आपली अंतःस्थ शक्ती विकसित करण्यासाठी जीवनाबद्दलचा नवा दृष्टिकोन
कृपया प्रसिद्धीसाठी :
आपली अंतःस्थ शक्ती विकसित करण्यासाठी जीवनाबद्दलचा नवा दृष्टिकोन
फक्त ६ दिवसात आत्मसात करा व्यक्तिमत्व बदलाचा मार्ग
पुणे, ७ नोव्हेंबर २०२३ : आपले जीवन दोन पातळ्यांवर विकसित होत असते. एक पातळी आहे आपले बाह्य रूप आणि दुसरी आपले अंतस्थ व्यक्तिमत्त्व . खरे तर आपले बाह्य रूप आपल्या अस्तित्वाच्या अवघे १० टक्के असते. मात्र सध्याची शिक्षणव्यवस्था या १० टक्क्यावरच केंद्रित झाली आहे. यामुळे आपण बाह्यतः विकसित दिसलो तरी अंतर्यामी रिक्त राहतो.
आपल्याला युगानुयुगे मार्गदर्शन करणा-या भगवान श्रीकृष्ण, ऋषी मुनी, पतंजली, भगवान बुद्ध किंवा भगवान महावीर अशा दिव्य शक्तींनी आपली अंतस्थ घडण विकसित करण्याचे मार्ग दाखवले आहेत.
याच उद्दिष्टाच्या सिद्धीसाठीचा एका नवा मार्ग पूज्य परम आलय जी यांनी दाखविला आहे. यामध्ये आपले प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा मिलाफ करून आपले व्यक्तिमत्व परिपूर्ण करण्याची दिशा दाखवली आहे. हा दृष्टिकोन म्हणजे केवळ प्रवचन न देता प्रत्ययही देणे असा आहे.
सन टु ह्युमन फाउंडेशन ने पुन्हा एकदा पुण्यात सहा दिवसांचे एक शिबिर आयोजित केले असून त्यात सहाभागी होऊन आपल्याला आपले खरे व्यक्तिमत्व आत्मसात करण्याचा प्रवास सुरु करता येईल. फाउंडेशन तर्फे माँ मैत्रेयी यांनी या शिबिराची माहिती आज एका पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माँ अभया, जैन महसंघाचे अध्यक्ष अचल जैन, शून्यजी आणि उद्योजक नितीन भन्साळी उपस्थित होते.
माँ मैत्रेयी म्हणाल्या " चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आज आपला समाज अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना निमंत्रण देत आहे. या परिस्थितीत बदल करण्याची वेळ आता आली असून त्यासाठीचे सोपे आणि व्यवहार्य मार्ग या शिबिरात दाखविले जातील." "सहभागी होणा-या व्यक्तींना रोजच्या सत्रानंतर साधा आरोग्यदायी अल्पोपहार देण्यात येईल. या 'अदृश्य अल्पोपाहारात' आपल्या शरीराला आवश्यक असलेले प्रथिने कर्बोदके, ऊर्जा असे अत्यंत महत्वाचे घटक समाविष्ट असतील," असे माँ मैत्रेयी म्हणाल्या. "आजवर जगात विविध ठिकाणी मिळून अशी २५० शिबिरे आयोजित झाली असून सहभागी व्यक्तींना त्यांच्या भावनिक आणि शारीरिक व्यथांपासून सुटका झाली आहे आणि आता ते प्रेम आणि आनंदाने भरलेले जीवन व्यतीत करीत आहेत," असे त्यांनी सांगितले. .
हे शिबिर वर्धमान सांस्कृतिक केंद्र, बिबवेवाडी -कोंढवा रस्ता, पुणे येथे १९ ते २४ नोव्हेंबर दरम्यान होणार असून त्याची वेळ सकाळी ६.30 ते ८.३० अशी आहे. शिबिरासाठी कसलेही शुल्क नाही.
शिबिरात सहभागी होऊ इच्छिणा-यांनी https://forms.gle/pdsTLBrzY56f9nh86 येथे नाव नोंदवावे किंवा मीरा 8827453884, तारिणी 8359976000 अथवा श्रावण Shravan 9669288957 यांच्याशी संपर्क साधावा.
Comments
Post a Comment