*‘जानू विना रंगच नाय’ या गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर झेबा शेख प्रस्तुत व अभिनित 'दणकेबाज' ठरणार हिट*

*‘जानू विना रंगच नाय’ या गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर झेबा शेख प्रस्तुत व अभिनित 'दणकेबाज' ठरणार हिट*

or

 *'दणकेबाज' असा आयटमचा तडका घेऊन तरुणाईला भुरळ पाडायला सज्ज् झाली आहे झेबा शेख*


मराठी सिनेसृष्टीत सध्या आयटम साँगची चलती आहे. सध्या सर्वत्र या मराठी आयटम सॉंगचं राज्य असलेलं पाहायला मिळतंय. हिंदी गाण्यांपेक्षा आता मराठी गाण्यांची रंगत वाढलेली पाहायला मिळतेय. मराठी गाण्यांना मिळणारा पाठिंबा, प्रतिसाद, प्रेम पाहता आणखी एका नव्या कोऱ्या गाण्याची यांत भर पडणार आहे. अनेक मराठी गाण्यांपैकी, ‘जानू विना रंगच नाय’ या गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. मिलियन व्ह्यूजचा टप्पा गाठत हे गाणं घराघरांत पोहोचलं. आता या गाण्यापाठोपाठ आणखी एका जबरदस्त गाण्याची मराठी गाण्यांमध्ये भर पडली आहे.

झेबा शेख आणि 'इंडिपेन्डन्ट आवाज' प्रस्तुत 'दणकेबाज' हे नवं गाणं रसिक प्रेक्षकांना ठेका धरायला लावण्यास सज्ज होत आहे. या 'दणकेबाज' गाण्यात मराठमोळ्या झेबा शेखचा अनोखा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस पडणारा आहे. तरुणाईला भुरळ घालेल अशा झेबाच्या दिलखेचक अदा लक्षवेधी ठरणार आहेत. 'दणकेबाज' असे नाव असलेल्या या गाण्यात परफॉर्मन्सचा दणका, झेबाचा दणका, रोमान्सचा दणका पाहणं रंजक ठरणार आहे. दिग्दर्शक अविनाश नलावडे दिग्दर्शित या गाण्याच्या संगीताची व गीताची धुरा रोहन पगारे याने सांभाळली आहे. तर गायिका वैशाली अदोडे हिने तिच्या दणकेबाज आवाजात हे गाणं स्वरबद्ध केलं आहे.

'दणकेबाज' या गाण्यातील रूपसुंदरी झेबा शेख हिने आजवर 'जानू विना रंगच नाय', ‘व्वारं माझ्या सोन्या’, ‘चंपाबाई’ या गाण्यांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ‘बोल्ड अँड ब्युटिफूल’ झेबा शेखने याशिवाय ‘हॉट तू मुलगी कडक’, ‘आयटम लय भारी’, ‘रावडी डांस’, ‘प्रेम आहे तुझ्यावर’, ‘प्रेम हे प्रेम हवे’ या गाण्यांमध्येही काम केलं आहे. आजवर झेबाने तिच्या नृत्याने, तिच्या अभिनय कौशल्याने तिच्या राहणीमानाने चाहत्यांना फिदा केलंच आहे. अशातच संपूर्ण तरुणाईला पुन्हा एकदा भुरळ घालायला आणि तिच्या 'दणकेबाज' गाण्यावर ठेका धरायला लावण्यास ही महाराष्ट्राची लाडकी झेबा शेख पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. 'इंडिपेन्डन्ट आवाज' या युट्युब चॅनेलवर हे गाणं २८ ऑक्टोबर ला प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला