*सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘झलक दिखला जा’ मध्ये अष्टपैलू अभिनेता आणि डान्सर अर्शद वारसी परीक्षकाच्या भूमिकेत!*
*सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘झलक दिखला जा’ मध्ये अष्टपैलू अभिनेता आणि डान्सर अर्शद वारसी परीक्षकाच्या भूमिकेत!*
‘झलक दिखला जा’ हा एक असा शो आहे, ज्यात नामवंत लोक मनातील सर्व प्रकारचा संकोच झुगारून बेधुंद होऊन नाचतात. तब्बल 12 वर्षांनी हा शो सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर ‘घर वापसी’ करत आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा एक आगळा पैलू हा शो प्रेक्षकांपुढे सादर करतो. या शोमध्ये सामील झालेले स्पर्धक अतिशय अवघड डान्स मूव्ह्ज शिकून त्या सादर करण्याचे आव्हान स्वीकारतात आणि प्रतिष्ठित ट्रॉफी मिळवण्यासाठी स्पर्धा करतात.
भारतात डान्स रियालिटी शोज च्या प्रांतात ‘झलक दिखला जा’ ने नेहमीच नवीन मापदंड निर्माण केले आहेत. याचे एक मोठे कारण म्हणजे मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर परीक्षक या स्पर्धकांना बहुमोल सल्ला देऊन अचूक मार्गदर्शन करतात. यावेळी या शोमधील रोमांच आणखी वाढवत अष्टपैलू अभिनेता आणि डान्सर अर्शद वारसी या शोमध्ये परीक्षकाच्या रूपात भारतीय टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहे. त्याचा प्रभाव, डान्स आणि अभिनयाबद्दलचा सुजाण दृष्टिकोन आणि त्याचे अतरंगी व्यक्तिमत्व यामुळे परीक्षकांच्या पॅनलसाठी तो अगदी सुयोग्य पर्याय आहे!
या शोच्या माध्यमातून टेलिव्हिजनवर ‘घर वापसी’ करत असल्याचा उत्साह शब्दांतून व्यक्त करताना अर्शद वारसी म्हणतो, “या वर्षी ‘झलक दिखला जा’च्या परीक्षकांच्या पॅनलमध्ये दाखल होताना मी अगदी रोमांचित झालो आहे. डान्स हे पहिल्यापासून माझे वेड होते आणि अनेक वर्षे या मंचावर सादर होणारे अप्रतिम परफॉर्मन्स मी आनंदाने बघितले आहेत. आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून हे आव्हान स्वीकारण्याचे धाडस करणाऱ्या आणि प्रत्येक परफॉर्मन्स अचूक व्हावा यासाठी जीव ओतून प्रयत्न करणाऱ्या स्पर्धकांविषयी मला नितांत आदर आहे. स्वतःला अशा रीतीने अभिव्यक्त करायला हिंमत लागते. मला आशा आहे की माझी टिप्पणी आणि प्रोत्साहक सल्ला त्यांना या प्रवासात आपला परफॉर्मन्स सुधारण्यासाठी मदतरूप ठरेल. त्यांना मनापासून डान्स करण्यासाठी आणि डान्स करताना त्याचा आनंद घेण्यासाठी प्रवृत्त करणे हेच माझे ध्येय आहे. आणि हो, त्यांची प्रतिभा आणि सर्जनशीलता यामुळे माझेही मनोरंजन होईल आणि मलाही प्रेरणा मिळेल अशी मला आशा आहे. हा नवा सीझन कधी सुरू होतो, असे मला झाले आहे!”
सेलिब्रिटी स्पर्धकांच्या रुपातून ग्लॅमरस ढंगात डान्सचे सौंदर्य उलगडून दाखवण्याच्या, प्रेक्षकांचे मनोरंजन करून त्यांना प्रेरित करण्याच्या या शोच्या क्षमतेत त्याच्या लोकप्रियतेचे रहस्य दडलेले आहे.
Comments
Post a Comment