*सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘झलक दिखला जा’च्या परीक्षकांच्या पॅनलमध्ये दाखल झाली फराह खान!*

*सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘झलक दिखला जा’च्या परीक्षकांच्या पॅनलमध्ये दाखल झाली फराह खान!*
 
‘झलक दिखला जा’ हा एक सेलिब्रिटी डान्स रियालिटी शो, जो देशभरात लोकप्रिय आहे आणि सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर हा कार्यक्रम आता पुनरागमन करत आहे. या शोची लोकप्रियता प्रत्येक सीझन गणिक वाढत गेली होती, कारण हा एक असा अनोखा फॉरमॅट आहे, ज्यात सेलिब्रिटी स्पर्धक आणि व्यावसायिक कोरिओग्राफर्स एकत्र येतात. आणि प्रेक्षकांना एका वेगळ्या प्रकाशात, त्यांच्या आवडत्या स्टार्सच्या जीवनात डोकावण्याची संधी मिळते.
 
यंदाच्या सीझनच्या अकर्षणात आता आणखी वाढ झाली आहे, कारण प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि निर्माता-दिग्दर्शक फराह खान या शोमध्ये परीक्षक म्हणून दाखल झाली आहे. डान्स आणि कोरिओग्राफीच्या क्षेत्रात फराह खानचा अधिकार निर्विवाद आहे. तिने मोठमोठ्या बॉलीवूड स्टार्सबरोबर काम केले आहे उत्तमोत्तम डान्स दृश्ये दिली आहेत. परीक्षकांच्या पॅनलवर तिचा प्रवेश झाल्यामुळे या पॅनलला अनुभव आणि नैपुण्याचा लाभ तर मिळालाच आहे, शिवाय एक टवटवीत ऊर्जा देखील मिळाली आहे, जी डान्स फ्लोरवरील स्टार्समध्ये आणि प्रेक्षकांत देखील प्रतिबिंबित होताना दिसेल. फराह खान म्हणते त्याप्रमाणे, “पुन्हा एकदा ‘झलक दिखला जा’ मध्ये परीक्षक म्हणून दाखल होताना मला पहिल्या सत्राची सुरुवात होताना झाला होता, तितकाच आनंद होत आहे. या शोचे माझ्या मनात एक विशेष स्थान आहे. या आधीच्या सत्रांच्या आठवणी माझ्या मनात अजून ताज्या आहेत. हा शो डान्सचा दर्जा तर वाढवतोच, पण जे डान्सर नाहीत त्यांनाही डान्सर बनवतो. या प्रवासात सेलिब्रिटीज आपल्याला दरेक आठवड्यात आश्चर्याचा धक्का देतात. त्यामुळे हा शो मला प्रिय आहे. एक कोरिओग्राफर म्हणून मला नेहमी वाटते की, माणसाने अगदी मनापासून नाचले पाहिजे. या सत्रात विविध डान्स प्रकारांचे फ्यूजन, सहभागी सेलिब्रिटीजचे डान्सविषयीचे पॅशन आणि डान्सची परिवर्तनकारी शक्ती बघण्यास मी उत्सुक आहे. एक परीक्षक म्हणून माझी भूमिका माझ्या अनुभवाचा आणि विचारांचा उपयोग स्पर्धकांना करून देताना त्यांना प्रोत्साहन देण्याची, त्यांची नृत्य कला विकसित करण्याची आणि आपल्या कलाकारांना त्यांच्या प्रवासात मार्गदर्शन करण्याची असेल.”
 
‘झलक दिखला जा’ ने नेहमी भारतातील डान्स रियालिटी शोची व्याख्या नव्याने केली आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर या शोचे पुरनरुज्जीवन म्हणजे सर्व डान्स रसिकांसाठी, चाहत्यांसाठी आणि टेलिव्हिजनच्या प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असणार आहे. पुन्हा एकदा या शोची लोकप्रियता झळकून उठेल आणि या शोच्या दैदीप्यमान इतिहासात एक नवीन अध्याय जोडला जाईल.
 
‘झलक दिखला जा’ सुरू होत आहे, 11 नोव्हेंबर रोजी आणि दर शनिवारी आणि रविवारी रात्री 9.30 वाजता त्याचे प्रसारण करण्यात येईल, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून!

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला