कढीपत्ता'मध्ये रिद्धी कुमार बनली भूषण पाटीलची नायिका७ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित
'कढीपत्ता'मध्ये रिद्धी कुमार बनली भूषण पाटीलची नायिका ७ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत सगळीकडेच 'कढीपत्ता' या आगामी मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे 'कढीपत्ता' चित्रपटाची नायिका कोण? या चर्चेला जणू उधाण आले आहे. रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना या चित्रपटातील नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये 'कढीपत्ता'मधील नायिकेचा चेहरा रिव्हील करण्यात आला आहे. ७ नोव्हेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. युवान प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या 'कढीपत्ता' चित्रपटाची निर्मिती स्वप्नील युवराज मराठे यांनी केली आहे. 'कढीपत्ता'ची कथा विश्वा यांनी लिहिली असून दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. निर्माते स्वप्नील युवराज मराठे आणि दिग्दर्शक विश्वा यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. पदार्पणातच एक अनोखी प्रेमकथा रसिकांसमोर आणण्याचे आव्हान विश्वा यांनी स्वीकारले. नायिकेचा चेहरा न दाख...