मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये विनोदवीर गौरव मोरे, स्नेहिल मेहरा दीक्षित आणि इंदर साहनी मिळून सादर करणार एक अनोखा ‘हॉरर अॅक्ट’
मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये विनोदवीर गौरव मोरे, स्नेहिल मेहरा दीक्षित आणि इंदर साहनी मिळून सादर करणार एक अनोखा ‘हॉरर अॅक्ट’
या रविवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या कॉमेडी शोमध्ये अष्टपैलू अभिनेता जिमी शेरगिलच्या उपस्थितीत जबरदस्त एन्टरटेन्मेंटसाठी सज्ज व्हा. या भागात शोमधले विनोदवीर धमाल गॅग्ज सादर करून एपिसोडची रंगत वाढवताना दिसतील.
या भागात गौरव मोरे, स्नेहिल मेहरा दीक्षित आणि इंदर साहनी एक अनोखा ‘हॉरर अॅक्ट’ सादर करणार आहेत आणि अर्थात या भयंकर अॅक्टला हे कलाकार गंमतीशीर विनोदी ट्विस्ट देताना दिसतील! या अॅक्टमध्ये गौरव एक उत्साही आणि प्रेमळ नवरा साकारणार आहे. स्नेहिल त्याच्या पत्नीच्या रूपात दिसेल आणि इंदर एका बदमाश केअरटेकरच्या रूपात दिसेल. पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे जोडपे एका हॉटेलमध्ये जाते आणि त्यांच्या लक्षात येते की, ही जागा झपाटलेली आहे. ह्या नवऱ्याला काही अनाकलनीय गोष्टींचा अनुभव येऊ लागतो आणि त्याच वेळी भीतीची भावना वाढू लागते आणि प्रेक्षकांमध्ये हशा पिकू लागतो! पण ही सगळी भुताटकी म्हणजे त्याच्या बायकोची आणि केअरटेकरची त्यांना तिचा वाढदिवस, तिच्या नवऱ्याच्या नजरेपासून दूर, एकत्र साजरा करता यावा म्हणून संगनमताने केलेली योजना असते.
त्यांचा अॅक्ट पाहून प्रभावित झालेला जिमी शेरगिल म्हणतो, “अप्रतिम! तुझे काम, तुझी ऊर्जा आणि पटकथा सारे काही उत्तम होते.”
या अॅक्टविषयी बोलताना स्नेहिल मेहरा दीक्षित म्हणते, “यावेळी हॉररच्या प्रांतात जायचे ठरल्यामुळे मला खूप रोमांचित वाटत होते. या परफॉर्मन्ससाठी तालिम करणे एक साहसच होते, ज्यात इंदर आणि गौरव मला अनपेक्षित सर्प्राइज देत होते. स्पेशल इफेक्टसह काही गंमतीजमती करायला त्यांना खूप मजा आली. या अॅक्टमध्ये हास्य आणि भय तर होतेच पण आपल्या सीमा विस्तारित करण्याचा एक थरार देखील होता, ज्याच्यामुळे हा परफॉर्मन्स अधिक खास बनला. गौरव आणि इंदरसोबत काम करताना फारच मजा आली. त्यांच्या अपार ऊर्जेमुळे प्रत्येक क्षण आनंद आणि मैत्रीने आकंठ भरून गेला!”
बघायला विसरू नका, ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या शनिवारी रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!
Comments
Post a Comment