स्व अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कोंढवा येथे मुस्लिम समाजातील नागरिकांसाठी मोफत वधू वर परिचय मेळावा संपन्न

 स्व अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त

कोंढवा येथे मुस्लिम समाजातील नागरिकांसाठी मोफत वधू वर परिचय मेळावा संपन्न 






राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग व अॲड. आयुब शेख  विचार मंच. रहबर सोशल फाउंडेशन यांच्या वतीने कोंढवा येथे न्यू डॉन हायस्कूलच्या प्रांगणात मुस्लिम समाजातील उच्चशिक्षित, शिक्षित, अविवाहित, घटस्फोटीत, विधवा /विधुर नागरिकांसाठी मोफत  वधु वर परिचय मेळावा घेण्यात आला होता.

 याचे उद्घाटन आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यामध्ये पुणे,पिंपरी, मुंबई, ठाणे, उस्मानाबाद, कोल्हापूर, भिवंडी, सोलापूर, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, लोणावळा, महाबळेश्वर, इथून मोठ्या संख्येने वधू-वर पालक उपस्थित होते. यावेळी आमदार चेतन तुपे म्हणाले लग्न समारंभ म्हटलं तर लाखोंच्या खर्च होतो सर्वसामान्य नागरिकांना हा खर्च झेपत नाही समाजामध्ये अशा वधू वर मेळावा घेणे व कमीत कमी खर्चात लग्न होणे ही काळाची गरज आहे. यावेळी  संयोजकांच्या वतीने वधू वर मेळाव्यामध्ये पालक आणि उमेदवारांना प्रत्यक्ष संवाद साधून नाव नोंदणी करून सुमारे साडेसहा हजार बायोडाटा जमा करण्यात आले. या मेळाव्यात एकाच वेळी आठ जणांचे विवाह जुळवण्यात आले आहे. विविध राज्यातून वीस हजार मुस्लिम बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष ॲड. आयुब शेख यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष पुणे शहर टॉप फाउंडेशनचे फैसल रिश्तेवाला, मुस्लिम  बँकेचे संचालक बबलू सय्यद, बाप्पुसाहेब कांबळे, रश्मी कांबळे, अजीम परफ्युम वाले, अब्दुल कय्युम, समीर सय्यद, यास्मिन शेख, रुकसाना इनामदार, आदींनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

नाटक हा समाजाचा आरसा: पद्मश्री सतीश आळेकर

Economic Development today is largely dependent upon the legal landscape of the country: Akshat Khetan