*जन्मस्थानाला भेट: ‘श्रीमद् रामायण’ अयोध्येत*
*जन्मस्थानाला भेट: ‘श्रीमद् रामायण’ अयोध्येत*
‘श्रीमद् रामायण’च्या टीमने नुकतीच श्रीरामाच्या जन्मभूमीची, अयोध्येची यात्रा केली. त्यांच्या सर्जनशील प्रवासातील ही एक लक्षणीय घटना होती. या भेटीमुळे त्यांना मालिकेच्या कथेच्या ऐतिहासिक मुळांशी नाते जोडण्याची संधी मिळाली. या सर्व मंडळींनी राम जन्मभूमी, कनक भवन आणि हनुमान गढी या ठिकाणांना भेट दिली आणि या नगराच्या आध्यात्मिक वातावरणाचा आणि ऐतिहासिक महतीचा अनुभव घेतला.
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचे बिझनेस हेड नीरज व्यास यांनी या यात्रेची लक्षणीयता सांगताना म्हटले, “आमची अयोध्या यात्रा प्रभू श्रीरामाची कथा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या निष्ठेचे प्रतीक आहे. श्रीरामाची चिरंतन मूल्ये आणि शिकवण सादर करून आजच्या जगाशी असलेली त्यांची संबद्धता दाखवण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.”
स्वस्तिक प्रॉडक्शन्सचे संस्थापक आणि ‘श्रीमद् रामायण’ चे निर्माते सिद्धार्थ कुमार तिवारी यांनी अयोध्येच्या अनुभवाचा आपल्यावर कसा प्रभाव पडला, हे सांगताना म्हटले, “अयोध्येच्या यात्रेमुळे आमच्या मालिकेला एक सखोलता प्राप्त झाली आहे. या शहराच्या ऐतिहासिक गुंजनाने मालिकेचे वातावरण भारून गेले आहे. त्यामुळे ‘श्रीमद् रामायण’ मालिकेची मांडणी अधिक समृद्ध बनली आहे.”
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाची भूमिका करणारा अभिनेता सुजय रेऊ म्हणतो, “अयोध्येची यात्रा आमुलाग्र बदल घडवणारी होती. या यात्रेमुळे श्रीरामाचे चरित्र आणि त्याविषयीची माझी समज अधिक वाढली आहे आणि त्यामुळे ही व्यक्तिरेखा अधिक प्रामाणिकपणे आणि सखोलतेने साकारण्याची माझी निष्ठा देखील अधिक बळकट झाली आहे.”
माता सीतेची भूमिका करणारी प्राची बन्सल या यात्रेविषयी म्हणते, “प्रत्यक्ष जाऊन अयोध्येचा अनुभव घेणे दैवी स्वरूपाचे होते! सीतेचे सामर्थ्य आणि अलौकिकत्व मला इथे जवळून उमगले.”
लक्ष्मणची भूमिका करणारा बसंत भट्टने आपले विचार व्यक्त करताना म्हटले, “अयोध्येतील चैतन्याने मला लक्ष्मणाची भक्ती आणि निष्ठा समजण्याची वेगळी दृष्टी दिली. हा अनुभव माझ्या भूमिकेसाठी माझे मार्गदर्शन करणारा आहे.”
हनुमानाची भूमिका करत असलेला निर्भय वधावा म्हणतो, “अयोध्येची आध्यात्मिक ऊर्जा स्फूर्तीदायक होती. त्या ठिकाणी मला हनुमानाच्या अढळ श्रद्धेची आणि निष्ठेची महती समजली.”
‘श्रीमद् रामायण’ सुरू होत आहे, 1 जानेवारी 2024 पासून रात्री 9 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर – एक अशी मालिका जी या महान महाकाव्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा मनापासून आदर करते.
Comments
Post a Comment