पुण्याची खासियत दाखवणारं, प्रितम एसके पाटील दिग्दर्शित 'आमचं पुणे' हे रॅप साँग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला...*
*पुण्याची खासियत दाखवणारं, प्रितम एसके पाटील दिग्दर्शित 'आमचं पुणे' हे रॅप साँग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला...*
प्रत्येक शहराची एक खासियत असते आणि त्या खासियत मुळे त्याची एक वेगळी ओळख निर्माण झालेली असते. त्यापैकी एक म्हणजे आपलं पुणे शहर जे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं. पुणे शहरासाठी समर्पित असं एक नवीन दर्जेदार रॅप साँग प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज होत आहे.
शैलेश शिवराम मेंगडे, लोकेश मोरे, दत्ताभाऊ झांजे निर्मित आणि गणेश संपत कुदळे सह निर्मित "आमचं पुणे" या रॅपच्या क्लॅप अनावरनाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. युवराज सातपुते आणि ॲक्ट प्लॅनेट प्रोडक्शन प्रस्तुत "आमचं पुणे" हे रॅप साँग मराठी मनोरंजन इंडस्ट्रीमधील पहिलं वहिलं असं गाणं असणार आहे ज्याचं चित्रीकरण पुण्यातील तब्बल ६५ लोकेशन्स् वर शूट करण्यात आलं आहे.
प्रितम एस के पाटील दिग्दर्शित या गाण्यात कलाकार युवराज सातपुते, प्रितम पाटील, महाराष्ट्राचे लाडके रील स्टार बळी डिकळे आणि राहुल दराडे हे दिसणार आहेत. संतोष खरात यांनी कार्यकारी निर्मात्याची तर स्वानंद देव यांनी प्रोडक्शन मॅनेजरची जबाबदारी संभाळली आहे. एम सी नेमो यांनी या रॅप साँगचे शब्द लिहिले आहेत आणि हे गाणं गायलं सुद्धा आहे. अमित पाटील यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. क्रिएटिव हेड ए. व्ही. विश्वकर्मा असून कॅमेराची धुरा ऋषिकेश गोळे यांनी सांभाळली आहे. महेश निंबाळकर हे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत आणि प्रसाद खैरे हे लाईन प्रोड्युसर आहेत.
"आमचं पुणे" हे रॅप साँग तयार करण्यामागे नेमका हेतू काय असा प्रश्न आपसूक अनेकांना पडेल आणि बऱ्याच जणांना याचं उत्तर स्वतःहून सुद्धा मिळालं असेल. तर, हे पुण्याची खासियत दाखवणं हा रॅप साँग करण्यामागील निर्मात्यांचा मुख्य उद्देश आहे. लवकरच हे रॅप साँग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे असं निर्मात्यांनी कार्यक्रमा दरम्यान सांगितले.
Comments
Post a Comment