ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्‍कूल तर्फे तीन दिवसीय अॅस्‍ट्रो फेअर - गो कॉस्‍मो उपक्रमाचे यशस्वी आयोजन

ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्‍कूल तर्फे तीन दिवसीय अॅस्‍ट्रो फेअर - गो कॉस्‍मो उपक्रमाचे यशस्वी आयोजन 
पुणे,ता.२७: ताथवडे येथील ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्‍कूल तर्फे तीन दिवसीय उपक्रम अॅस्‍ट्रो फेअर - गो कॉस्‍मोचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. हा तीन-दिवसीय उपक्रम सर्व वयोगटातील अंतराळ उत्‍साहींसाठी आयोजित करण्यात आला होता. पुण्‍यातील ऑर्किड्स तथवडे कॅम्‍पस येथे २४ मे ते २६ मे पर्यंत आयोजित करण्‍यात आलेल्या या उपक्रमद्वारे खगोलशास्‍त्र, विश्‍वविज्ञान आणि भौतिकशास्‍त्र क्षेत्रातील रोमांचक प्रवासाचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.

अॅस्‍ट्रो फेअर - गो कॉस्‍मो विद्यार्थ्‍यांमध्‍ये आणि प्रौढ व्‍यक्‍तींमध्‍ये अंतराळ संशोधन, विज्ञान व तंत्रज्ञानाप्रती आवड निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. एलियन एन्‍काऊंटर, प्‍लॅनेटरी पॉंडर, ग्रॅव्हिटेशनल जिम, कॉमेट क्राफ्टिंग, कॉस्मिक कॉलिडर, व्‍हर्च्‍युअल वोयागर, स्‍टेलर स्‍पेक्‍टॅकल, स्‍टार सीकर आणि स्पिनिंग स्‍पेसशीप वर्कशॉप अशा सर्वसमावेशक क्रियाकलापांसह सहभागींना कॉसमॉसच्‍या रहस्‍यांचा अभ्‍यास करण्‍यासोबत महत्त्‍वपूर्ण विचारसरणी आणि समस्‍या निवारण कौशल्‍ये वाढवण्‍याची संधी मिळाली.

अशी माहिती ऑर्किड्स स्कूल येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. यावेळी ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्‍कूलचे अकॅडेमिक्‍स-अॅस्‍ट्रोनॉमीचे उपाध्‍यक्ष अजित सिंग,ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्‍कूलच्‍या अकॅडेमिक्‍सच्‍या वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष सुमित्रा गोस्‍वामी,ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्‍कूलच्‍या तथवडे कॅम्‍पसच्‍या मुख्‍याध्‍यापिका उषा मूर्ती आणि ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्‍कूलच्‍या अकॅडेमिक्‍स-स्‍टुडण्‍ट वेलफेअरचे उपाध्‍यक्ष हर्ष गुप्‍ता उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला