‘झलक दिखला जा’ मध्ये संगीता फोगाटचे कौतुक करताना मलाइका अरोरा म्हणाली, “तू डान्स करतेस, तेव्हा माझ्या चेहऱ्यावरचे हसू मावळतच नाही”

‘झलक दिखला जा’ मध्ये संगीता फोगाटचे कौतुक करताना मलाइका अरोरा म्हणाली, “तू डान्स करतेस, तेव्हा माझ्या चेहऱ्यावरचे हसू मावळतच नाही”
 
या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘झलक दिखला जा’ या सेलिब्रिटी डान्स रियालिटी शोमध्ये सर्व स्पर्धक नव्या वर्षाचे थाटात स्वागत करताना आपले कसब पणाला लावतील आणि जबरदस्त परफॉर्म करताना दिसतील. या ‘न्यू इयर स्पेशल’ भागात प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे आणि सेलिब्रिटी स्पर्धक कोरिओग्राफर्सच्या ‘अदलाबदली’चे अनोखे आव्हान स्वीकारताना दिसतील. स्पर्धकांची जोडी एका नव्या कोरिओग्राफरसोबत जुळवण्यात येईल. हा नवीन कोरिओग्राफर त्यांना नवीन रूपात आणि नवीन शैलीत सादर करेल आणि त्यांच्या प्रतिभेचा नवीन पैलू प्रेक्षकांना दिसेल. नववर्षाच्या सोहळ्यात सामील होऊन या भागाची रंजकता वाढवण्यासाठी सुपरस्टार सिंगरचे कॅप्टन – पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, सलमान अली, सायली कांबळे आणि मोहम्मद दानिश या भागात विशेष उपस्थिती नोंदवणार आहेत. या भागात एक रोचक ट्विस्ट देखील असणार आहे- ही स्पर्धा आता आणखी तीव्र होणार आहे कारण वाइल्ड कार्ड स्पर्धकांची नावे निर्माते जाहीर करणार आहेत- हे स्पर्धक आहेत – अवेझ दरबार, धनश्री वर्मा, मनीषा रानी आणि निखिता गांधी.
 
‘झलक दिखला जा’ चा ‘डान्सचा आखाडा’ जिंकणारी प्रतिभावान संगीता फोगाट कोरिओग्राफर विवेक चचेरेसोबत ‘चिकनी चमेली’ वर जबरदस्त मूव्ह्ज दाखवून पुन्हा एकदा सर्वांना थक्क करून सोडेल. तिचा तो नवीन ‘अवतार’, तिचे ठुमके आणि अप्रतिम हावभाव यांनी प्रभावित झालेली परीक्षक मलाइका अरोरा संगीताचे कौतुक करताना म्हणाली, “खूप छान नाचली तू. कित्ती गोड दिसतेस तू संगीता! अप्रतिम परफॉर्मन्स! तू उत्तम नाचलीस. मला खूप मजा आली. म्हणजे, तू जेव्हा डान्स करत असतेस तेव्हा माझ्या चेहऱ्यावरचे हसू मुळी मावळतच नाही. मला खूप आवडला हा डान्स.”
 
मलाइकाला पुस्ती जोडत परीक्षक अर्शद वारसी म्हणाला, “तू खूप गोड आणि छान डान्सर आहेस. तू जेव्हा डान्स सुरू करतेस, तेव्हा सुरुवातीला काही क्षण आम्ही स्तब्ध होऊन जातो. तुझ्यातला गोडवा तुझ्या हालचालींत दिसतो. तू जे काही करतेस ते फार गोड दिसते. खूपच गोड. उत्कृष्ट कोरिओग्राफी. विवेक तुला हे छान जमते. तू सेलिब्रिटीच्या स्वभावाला आणि व्यक्तिमत्त्वाला धरून कोरिओग्राफी करतोस. ते पाहताना खूप आनंद मिळतो. खूप मजा आली, शाब्बास!”
 
‘झलक दिखला जा’ मधले चमकदार डान्स परफॉर्मन्स अजिबात चुकवू नका, दर शनिवारी आणि रविवारी रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!
 
