बात मन की, सैनिक और परिवार की*
*बात मन की, सैनिक और परिवार की*
पुणे - सोमवार दि. २५ डिसेंबर २०२३ रोजी अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद आणि एफ.एम..९०.४ रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने 'बात मन की, सैनिक और परिवार की' हा कार्यक्रम सांगली येथे आयोजला होता.
या कार्यक्रमात पूर्व सैनिक आणि वीरमातांचा गौरव करण्यात आला.अध्यक्षस्थानी एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त)होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 'पूर्वी आम्ही गणवेशात समाजाची सेवा केली.आता गणवेश उतरवून पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या माध्यमातून समाजाच्या हितासाठी काम करतो आहोत', असे त्यांनी उपस्थितांना सांगितले.एअर व्हाइस मार्शल (निवृत्त) नितीन शंकर वैद्य आणि एअर कमोडोर (निवृत्त) शैलेंद्र रामकृष्ण घारपुरे यांनी आपापली मनोगते व्यक्त केली. त्यांनी आपापल्या आठवणी आणि अनुभव कथन केले.
कार्यक्रमाचे आयोजन श्री. शिवाजी रामचंद्र मोहिते (ग्रीन एफ.एम. ९०.४) आणि ग्रूप कॅप्टन (निवृत्त) श्रीकांत वालवडकर (अ. भा. पूर्व सैनिक सेवा परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष) यांनी केले.
ग्रीन एफ.एम.९०.४ या कम्युनिटी रेडिओवर दर रविवारी सकाळी ८.३० वाजता 'बात मन की, सैनिक और परिवार की' हा कार्यक्रम सादर होणार आहे. या रेडिओच्य तेराव्या वर्धापन दिनानिमित्त हा उपक्रम सुरू केल्याचे श्री.शिवाजी मोहिते यांनी सांगितले. श्री.नितिन देसाई आणि सौ.शुभदा भोगले यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. सूत्रसंचालन सौ.मेधा सोहनी यांनी केले.
या सोहळ्याला ग्रीन एफ.एम. रेडिओचे पदाधिकारी श्री. राजू पाटील, सौ. रूपा पाटील, श्री. किशोर पटवर्धन (सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक), श्री विलास चौथाई (जिल्हा संघचालक,रा. स्व.संघ सांगली), सामाजिक कार्यकर्त्या सुमेधा चिथडे,पूर्व सैनिक, वीरमाता, सैनिक परिवार आणि सन्माननीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment