सुपरस्टार सिंगर 3 च्या सेमी-फिनालेमध्ये अथर्व बक्षीच्या जबरदस्त परफॉर्मन्सनंतर महान संगीतकार
सुपरस्टार सिंगर 3 च्या सेमी-फिनालेमध्ये अथर्व बक्षीच्या जबरदस्त परफॉर्मन्सनंतर महान संगीतकार विजू शाह यांनी त्याला आलिंगन दिले या वीकएंडला, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने स्वतः विकसित केलेल्या सुपरस्टार सिंगर या लहान मुलांच्या गायन रियलिटी शोच्या तिसऱ्या सीझनची उपांत्य फेरी रंगणार आहे. स्पर्धेतील गुणी छोटे उस्ताद आपल्या गायकीने सर्वांना प्रभावित करून सुपरस्टार सिंगर 3 चा किताब जिंकण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करताना दिसतील. महान संगीतकार विजू शाह यांच्या उपस्थितीमुळे हा सेमी फिनाले अधिकच रंगतदार होऊन जाईल. या शनिवारी ‘कल्याणजी-आनंदजी’ विशेष भागात बच्चा पार्टीला प्रोत्साहन देण्यासाठी कल्याणजींचे सुपुत्र विजू शाह प्रत्यक्ष हजर असणार आहेत. यावेळी ‘अकेले हैं चले आओ’ आणि ‘श्रीवल्ली’ ही गाणी सादर करून झारखंडच्या अथर्व बक्षी या छोट्या उस्तादाने पुन्हा एकदा सगळ्यांना मंत्रमुग्ध करून सोडले. त्याचा आकर्षक आवाज ऐकून विजू शाह विजू शाह स्वतःचा आनंद रोखू शकले नाहीत आणि मंचावर जाऊन त्यांनी अथर्वला घट्ट मिठी मारून आपली भावना व्यक्त केली. अथर्वला दा...