मुनीर सय्यद, श्री. दुष्यंत जाधव, श्री. राहुल पायगुडे, श्री. बाबू भाई शेख, श्री. शैलेश मानकर, श्री. शंकर तेलंगे, श्री. योगेश वराडे, श्री. विशाल आगरवाल, श्री. रौफ कुरेशी, श्री. विक्रम आगरवाल, श्री. शाम शेळके, श्री. नवनाथ खिलारे, श्री. कांता खिलारे, श्री. अशोक जाधव, श्री. राज पाटील, श्री. विलास मेंगे, ऐश्वर्या मारणे, नयन गायकवाड, लावण्या शिंदे, राधिका वाईकर, श्री. सत्यम पासलकर, श्री. अनिकेत म्होकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला