नाटक हा समाजाचा आरसा: पद्मश्री सतीश आळेकर
नाटक हा समाजाचा आरसा: पद्मश्री सतीश आळेकर रमणबाग प्रशालेत जागतिक रंगभूमी दिन उत्साहात साजरा नाटक हा समाजाचा आरसा असतो. समाजात घडणाऱ्या विविध घटना आणि प्रवृत्ती यांचे प्रतिबिंब नाटकात उलटे सुलटे किंवा तिरके अशा कोणत्यातरी स्वरूपात निश्चितपणे दिसून येत असते. कलाकाराने आपल्या कलाकृतीतून नेमके काय मांडायचे, हे विचार करून ठरवायचे असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार, पटकथाकार आणि दिग्दर्शक पद्मश्री सतीश आळेकर यांनी केले. रमणबाग प्रशालेत जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सदानंद आचवल स्मृत्यर्थ पुरस्कार वितरण आणि आजी-माजी विद्यार्थी कलाकारांच्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी रोटरी इंटरनॅशनलच्या मानव विकास विभागाचे संचालक डॉ. दिलीप देशपांडे, डॉ. विनय कुमार आचार्य, नामवंत संगीतकार अजय पराड, व्हायोलिन संगीत संस्थेचे संस्थापक पं. अतुलकुमार उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी रमणबाग प्रशालेच्या वतीने सतीश आळेकर यांना सन्मानाचा जनस्थान पुरस्कार मिळाल्याबद्दल मानपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे विख्या...
Comments
Post a Comment