प्लेसेंटा प्रिव्हिया आणि ॲक्रिटाचे निदान झालेल्या तीन गुंतागुंतीच्या गर्भवतीवर यशस्वी उपचार
प्लेसेंटा प्रिव्हिया आणि ॲक्रिटाचे निदान झालेल्या तीन गुंतागुंतीच्या गर्भवतीवर यशस्वी उपचार
पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश
पुणे: गर्भधारणेसंबंधीत गुंतागुंतीचा सामना करणाऱ्या तीन महिलांवर यशस्वी उपचार करत अंकुरा हॉस्पिटलने एक वेगळी ओळख प्रस्थापित केली. ही प्रकरणे दुर्मिळ आणि आव्हानात्मक होती ज्याला सेंट्रल प्लेसेंटा प्रिव्हिया विथ ॲक्रिटा (एक गंभीर गर्भधारणा गुंतागुंत आहे ज्यात गर्भाशयाच्या भिंतीमध्ये प्लेसेंटा घुसतो व सहजासहजी सुटत नाही) असे म्हणतात. पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलच्या डॉ. सुप्रिया पुराणिक (संचालक – 9M फर्टिलिटी आणि वरिष्ठ सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग, अंकुरा हॉस्पिटल, पुणे) आणि डॉ. निखिल हिरेमठ (ऍनेस्थेसिया तसेच क्रिटिकल केअर युनिटचे प्रमुख) यांच्या नेतृत्वाखाली गुंतागुंतीच्या गर्भधारणा असलेल्या तीन महिलांवर यशस्वी उपचार करण्यात आले.
शारीरिक अस्वस्थता, पुरेशी वाढ न झालेली बाळं, गर्भावस्थेतील मधुमेह, गर्भावस्थेतील उच्च रक्तदाब, प्रसूतीसंबंधीत गुंतागुंत आणि हार्मोनल असंतुलन तसेच भावनिक चढ-उतारांकडे गरोपणात काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा थेट परिणाम न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावर होतो. अंकुरा हॉस्पिटल्सने या अवस्थेने ग्रस्त असलेल्या महिलांच्या तीन गुंतागुंतीची प्रकरणे प्रभावीपणे हाताळली आहेत, तिन्ही रुग्णांसाठी सुरक्षित प्रसूती सुनिश्चित केली आहे.
पुण्यातील 33 वर्षीय गृहिणी श्रीमती सोनिया गुप्ता यांना गर्भधारणेच्या 32 व्या आठवड्यात जास्त रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाच्या प्लेसेंटा प्रिव्हियावर यशस्वी उपचार देखील करण्यात आले आणि ती आनंदाने तिच्या निरोगी बाळासह नवजात अतिदक्षता विभागातून (NICU) बाहेर पडली. त्याचप्रमाणे मनीषा चतुर्वेदी (नाव बदलले आहे)*, या औरंगाबाद येथील 30 वर्षीय गृहिणीला तिच्या गरोदरपणाच्या 19 व्या आठवड्यात प्लेसेंटा ॲक्रिटाची समस्या उद्भवली जिथे प्लेसेंटा गर्भाशयाच्या भिंतीतून बाहेर गेली होती आणि मूत्राशयास जोडली जाण्याची शक्यता होती आणि या रुग्णाची तिची गर्भधारणा 19 आठवड्यात पर्यंतच पुढे नेली. त्यानंतर रुग्णाला पुण्याला हलवले आणि त्याला हिस्टेरेक्टोमी करण्याचा सल्ला देण्यात आला,ज्याच गर्भाशय वाचविण्याचा यशस्वी प्रयत्न झाला.
पुण्यातील रुपाली तनेजा या ३० वर्षीय गृहिणीलाही रक्तस्त्राव नियंत्रित करण्यासाठी आपत्कालीन शस्त्रक्रिया करावी लागली. गर्भाशयाचा भाग जिथे प्लेसेंटा जोडलेला होता तो भाग काढून टाकण्यात आला. तिन्ही रुग्णांना अंकुरा हॉस्पिटलमध्ये त्वरित आणि प्रभावी उपचार मिळाले.
डॉ. सुप्रिया पुराणिक(संचालक – 9M फर्टिलिटी आणि वरिष्ठ सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग, अंकुरा हॉस्पिटल, पुणे) सांगतात की, प्लेसेंटा ॲक्रिटा ही गर्भधारणेची एक गंभीर गुंतागुंत आहे जी गर्भाशयाच्या भिंतीमध्ये असामान्य प्लेसेंटामुळे उद्भवते. प्लेसेंटा प्रिव्हिया आणि प्लेसेंटा ॲक्रिटा या दोन गर्भधारणेसंबंधीत गुंतागुंत आहेत ज्या दुर्मिळ असल्या तरी आई आणि बाळ दोघांनाही गंभीर धोका निर्माण करतात. ही परिस्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा प्लेसेंटाचे(वाढत्या गर्भाचे पोषण करणारा महत्वाचा अवयव) योग्य रोपण होत नाही. ज्यामुळे संभाव्य गुंतागुंत होऊ शकते. प्लेसेंटा प्रिव्हिया तुलनेने दुर्मिळ असून 0.3% ते 0.5% गर्भधारणेमध्ये आढळतात. पहिल्या तिमाहीतील गर्भधारणेमध्ये प्लेसेंटा प्रिव्हिया अधिक सामान्य आहे आणि सामान्यतः तिसऱ्या तिमाहीत परिस्थिती सुधारते. याउलट, प्लेसेंटा ॲक्रिटा आणखी दुर्मिळ असून 2,500 गर्भधारणेपैकी अशाप्रकारची 1 घटना आढळते.या परिस्थितीची नेमकी कारणे आजवर समजलेली नाहीत. गर्भधारणेदरम्यान जर वार खाली सरकून गर्भाशयाचे मुख संपूर्णपणे किंवा काही प्रमाणात झाकले गेल्यास त्या स्थितीला 'प्लॅसेंटा प्रेव्हिया' असे म्हणतात. हे आधीच्या गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया, एकाधिक गर्भधारणा किंवा गर्भधारणेचे वाढत्या वयामुळे उद्भवू शकते. प्लेसेंटा प्रिव्हियामुळे जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो, जो जीवघेणा ठरु शकतो. प्लेसेंटा ॲक्रिटामुळे प्रसूतीदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतो आणि रक्तस्त्राव नियंत्रित करण्यासाठी हिस्टरेक्टॉमीची आवश्यकता भासू शकते, ज्यामुळे स्त्रीची प्रजनन क्षमता कमकुवत होते. या परिस्थितीमुळे अकाली प्रसुती, कमी वजन आणि इतर गुंतागुंत होऊ शकतात ज्यामुळे बाळाला धोका असतो.
डॉ. पुराणिक पुढे सांगतात की, वरील परिस्थितींच्या व्यवस्थापनासाठी अत्यंत कुशल वैद्यकीय पथकाची आवश्यकता असते ज्यामध्ये प्रसूतीतज्ज…
Comments
Post a Comment