Posts

Showing posts from June, 2025

स्वच्छतेचे महत्व मनामनात ठसवणारा चित्रपट ‘अवकारीका’ लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Image
*स्वच्छतेचे महत्व मनामनात ठसवणारा चित्रपट ‘अवकारीका’ लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला* *पुणे -* पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा स्वच्छता हा विषय घेऊन रेडबड मोशन पिक्चर्स द्वारा ‘अवकारीका’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वच्छता केवळ घर किंवा परिसराची नाही तर मनामनातील स्वच्छता दूर करण्याचा संदेश देत आणि स्वच्छतेचा वसा प्रत्येकाच्या मनामनांमध्ये ठवसणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडल्याशिवाय राहणार नाही. या सिनेमात एकीकडे स्वच्छतेचे महत्व तर अधोरेखित केलेच आहे, परंतु स्वच्छतेच्या प्रक्रियेतील महत्वाचा दुवा असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संघर्षाची गाथा अत्यंत ज्वलंत पद्धतीने मांडली आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये स्वच्छतेविषयी एक परिवर्तनवादी दृष्टिकोन तयार करेल, असा विश्वास या चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला. चित्रपटाविषयी माहिती देण्यासाठी पुण्याच्या श्रमिक पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली, त्या वेळी  या सिनेमाचे निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक सीए अरविंद भोसले यांच्यासह निर्माते अरुण जाधव, भारत टिळेकर, डीओ...

अखेर जुलै अखेर "विश्रामबागवाड्याचा दर्शनी भाग" नागरिकांसाठी खुला होणार - मुख्य अभियंता युवराज देशमुख यांची माहिती.

Image
अखेर जुलै अखेर "विश्रामबागवाड्याचा दर्शनी भाग" नागरिकांसाठी खुला होणार - मुख्य अभियंता युवराज देशमुख यांची माहिती. संदीप खर्डेकर यांच्या पाठपुराव्याला यश !! विश्रामबागवाडा हे पुण्याचे वैभव असून 1750 साली बाजीराव पेशवे ( दुसरे ) यांनी हरी पंत भाऊ फडके यांच्याकडुन विकत घेतली व 1810 साली येथे भव्य विश्रामबागवाडा बांधला. 1820 मध्ये पेशव्यांनी वाडा खाली केला व तेथे पेशव्यांच्या दक्षिणा फंडातून वेद शाळा सुरु झाली , पुढे येथे डेक्कन कॉलेज सुरु करण्यात आले व 1880 मध्ये वाड्याचा पूर्वेकडचा भाग जळाला. 1930 ते 1960 पुणे महानगरपालिका विश्रामबाग वाड्यात हलविल्याचे उल्लेख सापडतात.साधारण 1990 मध्ये वाड्याचे संवर्धन करून हा ऐतिहासिक वारसा जपण्यात आला. असा सोनेरी ऐतिहासिक वारसा असलेल्या वाड्याचे विगत दोन वर्षे जतन व संवर्धानाचे  ( Restoration ) काम पुणे मनपाच्या प्रकल्प विभागांतर्गत येणाऱ्या हेरिटेज सेल च्या माध्यमातून सुरु असल्याचे संदीप खर्डेकर यांच्या निदर्शनास आले.हे काम पूर्ण होण्यास होणारा विलंब बघता याबाबत आता आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष...

'जारण'ने साजरी केली सक्सेस पार्टी

Image
*'जारण'ने साजरी केली सक्सेस पार्टी* *तीन आठवड्यांत सहा कोटींहून अधिक कमाई* मराठी चित्रपट ‘जारण’ने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करत केवळ समीक्षक, चित्रपटसृष्टी नव्हे, तर सर्वसामान्य प्रेक्षकांकडूनही भरभरून प्रेम मिळवले  आहे. अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेतही ‘जारण’ने आपल्या वेगळ्या आशयामुळे चित्रपटगृहात आपली खास जागा निर्माण केली आहे. प्रदर्शित होऊन तीन आठवडे उलटले असतानाच ‘जारण’ने सुमारे ६ कोटींच्या वर कमाई केली आहे. हा प्रवास केवळ आकड्यांपुरता मर्यादित न राहता, भावनिक गुंतवणूक, आशयघन कथा आणि प्रेक्षकांकडून तोंडभरून कौतुक या सगळ्यांचा एकत्रित मिलाफ आहे. चित्रपटाला मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे ‘जारण’चे शोजही अनेक ठिकाणी वाढवण्यात आले. या यशाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच एका भव्य सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आले. यामध्ये ‘जारण’ची संपूर्ण टीम, निर्माते, कलाकार मंडळी यांच्यासह चित्रपटसृष्टीतील काही मान्यवरांनी उपस्थिती लावली.   या वेळी दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते म्हणतात, ''जारण’सारखा सिनेमा बनवणे हे स्वप्न होते आणि आज जेव्हा प्रेक्षक त्...

सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (एससीडीएल) ने बेंगळुरूमध्ये डॉ. अर्जुन वैद्य यांच्या अंतर्दृष्टीपूर्ण करिअर सेमिनारसह रौप्य महोत्सव केला साजरा

Image
सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (एससीडीएल) ने बेंगळुरूमध्ये डॉ. अर्जुन वैद्य यांच्या अंतर्दृष्टीपूर्ण करिअर सेमिनारसह रौप्य महोत्सव केला साजरा  "आऊट ऑफ क्लासरूम" अनुभवामुळे माणूस संपन्न होतो - डॉ. अर्जुन वैद्य यांचे मार्गदर्शन  बेंगलोर २८ जून २५ – सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बेंगळुरूमध्ये डॉ. अर्जुन वैद्य यांचे एक विशेष करिअर ग्रोथ सेमिनार आयोजित करण्यात आले. डॉ. स्वाती मुजुमदार यांच्या मार्गदशनाखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात डॉ. अर्जुन वैद्य यांनी प्रमुख वक्ता म्हणून “भारतात सतत बदलणाऱ्या रोजगार बाजारासाठी स्वतःला नव्याने घडविण्याकरिता" या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले " सोशल मीडियाचा जमाना असल्याने, प्रत्येकाने सोशल मीडियावर असणे व ते नवीन माहितीसह अपडेट ठेवणे महत्वाचे आहे. हि एक डिजिटल ओळख झाली आहे. स्वतःसाठी संधी तयार करताना सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहून बऱ्याच संधी मिळवता येतात. कोणतेही काम करताना त्याबद्दल असणारी तीव्र आवड गरजेची आहे, आणि हीच तीव्र आवड तुम्हाला प्रवास सुकर करण्यामध्ये मदत...