सामाजिक कार्यासाठीचा गौरा यशश्री पुरस्कार ममता सिंधुताई सपकाळ यांना जाहीर



गौरा इन फॅशन क्लब या संस्थेद्वारे २९ ऑक्टोबर २०२३ रोजी पुण्यात गौरा यशश्री पुरस्कार वितरण सोहोळा व गौरा ग्रीन मिस, मिसेस आणि मिस्टर ग्रीन स्पर्धेच्या  अंतिम फेरीचे आयोजन

  पुणे -पुण्यातील  गौरा इन फॅशन क्लब या संस्थेद्वारे येत्या २९ ऑक्टोबर रोजी हॉटेल वेस्टिन येथे सायं. ५ वा. गौरा यशश्री पुरस्कार आणि गौरा मिस, मिसेस आणि मिस्टर ग्रीन स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले असून विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती  आयोजिका आणि संस्थेच्या संस्थापिका गौरी नाईक आणि संस्थेचे संचालक जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थे विषयी माहिती देताना गौरी नाईक म्हणाल्या की, गौरा इन फॅशन क्लब ही संस्था २०१८ पासून सौंदर्य आणि सामाजिक या दोन्ही क्षेत्रात कार्यरत असून या संस्थेचे कार्य फक्त सौंदर्य स्पर्धा आणि फॅशन जगत पुरतेच मर्यादित न ठेवता महिला सक्षमीकरण, शिक्षणाचे महत्त्व आणि हरित भारत, स्वच्छ भारतासाठीचे विविध प्रकल्प तसेच इतर विविध सामाजिक बाबींकडे लक्ष केंद्रित करून सकारात्मक बदल घडवणे हे उद्दीष्ट ठेवून आम्ही संस्थेची स्थापना केली आहे. एक पालक संस्था म्हणून, गौरा इन फॅशन क्लबच्या वतीने राज्यस्तरीय मिस मिसेस अँड मिस्टर महाराष्ट्र, मिस अँड मिसेस सेलेस्टियल ब्युटी अँड हिरोईक मॅन ऑफ इंडिया, खानदेश साम्राज्ञी, मिस मिसेस अँड मिस्टर खानदेश, वीर अँड वीरांगना ऑफ महाराष्ट्र या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्याच बरोबर विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या व्यक्तींचा गौरा यशश्री पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.


मिस मिसेस अँड मिस्टर ग्रीन ऑफ महाराष्ट्र २०२३ 


यंदाची मिस मिसेस अँड मिस्टर ग्रीन ऑफ महाराष्ट्र ही स्पर्धा हरित भारत संकल्पना घेऊन आयोजित करण्यात आली असून या वर्षी देशभरात दहा लाख वृक्ष लावण्याचा प्रकल्प हाती घेतला असल्याचे गौरी नाईक यांनी सांगितले. या वर्षी ३५० स्पर्धकांमधून अंतिम फेरी साठी ३० स्पर्धकांची निवड करण्यात आली असून त्यांच्या सराव फेऱ्या मगरपट्टा येथे मुंबईचे ग्रूमिंग एक्स्पर्ट आणि कोरिओग्राफर विशाल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहेत. विविध फेऱ्या आणि सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा फेरीतून विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. चित्रपट आणि मॉडलिंग क्षेत्र, सौंदर्य क्षेत्र, फॅशन डिझायनिंग या क्षेत्रात कारकीर्द करायची असल्यास अशा स्पर्धांचा उपयोग विजेत्यांना होतो. 


गौरा यशश्री पुरस्कार


याच कार्यक्रमांतर्गत सामाजिक कार्यासाठी, कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी, औद्योगिक क्षेत्रात व कृषी क्षेत्रात भरीव योगदानासाठी अनुक्रमे ममता सिंधुताई सपकाळ, संबळ वादक गौरी वनारसे, नृत्यांगना अशिमिक आनंद कामठे,  शीतल बियाणी, आणि ॲड. सोमेश वैद्य यांना गौरा यशश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास असियान व्यापार आयुक्त डॉ. सचिन काटे, अमृता सचिन काटे, अमित माळवदकर, सचिन रासकर, माजी आमदार जगदीश मुळीक, उद्योजक संजय घोडावत, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे राहुल कराड, डी वाय पाटील ग्रूप चे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, मगरपट्टा सिटी एज्युकेशन फाऊंडेशन चे संस्थापक योगेश मगर, करुणा योगेश मगर, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अभिनेता रजनीश दुग्गल,फेमिना मिस इंडिया फर्स्ट रनर अप श्रेया पुंजा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला