इंडियन आयडॉलच्या ‘थिएटर राऊंड’मध्ये अतिथी परीक्षक पद्मश्री कविता कृष्णमूर्तीच्या आगमनाने वातावरण आणखीनच संगीतमय झाले!*
*इंडियन आयडॉलच्या ‘थिएटर राऊंड’मध्ये अतिथी परीक्षक पद्मश्री कविता कृष्णमूर्तीच्या आगमनाने वातावरण आणखीनच संगीतमय झाले!*
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल हा गायन रियालिटी शो म्हणजे संगीताचे सगळ्यात मोठे घराणेच आहे जणू. हा शो देशातील उगवत्या गायकांना आपली प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी एक राष्ट्रीय मंच प्रदान करतो. या सत्रात देशातील काना-कोपऱ्यातून आलेले प्रतिभावान गायक प्रेक्षकांच्या मनात नानाविध भावना जागृत करतील अशी अपेक्षा आहे. स्पर्धा अटीतटीची झाली आहे आणि टॉप 15 मध्ये स्थान मिळवण्यासाठी स्पर्धक प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. इंडियन आयडॉल 14 मध्ये या वीकएंडला कुमार सानू आणि विशाल दादलानी या परीक्षकांसोबत महान गायिका कविता कृष्णमूर्ती परीक्षक म्हणून उपस्थित असणार आहे.
पद्मश्री कविता कृषमूर्तीने आपल्या आवाजाने भारतीय चित्रपटांमधील अनेक गाणी अजरामर केली आहेत. तिच्या गाण्यांच्या अनमोल खजिन्यातील काही रत्ने म्हणजे- ‘डोला रे डोला’, ‘आज मैं उपर’, ‘मेरा पिया घर आया’, ‘हवाहवाई’, ‘निंबूडा’ आणि ‘आंखों की गुस्ताखियां’ ही गाणी! इंडियन आयडॉलच्या या भागात कविता कृष्णमूर्तीने प्रत्येक स्पर्धकाशी संवाद साधला, त्यांना संगीतविषयक मौलिक सूचना दिल्या तसेच आपल्याला अनेक गाण्यांमध्ये साथ देणारा गायक कुमार सानू आणि अन्य परीक्षक विशाल दादलानी यांच्याशी देखील तिने खूप गप्पा मारल्या.
थिएटर फेरीत आपले संगीत विषयक ज्ञान शेअर करताना तिने या प्रतिष्ठित गायन रियालिटी शोचे आणि त्याच्या परंपरेचे खूप कौतुक केले. ती म्हणाली, “गेल्या काही वर्षांमध्ये इंडियन आयडॉलमधून उदयास आलेले अनेक प्रतिभावान कलाकार पाहताना खरोखर धन्यता वाटते. या शो ने देशाला काही उत्कृष्ट गायक दिले आहेत. या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये गाण्याबद्दलची जी निष्ठा आणि ध्यास रुजवला जातो, त्याचे मला कौतुक वाटते. इंडियन आयडॉल 14 मध्ये थिएटर फेरीसाठी अतिथी परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्यच मानते. कुमार जी आणि विशाल जी यांना स्पर्धेतील टॉप 15 स्पर्धक निवडण्यात मदत करणे हे माझ्यासाठी भाग्याचे आणि तितकेच जबाबदारीचे देखील काम आहे. संगीतात जीवन पालटून टाकण्याची शक्ती असते असा माझा विश्वास आहे आणि इंडियन आयडॉल 14 च्या मंचावर ही जादू उलगडताना पाहणे फार रोमांचक आहे.”
इंडियन आयडॉल 14 च्या थिएटर फेरीमध्ये कविता कृष्णमूर्तीचे गाण्याविषयीचे मौलिक विचार ऐकायला विसरू नका.
Comments
Post a Comment