‘झलक दिखला जा’ मध्ये फराह खानने शिव ठाकरेचे कौतुक करताना म्हटले, “आज शिव आपल्या अगदी अंतर्मनातील भावनेने नाचला”
 
या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘झलक दिखला जा’ या सेलिब्रिटी डान्स रियालिटी शोमध्ये सर्व स्पर्धक नव्या वर्षाचे थाटात स्वागत करताना आपले कसब पणाला लावतील आणि जबरदस्त परफॉर्म करताना दिसतील. या ‘न्यू इयर स्पेशल’ भागात प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे आणि सेलिब्रिटी स्पर्धक कोरिओग्राफर्सच्या ‘अदलाबदली’चे अनोखे आव्हान स्वीकारताना दिसतील. स्पर्धकांची जोडी एका नव्या कोरिओग्राफरसोबत जुळवण्यात येईल. हा नवीन कोरिओग्राफर त्यांना नवीन रूपात आणि नवीन शैलीत सादर करेल आणि त्यांच्या प्रतिभेचा नवीन पैलू प्रेक्षकांना दिसेल. नववर्षाच्या सोहळ्यात सामील होऊन या भागाची रंजकता वाढवण्यासाठी सुपरस्टार सिंगरचे कॅप्टन – पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, सलमान अली, सायली कांबळे आणि मोहम्मद दानिश या भागात विशेष उपस्थिती नोंदवणार आहेत. या भागात एक रोचक ट्विस्ट देखील असणार आहे- ही स्पर्धा आता आणखी तीव्र होणार आहे कारण वाइल्ड कार्ड स्पर्धकांची नावे निर्माते जाहीर करणार आहेत- हे स्पर्धक आहेत – अवेझ दरबार, धनश्री वर्मा, मनीषा रानी आणि निखिता गांधी.
 
रियालिटी स्टार आणि अमरावतीचा रॉकस्टार शिव ठाकरेची जोडी यावेळेस कोरिओग्राफर अनुराधा अय्यंगर सोबत जुळवण्यात येणार आहे. तिच्यासोबत ‘पहले भी मैं’ गाण्यावर परफॉर्म करून शिव एक डान्सर म्हणून आपले अष्टपैलूत्व दाखवेल. त्याचा तो नेत्रदीपक परफॉर्मन्स पाहून परीक्षक अवाक झालेले दिसतील. हा परफॉर्मन्स पाहून प्रभावित झालेली परीक्षक फराह खान म्हणाली, “आज शिव त्याच्या अगदी अंतर्मनातल्या भावनेने नाचला. आणि अनुराधा, त्याचे थोडे श्रेय मी तुलाही देईन. तू ज्या प्रकारे लिफ्ट्स केलेस, मंचाचा वापर केलास, अभिनय केलास, त्यावरून मी तर म्हणेन की माझ्या दृष्टीने हा तुझा सर्वोत्तम परफॉर्मन्स होता. कारण, मला नेहमी असे वाटते की, शिव सगळ्या गोष्टी विशेष गांभीर्याने घेत नाही पण त्याच्या आत मात्र वेगळेच काही आहे.”
 
परीक्षक मलाइका अरोरा देखील खूप प्रभावित झालेली दिसली. ती म्हणाली, “मला खूप आनंद झाला आहे. मला कंटेंपररी डान्स खूप आवडतो आणि अशा प्रकारच्या परफॉर्मन्समध्ये अनुराधाचा हातखंडा आहे, ज्यात ती एखादी गोष्ट सांगते. मग ते कंटेंपररी असो किंवा लिरीकल, जी खूप चांगली गोष्ट आहे. तिला डान्समधून कथा मांडायला आवडते आणि शिव, तू कंटेंपररी काय सुंदर केलेस! तू खरोखर जबरदस्त दिसलास. मला वाटते, या गाण्यात असे काही तरी होते, ज्यामुळे या भावना तुझ्या परफॉर्मन्समध्ये झिरपल्या! तू मस्त दिसलास. तू जेव्हा परफॉर्म करत होतास, तेव्हा मला एक वेगळाच शिव दिसला आणि मला तो आवडला.”
  
होस्ट ऋत्विक आणि गौहर यांनी एक सुंदर बातमी देऊन सगळ्यांना सर्प्राइज दिले. त्यांनी ही बातमी दिली की, शिवने आपले घर या स्वप्ननगरी मुंबईत हलवले आहे. हा क्षण अधिकच खास होऊन गेला, जेव्हा फराह खानशी खूप दृढ संबंध असलेल्या आणि तिला बहीण मानणाऱ्या शिवने या महत्त्वाच्या स्थित्यंतराच्या प्रसंगी तिचा आशीर्वाद घेतला. आपल्या प्रेमळ आणि दिलदार स्वभावाबद्दल ओळखल्या जाणाऱ्या फराहने शिवला केवळ आशीर्वाद दिले नाहीत, तर या नवीन प्रारंभासाठी गणपती बाप्पाची एक सुंदर मूर्ती त्याला भेट दिली.
 
‘झलक दिखला जा’ मधले चमकदार डान्स परफॉर्मन्स अजिबात चुकवू नका, दर शनिवारी आणि रविवारी रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला