प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया
स्कॉटलंड शहर, वॉरविक विद्यापीठ, लंडन स्कुल ऑफ बिझनेस, वेस्ट मिनिस्टर युनिव्हर्सिटी, ग्रीनवीच युनिव्हर्सिटी आदी ठिकाणी भेट देऊन सूर्यदत्तच्या विद्यार्थ्यांना ऑफर करता येणार्या संभाव्य सहयोगी कार्यक्रमांवर चर्चा व सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करणार आहेत.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, "ऑक्सफर्ड विद्यापीठ ही ऑक्सफर्डशायर, इंग्लंड येथील उच्च शिक्षण देणारी प्रतिथयश व जगातील महान विद्यापीठांपैकी एक आहे. अशा या महान संस्थेकडून सलग दुसऱ्यांदा निमंत्रित होणे आनंदाची गोष्ट आहे. ऑक्सफर्डचा सुनियोजित कॅम्पस आणि भव्य ग्रंथालय पाहून प्रभावित झालो. ऑक्सफर्ड येथील अद्ययावत सोयीसुविधा आम्ही सूर्यदत्त येथे शक्य तितक्या प्रमाणात राबविण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून विद्यार्थ्यांना समान शिक्षण तसेच प्रचलित शिक्षण अनुभवायला मिळेल. सूर्यदत्त संस्थेने स्थापनेपासून गेल्या २५ वर्षांत सातत्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, त्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण व जागतिक स्तरावर काम करण्यासाठी व्यासपीठ दिले आहे
Comments
Post a Comment