या वीकएंडला इंडियन आयडॉल सीझन 14 च्या सेट्सवर आशिकी 1 आणि आशिकी 2 चे मिलन

या वीकएंडला इंडियन आयडॉल सीझन 14 च्या सेट्सवर आशिकी 1 आणि आशिकी 2 चे मिलन

 

या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सीझन 14 या अत्यंत प्रतिष्ठित गायन रियालिटी शोमध्ये मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक, गीतकार आणि गायक मिथुन येणार आहे. मिथुनचे प्रथमच या शो मध्ये येणार आहे. त्याच्या सन्मानार्थ स्पर्धकांना ‘मिथुन मेलडी चॅलेंज’ देण्यात येईल, ज्यात स्पर्धकांना आपले गान कौशल्य दाखवून मिथुनला प्रभावित करावे लागेल. टॉप 10 स्पर्धकांपैकी सर्वश्रेष्ठ स्पर्धकाला प्रशस्तीच्या रूपात 21st सेंचुरीच्या अत्यंत गाजलेल्या ‘तुम ही हो’ गाण्याचे फर्स्ट ड्राफ्ट लीरिक्स जिंकण्याची संधी मिळेल.

इतकेच नाही, मिथुनचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि संगीताची त्याची समज आणि ज्ञान यामुळे शोचे वातावरण भारून जाईल. यावेळी तो पियानो वाजवून आणि शीघ्र काव्य करून सर्वांना थक्क करून सोडेल!

इंडियन आयडॉलमध्ये आल्याचा आपला आनंद व्यक्त करताना मिथुन म्हणाला, “कुमार सानू जी, श्रेया घोषाल आणि विशाल दादलानी सारख्या महान व्यक्तिमत्वांच्या शेजारी बसून संगीताविषयी चर्चा करणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. ’तुम ही हो’ हे गाणे करताना मी खूप काही शिकलो. आणि जर या गाण्याच्या मुळाशी आपण गेलो तर हे लक्षात येईल की, आशिकी 2 चा पाया म्हणजे पाहिला आशिकी चित्रपट आहे, ज्याच्याशी नदीम-श्रवण आणि कुमार सानू यांसारखे दिग्गज कलाकार निगडीत आहेत. या चित्रपटाशी माझे जे व्यक्तिगत नाते आहे, ते देखील खूप गहिरे आहे, कारण माझे वडील नरेश शर्मा यांनी या चित्रपटासाठी म्युझिक अरेंजमेंट केली होती. त्यांनी सानू दांसोबत बऱ्याचदा एकत्र काम केले आहे.”

त्याने आशिकी 1 आणि आशिकी 2 चे मिलन घडवून आणण्याची कल्पना शोच्या निर्मात्यांसमोर मांडली. त्यानुसार, परीक्षक कुमार सानू, श्रेया घोषाल आणि विशाल दादलानी यांच्या साथीने मिथुनने ‘तुम ही हो’ गाणे म्हटले. या परफॉर्मन्सला सगळ्यांनी भरभरून दाद दिली.

या भागात मिथुन ‘आशिकी 2’ चित्रपटातील ‘तुम ही हो’ हे गाणे पियानोवर देखील वाजवताना दिसेल.

 

असे सुंदर क्षण अनुभवण्यासाठी बघा इंडियन आयडॉल सीझन 14 या शनिवारी आणि रविवारी रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष श्री. दीपक माधवराव मानकर यांना विधानपरिषदेची आमदारपदी संधी न दिल्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी दिला सामुहिक राजीनामा