आगामी काळात जर युद्ध झाले तर ते 'कल्चरल मार्केट' भोवती असेल - लंडन विद्यापीठातील माध्यम अभ्यासक अभिषेक भोसले यांचे मत*

*आगामी काळात जर युद्ध झाले तर ते  'कल्चरल मार्केट' भोवती असेल -  लंडन विद्यापीठातील माध्यम अभ्यासक अभिषेक भोसले यांचे मत* 
पुणे : ज्या प्रमाणे 'सुपर पॉवर' असते त्याप्रमाणे 'सॉफ्ट पॉवर' ही एक संकल्पना आहे. यामध्ये माध्यमांचा वाटा मोठा आणि महत्वाचा आहे. जगात भारतीय चित्रपट हा सांस्कृतिक प्रतिनिधीत्व करतो. तर जागतिक पातळीवर भगवान बुद्ध हे भारताचे आयकॉन आहेत. त्यामुळे भारतीय चित्रपट आणि बुद्ध हे जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधीत्व करतात. चित्रपटातून जी सांस्कृतिक पेरणी केली जाते. ती करायला कित्येक वर्ष जावी लागतात. त्यामुळे आगामी काळात जर युद्ध झाले तर ते  'कल्चरल मार्केट' भोवती असेल, असे मत लंडन विद्यापीठातील विकास अभ्यास विभागात कार्यरत असणारे माध्यम अभ्यासक अभिषेक भोसले यांनी व्यक्त केले.

नालंदा बुद्ध विहार सम्यक उपासक संघाच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 51 वे व्याख्यान पुष्प अभिषेक भोसले यांच्या व्याख्यानाने गुंफन्यात आले. यावेळी भोसले यांचा सत्कार प्राध्यापक डॉ. किशोर पाटील व वनिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखडे, मिलिंद वाकोडे, दीपक म्हस्के, सुधीर आगलावे, मिलिंद मोरे आदी उपस्थित होते.  

भोसले म्हणाले, ज्यांची माध्यमांवर मक्तेदारी त्यांचे  वर्चस्व हे पूर्वी पासून चालत आले आहे. याचे आता राजकीयकरण देखील झालेलेले आहे. काही दिवसांपूर्वी 'न्यूज क्लिक'  या माध्यम संस्थेच्या वतीने एक सर्वे करण्यात आला. ज्यामध्ये समोर आले की भारतात मुख्य प्रवाहात असलेल्या एका ही माध्यम संस्थेत दलित संपादक नाही. किंवा जिथे धोरण ठरवली जातात तिथे एकही दलित पत्रकार नाही. म्हणजे आपल्याकडे अशी व्यवस्था आहे की त्यांना दलित विषय पाहिजे, दलित  मतं पाहिजेत पण दलित  व्यक्ती नको. त्यामुळे भांडवली अर्थव्यवस्थेतील माध्यम ही दलित  आदीवासी, महिला यांना न्याय मिळवून देवू शकत नाही.        

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित आगळे यांनी  केले. तर राज्याचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला