या शनिवारी ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये कुशल बद्रिके, हेमांगी कवी आणि गौरव मोरे एक वेगळा ट्विस्ट देऊन ‘नवरा बायको’ अॅक्ट सादर करणार*

*या शनिवारी ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ मध्ये कुशल बद्रिके, हेमांगी कवी आणि गौरव मोरे एक वेगळा ट्विस्ट देऊन ‘नवरा बायको’ अॅक्ट सादर करणार*
या वीकएंडला, हास्य, मस्ती आणि मौज यांनी भरलेल्या रजनीसाठी सज्ज व्हा, कारण सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या कॉमेडी शो मधले गुणी विनोदवीर सदाबहार अभिनेत्री मौसमी चटर्जीच्या उपस्थितीत काही धमाल अॅक्ट सादर करणार आहेत.
 
कसलेले कलाकार कुशल बद्रिके, गौरव मोरे आणि हेमांगी कवी ‘नवरा बायको’ या त्यांच्या गोड अॅक्टमधून सगळ्यांना खूप हसवतील, मात्र यावेळी अॅक्टमध्ये एक ट्विस्ट असणार आहे. यावेळी नवरा बायकोसोबत या अॅक्ट मध्ये मंग्या (गौरव मोरे) असणार आहे. या अॅक्टमध्ये कुशल बद्रिके हेमांगीला अगदी आगळ्यावेगळ्या शैलीत मागणी घालताना दिसेल! शॅंपेनच्या ग्लासमध्ये अंगठी ठेवण्याच्या कल्पनेला फाटा देऊन कुशल चक्क वडापावमध्ये अंगठी लपवताना दिसेल. कुशल हेमांगीला अगदी मागणी घालणार इतक्यात मंग्या मध्ये कडमडतो आणि हेमांगीवर छाप पाडण्यासाठी सगळे प्रयत्न करतो. अगदी थेट सुनील शेट्टीच्या आवाजात ‘तुम मुझे भूल जाओ, ये मैं होने नहीं दूंगा’ हा ‘धडकन’चा डायलॉग सुद्धा मारतो! त्याची ही धडपड पाहताना सगळ्यांना खूप हसू येणार आहे!
 
आपल्या या आगामी परफॉर्मन्सविषयी बोलताना गौरव मोरे म्हणतो, “माझ्या आगामी परफॉर्मन्सबाबत मी रोमांचित आहे. यावेळी मी मंग्या साकारणार आहे, जो कुशलला बाजूला करून हेमांगीचे हृदय जिंकण्यासाठी स्वतः खटपट करतो. नाकरलेल्या पात्राची ही भूमिका करताना फार मजा आली, खास करून त्यातील ट्विस्ट्समुळे! मौसमी चटर्जी या गुणी अभिनेत्रीसमोर परफॉर्म करताना धन्यता वाटली. आणि हेमांगी कवी आणि कुशल बद्रिके यांच्याबरोबर काम करताना तर नेहमीच खूप धमाल येते.”
 
अवश्य बघा, ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ या शनिवारी रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला