सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (एससीडीएल) ने बेंगळुरूमध्ये डॉ. अर्जुन वैद्य यांच्या अंतर्दृष्टीपूर्ण करिअर सेमिनारसह रौप्य महोत्सव केला साजरा
सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (एससीडीएल) ने बेंगळुरूमध्ये डॉ. अर्जुन वैद्य यांच्या अंतर्दृष्टीपूर्ण करिअर सेमिनारसह रौप्य महोत्सव केला साजरा


"आऊट ऑफ क्लासरूम" अनुभवामुळे माणूस संपन्न होतो - डॉ. अर्जुन वैद्य यांचे मार्गदर्शन
बेंगलोर २८ जून २५ – सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बेंगळुरूमध्ये डॉ. अर्जुन वैद्य यांचे एक विशेष करिअर ग्रोथ सेमिनार आयोजित करण्यात आले. डॉ. स्वाती मुजुमदार यांच्या मार्गदशनाखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात डॉ. अर्जुन वैद्य यांनी प्रमुख वक्ता म्हणून “भारतात सतत बदलणाऱ्या रोजगार बाजारासाठी स्वतःला नव्याने घडविण्याकरिता" या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले " सोशल मीडियाचा जमाना असल्याने, प्रत्येकाने सोशल मीडियावर असणे व ते नवीन माहितीसह अपडेट ठेवणे महत्वाचे आहे. हि एक डिजिटल ओळख झाली आहे. स्वतःसाठी संधी तयार करताना सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहून बऱ्याच संधी मिळवता येतात. कोणतेही काम करताना त्याबद्दल असणारी तीव्र आवड गरजेची आहे, आणि हीच तीव्र आवड तुम्हाला प्रवास सुकर करण्यामध्ये मदत करते. व्यवसायात यशश्वी होण्याकरिता प्रत्येक गोष्टीची तक्रार न करता, या अडचणीच्या स्ठीती मधील सुवर्ण संधी घेऊन तुम्ही नवीन व्यवसाय उभारू शकता आणि कौशल्य, योग्यता, सर्जनशीलता, सतत पाठपुरावा, विश्वास यामध्ये सातत्य ठेवून तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकता."
बंगलोर मध्ये या सुवर्णसंधीला उपस्थितांकडून उतस्फुर्थ प्रतिसाद मिळाला. यावेळी सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंगचे एल्युमिनिआय, आपल्या करिअरची पुनर्रचनाकरू इच्छिणारे नोकरदार, पदवीधर, विविध नोकरवर्गातील लोक मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच निखिल वैद्य, आशिष पंडिता, जय कोल्हे हे या वेळी उपस्थित होते. सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) ही भारतातील सर्वात मोठ्या खाजगी दूरस्थ शिक्षण शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. २००१ मध्ये स्थापित, एससीडीएल भारत आणि परदेशातील हजारो विद्यार्थ्यांना लवचिक, उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करण्यात अग्रणी आहे. रौप्य महोत्सवी वर्ष (ऑनलाइन शिक्षणात २५ वर्षे उत्कृष्टता) साजरे करत असताना, नाविन्यपूर्ण दूरस्थ शिक्षण कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना सक्षम बनविणारा आणि करिअर घडवनारा हा प्रवासाआहे. पुण्याच्या मध्यभागी स्थित, एससीडीएल अत्याधुनिक पायाभूत सुविधा, कुशल आणि समर्पित प्राध्यापक आणि प्रगत डिजिटल शिक्षण उपलब्ध आहे. विविध क्षेत्रांमध्ये उद्योग-संबंधित पदव्युत्तर पदविका कार्यक्रम ऑफर करण्यासाठी एक मजबूत प्रतिष्ठा निर्माण केली आहे. वैयक्तिक शिक्षण कार्यक्रमांव्यतिरिक्त, एससीडीएल विशेष कॉर्पोरेट कार्यक्रम ऑफर करण्यासाठी आघाडीच्या स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहयोग देखील करते, याचा एक भाग म्हणून हे सेमिनार घेण्यात आले.
ग्रामीण भागातील संधींबद्दल बोलताना वैद्य म्हणाले "ग्रामीण भागातही खूप व्यवसायीक संधी आहेत, तसेच जागतिक स्थरावर देखील काम करताना त्यातील मुद्याच्या गोष्टीन करीत व्यावसाय सुरु करून तुम्ही प्रगती करू शकता. सतत लोकांच्या भेटी - गाठी घेतल्याने संपर्क वाढतो त्यातुनच तुम्हाला बाजारातील व्यवसायाचे गूढ रहस्य माहित होते. "आऊट ऑफ क्लासरूम" अनुभवामुळे माणूस संपन्न होतो.मोठ्या कंपनी मध्ये काम करत असताना कंपनीच्या मालकाची जी दुरदृष्टी असते ती कदाचीत आपल्याकडे एक कामगार म्हणनू नसते, म्हणून नोकरी करताना स्वतःला कामगार म्हणून न बघता एक संस्था मोठी कंपनी म्हणून बघा आणि तसेच निर्णय देखी घ्या. व्यवसाय करण्यासाठी जे काही करायांचे मनात आहे ते आज, आताच करा खूप वेळ त्यात वाया घालवू नका. कोणत्याही उत्पादनामध्ये ग्राहक हाच शेवटचा वापरकर्ता असतो ग्राहकांकडूनच तुम्हाला व्यवसायातील त्रुटी कळू शकतात."
एआय बद्दल बोलताना ते म्हणाले," एआय बद्दल भीती बाळगली तर तुम्ही ते वापरू शकणार नाही. एआय धोरण बनवू शकतो पण ते राबवू शकत नाही त्या करीत माणसांची गरज भासते. स्वतःला नवनवीन गोष्टींशी अद्यावत ठेवा, खूप गोष्टी शिकण्यासाठी उपलब्ध आहेत. भारतात काम करा, भारतात खूप संधी आहे. जेव्हा कोणीच तुमच्यावर विश्वर ठेवत नाही तेव्हा तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून सतत पुढे जा."
एक उत्कृस्ट टीम कशी बनवावी या बद्दल बोलताना ते म्हणाले," एक उत्कृस्ट टीम करीत कोणताच फॉर्मुला नाही, हि सतत आणि अविरत चालणारी गोस्ट आहे. एका टीम मध्ये सामावण्यासाठी त्या टीमच्या सांस्कृतिक घडणीशी एकरूप व्हावे लागते."
अर्जुन वैद्य यांनी स्वतःच्या आजारावर मात करत, त्याच्या पारंपरिक व्यवसाय कसा सुरु केला या बदल माहिती दिली. करोडो रुपये शिक्षणावर खर्च केल्या नांतर नोकरीतून मिळणारे तोकडे उत्पन्न, नोकरीची सवय लागल्याने स्टार्टअप सुरु करताना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या अडचणी यावर त्यांनी प्रकाश टाकला. त्यामध्ये त्यांना इ कॉमर्सचा व्यवसाय करत असताना आलेल्या अनुभवाबद्दलही त्यांनी माहिती दिली.
या कार्यक्रम नांतर एच आर राऊंड टेबल कॉन्फरन्स घेण्यात आली. डेल कार्नेगी प्रशिक्षण कार्यशाळा व पुरस्कार सोहळा संपन्न झाला. हा कार्यक्रम एससीडीएलच्या २५ वर्षां यशस्वी वाटचालीच्या निमित्ताने घेण्यात आला व देशभरातील तरुण व्यावसायिक, विद्यार्थ्यांसाठी ही एक मोफत सुवर्णसंधी मिळाली.
Comments
Post a Comment