छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह व छत्रपती युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त आयोजनातून साताऱ्यातील दहीहंडी उत्सवात अभिनेत्री झरीन खान यांची विशेष उपस्थिती
छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह व छत्रपती युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त आयोजनातून साताऱ्यातील दहीहंडी उत्सवात अभिनेत्री झरीन खान यांची विशेष उपस्थिती
सातारा | 6 सप्टेंबर 2026
साताऱ्यात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाला बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान यांनी विशेष उपस्थिती लावली. झरीन खान यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला बॉलिवूडची खास रंगत लाभली.
यावेळी दहीहंडी उत्सवात मोठ्या संख्येने नागरिक, गोविंदा पथके आणि युवा वर्ग सहभागी झाला होता. पारंपरिक उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
झरीन खान यांनी उपस्थित नागरिक आणि गोविंदा पथकांना शुभेच्छा देत दहीहंडीच्या उत्साहात सहभाग घेतला. त्यांच्या उपस्थितीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
साताऱ्यातील दहीहंडी उत्सवाला बॉलिवूडचा ग्लॅमर आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक उत्साहाची अनोखी सांगड पाहायला मिळाली.
यावेळी श्री सुनील काटकर ,श्री सुशील मोझर अॅड. संजीवनी गुजर-पाटील यांच्यासह इतर सर्व सर्व सहकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार..!
Comments
Post a Comment