शुटींगमध्ये धु्रव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी १३ सुवर्ण पदक पटकाविले अथर्वसिंग भदोरिया बनला सर्वेत्कृष्ठ कामगिरी करंडक विजेता

                     दि.२७ नोव्हेंबर २०२३


शुटींगमध्ये धु्रव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी १३ सुवर्ण पदक पटकाविले
 अथर्वसिंग भदोरिया बनला सर्वेत्कृष्ठ कामगिरी करंडक विजेता

पुणे, दि.२७ नोव्हेंबर: सीबीएससी दक्षिण विभाग २ शुटींग स्पर्धेत (२०२३ २४) मध्ये मालपाणी फाउंडेशनच्या सूस रोड येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या नवोदित खेळाडूंनी दमदार खेळाचे प्रदर्शन करून १३ सुवर्ण पदकावर नाव कोरले. तसेच १७ वर्षाखालील मुलांच्या वैयक्तिक १० मीटर एयर पिस्तुल क्रिडा प्रकारात अथर्वसिंग भदोरिया ने सुवर्ण पदक पटकावून सर्वोत्तम कामगिरी करंडक मिळविला. त्यांच्या या दमदार खेळाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यश मालपाणी व प्रिन्सीपल संगीता राऊतजी यांनी खेळाडूंचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. 
केरळ राज्यातील कोल्लम येथे सीबीएससी दक्षिण विभाग शुटिंग स्पर्धा संपन्न झाली. ही स्पर्धा १४, १७ आणि १९ वयोगटातील मुले व मुलींसाठी होती. यात अंडर १९ पीपी साईट एअर रायफल पुरूष मध्ये मितेश वाघ (इ.११वी), अनय खडसे व रिशान सर्वेक्षण (इ.५वी) यांनी सुवर्ण पदक मिळविले. अंडर १७ एअर पिस्तूल पुरूष मध्ये अथर्वसिंग भदोरिया, सिध्दरचित पवार, शौर्य देऊलकर यांनी सुवर्ण पदक मिळविले. अंडर १४ पीपी साइट एअर रायफल पुरूषामध्ये सिद्धार्थ बेडकिहाळ, हर्षवर्धन शर्मा आणि कुशान पांडे यांनी सुवर्ण पदकावर नाव कोरले. अंडर १४ पिस्तुल पुरूष मध्ये अव्दैत गोडसे, अर्णव चव्हाण व वेदांत कान्हेरे हे सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले.
स्कूलच्या या नवोदित विद्यार्थ्यांना शूटिगची आवड आहे. त्यांच्यामध्ये ही आवड जोपासण्यासाठी शिक्षिका अश्विनी गुंजाळ, सोनाली परेराव व संध्या फरताडे यांनी प्रशिक्षण दिले.



Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला