*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*
*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती* *आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक* - डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांचे मत; 'ब्रह्मसखी'तर्फे ब्राह्मण उपवधू-वरांचा 'प्रत्यक्ष संवाद' पुणे: "केवळ सौंदर्य, चांगले वेतन किंवा श्रीमंती नव्हे, तर नात्यांमधील विश्वास, सुसंस्कृतपणा आणि एकत्र कुटुंबपद्धती आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक असते. एकमेकांना सांभाळून घेत, मने जुळली, तर पती-पत्नीचे नाते घट्ट होते. दोघांनीही एकमेकांचा सन्मान करत नाते, करिअर फुलवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे," असे मत युरोकूल हॉस्पिटलच्या संचालिका, प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ब्रह्मसखी ब्राह्मण महिला वधुवर मंडळातर्फे खास उपवधू-वरांसाठी 'प्रत्यक्ष संवाद' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कर्वेनगर येथील घरकुल लाॅन्समध्ये झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी व 'देणे समाजाचे' संस्थेच्या प्रमुख वीणा गोखले यांच्या हस्ते झाले. प्रसंगी 'ब्रह्मसखी'च्या संचालिका नंदिनी ओपलकर, गीता सराफ, ज्योती कानोले, तृप्ती कुलकर्णी उपस्थि...
Comments
Post a Comment