मणिपाल हॉस्पिटल बाणेर तर्फे स्तनांच्या कर्करोगा विषयी जागरुकता निर्माण करण्याच्या हेतूने ‘ऑल विमेन बाईक रॅली’ चे आयोजन

मणिपाल हॉस्पिटल बाणेर तर्फे स्तनांच्या कर्करोगा विषयी जागरुकता निर्माण करण्याच्या हेतूने ‘ऑल विमेन बाईक रॅली’ चे आयोजन

पुणे, २१ ऑक्टोबर २०२३-   पुण्यातील लोकांमध्ये स्तनांच्या कर्करोगा विषयी जागरुकता निर्माण करण्याच्या हेतूने मणिपाल हॉस्पिटल, पुण्या तर्फे आज महिलांच्या बाईक रॅलीचे आयोजन त्यांच्या #BecauseBreastHealthMatters  या उपक्रमाअंतर्गत करण्यात आले होते. ८ किलोमीटरच्या या रॅलीची सुरुवात ऑन्कोलॉजी डिपार्टमेंटच्या चमूकडून करण्यात आली.  ही रॅली सकाळी ६ वाजता बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटल येथे सुरु होऊन तिची सांगता ही औंध येथील वेस्टएन्ड मॉल येथे झाली.  या रॅली दरम्यान महिला बायकर्सच्या ग्रुप्स सह स्थानिक सामाजिक संस्था, महिला क्लब्स आणि मणिपाल हॉस्पिटल, बाणेरच्या डॉक्टर्स यांच्या सह ३०० बायकर्स सहभागी झाल्या होत्या.  

या बायकर्स रॅलीचे आयोजन करण्यामागील उद्देश म्हणजे लोकांमध्ये प्रतिबंध, लवकर निदान करण्याचे महत्त्व आणि तंत्रज्ञानातील अत्याधुनिकता ज्यायोगे बचाव होण्याची शक्यता अधिक असते हे अधोरेखित करणे होय.  यामाध्यमातून केवळ जागरुकताच नव्हे तर लोकांमध्ये स्वत:चे स्तन तपासणे आणि आरोग्यपूर्ण राहणे याबद्दलही माहिती देण्यात आली. याकरता मणिपाल हॉस्पिटल, बाणेर आणि वेस्टएन्ड मॉल, औंध येथे आकर्षक अशा झुम्बा सेशनचेही आयोजन करण्यात आले होते.

सहभागी व्यक्तींना मार्गदर्शन करतांना मणिपाल हॉस्पिटल बाणेरच्या सर्जन डॉ. कविता वर्मा यांनी सांगितले “ स्तनांचा कर्करोग आता अनुवांशिक आजार राहिलेला नाही, तो आता जीवनशैलीशी संबंधित आजार बनला आहे.  तणाव, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, बैठी जीवनशैली आणि हवेतील तसेच पाण्याच्या प्रदुषणामुळे भारतातील तरुणींमध्ये सुध्दा ही वाढती समस्या बनली आहे.  ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या स्त्रियांच्या तुलनेत ४० वर्षाखालील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. महिलांना स्वत:च्या तपासणीच्या पध्दती आणि स्तनांच्या कर्करोगाचे निदान व उपचारां विषयी जागरुकता निर्माण करणे हा या बाईक रॅलीचा प्रमुख उद्देश आहे.  ज्यामुळे त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेत वाढ होऊ शकेल.”
 
मणिपाल हॉस्पिटल बाणेर चे हॉस्पिटल डायरेक्टर रमण भास्कर यांनी सांगितले “ मणिपाल हॉस्पिटल्स ने नेहमीच आघाडीवर राहून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याबरोबरच वेळेत तपासणी करण्यावर आघाडी मिळवली आहे.  प्रत्येक ऑक्टोबर मध्ये आम्ही वर्ल्ड ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ चे आयोजन करुन आपली आणि आपल्या परिजनांची काळजी घेणे अधोरेखित करत असतो.  आमच्याकडील सर्वसमावेशक अशा ऑन्कोलॉजी विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त मॅम्मोग्राफी, लायनॅक ॲक्सेलरेटर आणि पेट स्कॅन उपकरणे आहेत. या रॅलीच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये आरोग्याला प्राधान्य देणे, नियमित तपासणीसाठी लोकांना प्रोत्साहन देणे आणि स्तनांच्या कर्करोगा शी लढण्यास प्रोत्साहन देण्या विषयी जागरुकता निर्माण करत आहोत.”
 
२०२२ मध्ये इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च द्वारे करण्यात आलेल्या अभ्यासानुसार वयानुसार होणार्‍या स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण हे पुण्यात २८.३ आहे, जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूपच अधिक आहे.  हा वाढता दर विशेषकरुन तरुण महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो.
 
मणिपाल हॉस्पिटल्स विषयी
आरोग्य क्षेत्रातील एक आघाडीचे असलेले मणिपाल हॉस्पिटल्स हे भारतातील दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वांत मोठ्या हॉस्पिटल नेटवर्क्स पैकी एक असून ते वर्षाला ५ दशलक्षां हून अधिक रूग्णांना सेवा प्रदान करतात.  मल्टीस्पेशालिटी आणि टर्शरी केअर डिलिव्हरी क्षेत्रांच्या माध्यमातून  परवडणारी, उच्च दर्जाची आरोग्य सेवा विकसित करणे आणि हॉस्पिटल केअरच्या बाहेर त्याचा विस्तार करणे हे त्याचे लक्ष आहे. एमएमआरआय हॉस्पिटल्स च्या अधिग्रहणानंतर त्यांचे संपूर्ण भारतातील  एकात्मिक नेटवर्क हे १७ शहरांतील ३३ हॉस्पिटल्स, ९५०० खाटांचे व्यवस्थापन  आणि  ५ हजारांहून अधिक  कुशल डॉक्टर्स आणि २० हजारांहून अधिक कर्मचारी यांचे नेटवर्क निर्माण झाले आहे.  
मणिपाल हॉस्पिटल्स कडून जगभरातील असंख्य रुग्णांसाठी सर्वसमावेशक उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक काळजी प्रदान केली जात आहे. मणिपाल हॉस्पिटल्स  हे एनएबीएच, एएएचआरपीपी मान्यताप्राप्त असून त्यांच्या नेटवर्क मधील अधिकतर हॉस्पिटल्स ही एनएबीएल, ईआर,ब्लड बँकांना मान्यता प्राप्त आहेत.  हे सर्वोत्कृष्ट  आरोग्य  सुविधांसाठी ओळखले जाते. मणिपाल हॉस्पिटल्स हे प्रतिथयश आणि रूग्णांकडून तसेच भारतातील अनेक ग्राहक सर्वेक्षणातून सर्वाधिक रेटिंग मिळालेले हॉस्पिटल ठरले आहे.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला