सोनी सबवरील ‘आंगन – अपनों का’ या आगामी कौटुंबिक मालिकेत आयुषी खुराना लग्नाबाबत अगदी वेगळा दृष्टिकोन असलेल्या मुलीची भूमिका करणार*

*सोनी सबवरील ‘आंगन – अपनों का’ या आगामी कौटुंबिक मालिकेत आयुषी खुराना लग्नाबाबत अगदी वेगळा दृष्टिकोन असलेल्या मुलीची भूमिका करणार* 


मुंबई: सोनी सबवरील ‘आंगन – अपनों का’ या आगामी मालिकेत एका अशा मुलीची गोष्ट आहे, जी आपल्या वडिलांची जबाबदारी शेवटपर्यंत सांभाळण्यास तत्पर आहे. ही आधुनिक काळातील कौटुंबिक मालिका आहे, ज्यात एका अशा मुलीची गोष्ट आहे, जिचा लग्नाविषयीचा दृष्टिकोन अगदी वेगळा आहे.
आयुषी खुराना ही एक गुणी अभिनेत्री या मालिकेत पल्लवी शर्मा ही प्रमुख भूमिका करणार आहे. पल्लवी ही जयदेव शर्मा (महेश ठाकूर) च्या तीन मुलींपैकी सर्वात धाकटी मुलगी आहे. पल्लवी एक स्वतंत्र स्त्री, हुशार शेफ आणि आपल्या पित्याची कर्तव्यदक्ष मुलगी आहे. आपल्या वडिलांची ती प्रेमाने काळजी घेते आणि नेहमी त्यांच्या सोबतीला असते. आपल्या वडिलांची जबाबदारी निष्ठेने पार पाडणाऱ्या पल्लवीचे लग्नाबाबतचे विचार फार वेगळे आहेत.
मालिकेत पल्लवी शर्माची भूमिका करणारी आयुषी खुराना म्हणते, “आंगन – अपनों का या मालिकेत मी साकारत असलेली पल्लवी ही व्यक्तिरेखा अत्यंत पुरोगामी आहे. तिचे आपल्या वडीलांवर खूप प्रेम आहे, आणि त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी तिने स्वतःच्या अंगावर घेतली आहे. तिचे असे मत आहे की तिच्या या जबाबदारीच्या आड काहीच येऊ शकत नाही, अगदी लग्न देखील नाही! या मालिकेतून आजच्या काळातल्या अशा काही मुलींच्या भावना व्यक्त होत आहेत, ज्यांना लग्नानंतर आपले नवीन कुटुंब आणि स्वतःचे आईवडील यांच्यात निवड करावी लागते. अशा मालिकेत मी काम करत असल्याचा मला आनंद वाटतो.”
सोनी सबवर लवकरच येत आहे कौटुंबिक मालिका- ‘आंगन – अपनों का’; त्याचे अपडेट्स मिळवा, याच ठिकाणी!

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला