डॉ. पंकज जिंदल यांनी 30 हजार गुंतागुंतीच्या हॅण्ड सर्जरी केल्या यशस्वी

डॉ. पंकज जिंदल यांनी 30 हजार गुंतागुंतीच्या हॅण्ड सर्जरी केल्या यशस्वी
गरजूंना मदत केल्याने मानसिक समाधान मिळते : डॉ.पंकज जिंदल

पुणे – हात हा मानवी शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मात्र या महत्त्वाच्या अवयवाला जन्मत:च किंवा कोणत्याही अपघातामुळे गंभीर इजा झाली, तर संबंधित व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ही परिस्थिती पाहता मी ऑर्थोपेडिक पदवी प्राप्त केल्यानंतर हॅण्ड सर्जरीमध्ये प्राविण्य मिळवण्याचा निर्णय घेतला. आज मला आनंद होत आहे की, माझ्या गेल्या 30-35 वर्षांच्या वैद्यकीय सेवेत हजारो रुग्णांना यशस्वी उपचार करून नवे जीवन दिले आहे. यामध्येही मी दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व गरजू लोकांना अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देत आहे, याचे मला खूप मानसिक समाधान आहे, अशी माहिती पुण्याचे सुप्रसिद्ध हॅण्ड सर्जन डॉ.पंकज जिंदल यांनी दिली.

हाताच्या 30 हजारांहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण केल्याच्या निमित्त बोलताना डॉ. जिंदल म्हणाले की, मला माझ्या कुटुंबाकडून वैद्यकीय क्षेत्राचा मोठा वारसा मिळाला आहे. त्यामुळे मीही या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. ऑर्थोपेडिक सर्जनची पदवी प्राप्त केल्यानंतर मी पुढील अभ्यासासाठी फ्रान्स, स्वित्झर्लंड येथे गेलो. नंतर मी अमेरिकेलाही गेलो आणि हॅण्ड सर्जरीमध्ये आणखी नैपुण्य मिळवले. या दरम्यान मला भारतापासून युरोप आणि अमेरिकेपर्यंत अनेक उत्कृष्ट शिक्षक भेटले.

त्यांनी सांगितले की, परदेशात मिळालेले उत्कृष्ट शिक्षण आणि अनुभव घेऊन मी मायदेशी परतलो. माझ्या आयुष्यात असे अनेक रुग्ण होते ज्यांच्या हाताची शस्त्रक्रिया जवळजवळ अशक्य होती. मी अनेक लोकांचे कापलेले हात, तुटलेले कोपर आणि छाटलेली बोटे यावर यशस्वी उपचार केले. मी ज्यांच्या हातावर यशस्वी शस्त्रक्रिया केली ते सर्व लोक त्यांचा त्यांचे शिक्षण आणि करिअरमध्ये यश प्राप्त करीत आहेत.

हॅण्ड सर्जरीसाठी माझ्याकडे बऱ्यचदा मजूर आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक येतात. अनेक वेळा त्यांच्याकडे शस्त्रक्रिया किंवा औषधांसाठीही पैसे नसतात. अशा परिस्थितीत रोटरी इंटरनॅशनल, लायन्स क्लब, अग्रवाल क्लब, रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाऊंडेशन आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीने मी अशा लोकांवरही यशस्वीपणे हॅण्ड सर्जरी आणि तत्सम उपचार केले आहेत.

माझ्या 30 वर्षांच्या वैद्यकीय सेवेत मी 30 हजारांहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. ज्यामध्ये हाताला गंभीर दुखापत, फ्रॅक्चर, अर्धांगवायू, हाताला मुंग्या येणे, शारीरिक विकृती, सांधेदुखी, तुटलेल्या नसांसंबंधी समस्या, हात दुखणे, शारीरिक विकृती इत्यादींवर यशस्वी उपचार केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'स्वस्थ भारत' ही संकल्पना पुढे नेण्यासाठी या माध्यमातून योगदान देण्याचा प्रयत्न मी करीत आहे.

आज माझ्याकडे देश-विदेशातून अनेक रुग्ण येतात, जे पूर्णपणे निरोगी होऊन परत जातात. शहरी भागाव्यतिरिक्त मी ग्रामीण भागात जाऊन हाताच्या समस्यांबाबत आरोग्य शिबिरे आयोजित करतो, त्यात रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना रुग्णालयात गरजेनुसार आधुनिक उपचार देतो, असेही डॉ.जिंदल यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला