*‘झलक दिखला जा’ मध्ये तनिशा मुखर्जी म्हणाली, “मी काही कुणी स्टार नाही!”*
*‘झलक दिखला जा’ मध्ये तनिशा मुखर्जी म्हणाली, “मी काही कुणी स्टार नाही!”*
या दिवाळीत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरू होत असलेल्या ‘झलक दिखला जा’ या डान्समस्तीत सहभागी होण्यासाठी सज्ज व्हा. 11 नोव्हेंबर रोजी रात्री 9:00 वाजता सुरू होत असलेल्या या शोमध्ये चाहते आपल्या लाडक्या कलाकारांना मनातील सगळा संकोच दूर ठेवून डान्सचा उन्माद अनुभवताना आणि आपल्या डान्सने देशाला वेड लावताना पाहतील. या सत्रात चमकदार परीक्षकांची पॅनल दिसेल. ‘FAM’ म्हणजे फराह खान, अर्शद वारसी आणि मलाइका अरोरा हे तिघे आपली डान्सची आवड शेअर करायला आणि स्पर्धकांना मार्गदर्शन करायला एकत्र येत आहेत. ‘ये दिवाली झलक वाली’मध्ये विविध क्षेत्रातील सिलिब्रिटीज यावेळी सहभागी होत आहेत, त्यांचे मंत्रमुग्ध करणारे परफॉर्मन्स आणि अविस्मरणीय क्षण प्रेक्षकांची प्रतीक्षा करत आहेत!
अभिनेत्री तनिशा मुखर्जीने आपला कोरिओग्राफर जोडीदार तरुण निहलानीसोबत ‘लैला मै लैला’ गाण्यावर जबरदस्त डान्स करून सगळ्यांना थक्क केले. तनिशाचा परफॉर्मन्स पाहून अवाक झालेली फराह खान म्हणाली, “मी तनिशाला फॉलो करते आणि मी तिचा कारकीर्दीचा आलेख पाहिला आहे. ती काही डान्सर नाही. मला वाटते, तुम्हाला जर योग्य कोरिओग्राफर मिळाला, तर तुम्ही चांगला डान्स करू शकता. तनिशा, तुला योग्य माणूस मिळाला आहे, ज्याने तुझे बलस्थान ओळखले आहे, तुझी कमजोरी लपवली आहे आणि तुझ्यातील उत्कृष्ट सादर केले आहे. मला वाटते, तरुण, तूच तो माणूस आहेस. हा परफॉर्मन्स जोरदार होता. तरुण, तू तनिशाच्या बलस्थानांचा चांगला उपयोग केलास. तसेच लिफ्ट परफॉर्म करणे ही मुली आणि मुलांसाठीही खूप कठीण असते. शरीराचे वजन उचलणे आणि त्या वेळी डान्सवर फोकस करणे सोपे नसते. मी तुझ्या स्टेप बघत होते. तू काहीच विसरला नाहीस. खरोखर आम्हाला असेच वाटले की, एखाद्या अवॉर्ड समारंभात आम्ही कोण्या स्टारचा परफॉर्मन्स बघत आहोत. आम्हाला तसेच वाटले. तनिशा, आपल्या कुटुंबाची परंपरा घेऊन येथे येणे आणि नवोदिताप्रमाणे सुरुवात करणे हे हिंमतीचे काम आहे. आगामी आठवड्यांसाठी तुला शुभेच्छा. तुझी सुरुवातच जर अशी असेल, तर हा शो नक्की सुपरहिट होणार, यात शंका नाही. अप्रतिम कामगिरी, तनिशा!”
तनिशा मुखर्जी फराह खानची चाहती आहे आणि फराहला आपल्या बहिणींना नृत्यदिग्दर्शन करताना तिने पाहिले आहे. फराहने केलेल्या कौतुकाने भारावलेली तनिशा म्हणाली, “फराह मॅम, मी तुम्हाला काजोल आणि रानीला नृत्य-दिग्दर्शन करताना बघितले आहे. जेव्हा मला समजले की, ‘झलक दिखला जा’ मध्ये तुम्ही एक परीक्षक असणार आहात, तेव्हा मला खूप भीती वाटली. मला माहीत आहे की फराह खान परखडपणे बोलते आणि पक्षपात न करता ती नक्की माझ्यावर टीका करेल. फराह, तुम्ही मला ओळखता. मी काही डान्सर नाही. काजोल लहानपणी थोडे फार कथ्थक शिकली होती. पण मी कधीच डान्सचे धडे घेतले नाहीत. चित्रपटात मी फक्त छोटे छोटे शॉट दिले आहेत. सलग अडीच मिनिटांचा परफॉर्मन्स देखील दिलेला नाही. जेव्हा या टीमने मला सांगितले की हा वन टेक परफॉर्मन्स असेल आणि मला संपूर्ण अडीच मिनिटांचा परफॉर्मन्स करायचा आहे, तेव्हा मी खूप घाबरले की हा परफॉर्मन्स मी बिनचूक कसा करू शकेन? जेव्हा मी इतरांना पाहिले, तेव्हा ते सगळे फारच छान नाचत होते. मी बसल्या-बसल्या विचार करत होते की, कुणीच चुका करत नव्हते आणि आपल्या स्टेप विसरत नव्हते. तालमीच्या वेळेस मी कोणती ना कोणती स्टेप हमखास विसरायचे. मला ‘गजनी’ सारखे वाटत होते. तुम्ही म्हणालात, त्याप्रमाणे या शोमध्ये सगळे स्टार्स आहेत. खरं सांगायचं तर, मी काही स्टार नाही. मी इतक्या मोठ्या स्तराची सेलिब्रिटी नाही. तुम्ही जेव्हा म्हणालात की, मी एखाद्या स्टार सारखी परफॉर्म करत होते, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणीच आले! मी इतकेच म्हणेन की, तुमचे कुटुंब आणि मित्रमंडळी स्टार असणे ही खूप मोठी गोष्ट असते. ते सोपे नसते. त्याबद्दल धन्यवाद; आज मात्र मला स्टार असल्यासारखे वाटते आहे.”
परीक्षक आणि इतर स्पर्धकांसोबत ‘दीवानगी दीवानगी’ वर परफॉर्म करून तनिशाने हा खास क्षण आपल्या स्मृतींच्या कुपित जपून ठेवला.
चमकदार डान्स परफॉर्मन्सेसने भरलेल्या धमाकेदार दिवाळीसाठी सज्ज व्हा; 11 नोव्हेंबरपासून रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!
Comments
Post a Comment