भारतीय कला प्रसारणी सभेच्या वस्तुविद्या महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ अभिजित नातु

*भारतीय कला प्रसारणी सभेच्या वस्तुविद्या महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ अभिजित नातु*


पुणे: वास्तुविद्येच्या क्षेत्रातील नावाजलेल्या भारतीय कला प्रसारिणी सभेच्या वास्तुविद्या महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नुकतीच डॉ. अभिजित नातु यांची नियुक्ती करण्यात आली.संस्थेचे सचिव पुष्कराज भालचंद्र पाठक यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय समितीने डॉ. नातु यांची सर्वानुमते निवड केली. नातुंच्या प्रभारी प्राचार्य पदाचा अनुभव व त्यांची गुणवत्ता पाहुन त्यांची ही नियुक्ती करण्यात आली असे सचिव पुष्कराज पाठक म्हणाले.नातुंनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीजचे अध्यक्षपद भुषविले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे ५० हून अधिक शोध निबंध आत्तापर्यंत प्रकाशीत झाले आहेत. त्यांना विविध संस्थांकडून बेस्ट टिचर्स अवॉर्ड ने देखील सम्मानित करण्यात आले आहे.

फोटो ओळ - प्राचार्य पदाचा नियुक्ती आदेश देताना सचिव पुष्कराज पाठक

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष श्री. दीपक माधवराव मानकर यांना विधानपरिषदेची आमदारपदी संधी न दिल्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी दिला सामुहिक राजीनामा