*२५ डिसेंबरला 'चुकभूल द्यावी घ्यावी' नाटकाचा २५वा प्रयोग पुण्यात रंगणार*

*२५ डिसेंबरला 'चुकभूल द्यावी घ्यावी' नाटकाचा २५वा प्रयोग पुण्यात रंगणार*

*अभिनेत्री अक्षया नाईक, अभिनेता अक्षय मुडावदकर या नाटकच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र*
*२५व्या प्रयोगानिमित्त ख़ास पुणेकरांसाठी विशेष ऑफर*

ज्येष्ठ अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांचं गाजलेलं चुकभूल द्यावी घ्यावी हे नाटक पुन्हा नव्या रुपात रंगभूमीवर आले. अभिनेत्री अक्षया नाईक आणि अभिनेता अक्षय मुडावदकर ही नवी जोड़ी या नाटकच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आली आहे.
येत्या सोमवारी म्हणजेच २५ डिसेंबरला  या नाटकाचा २५वा प्रयोग टिळक स्मारक रंगमंदिर पुणे येथे संध्या. ५.३० वाजता रंगणार आहे. या २५व्या प्रयोगानिमित्त "तिकीट काउंटरवर" येणाऱ्या पहिल्या २५ रसिक प्रेक्षकांना एकावर एक तिकीट फ्री देण्यात येणार आहे.    
नाटकाची निर्मिती भूमिका थिएटर्स आणि वाईड अँगल एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे. केतकी प्रवीण कमळे यांनी निर्मिती केलेल्या "चुकभूल द्यावी घ्यावी" नाटकाचं दिग्दर्शन महेश डोकंफोडे यांनी केलं आहे. संदेश बेंद्रे यांनी नेपथ्य, अशोक पत्की यांनी संगीत, अक्षय आणि अभिषेक करंगुटकर यांनी गीतलेखन, शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजना, नेहा मुडावदकर यांनी वेशभूषा, संदीप नगरकर यांनी रंगभूषेची जबाबदारी निभावली आहे. तर अक्षय मुडावदकर, अक्षया नाईक यांच्यासह महेश डोकंफोडे, अमृता तोरडमल यांच्याही नाटकात भूमिका आहेत. 
 
पंचवीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या "चूकभूल द्यावी घ्यावी" या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला होता. अतिशय हलकंफुलकं मनोरंजक असलेल्या नाटकाचं खूप कौतुक झालं. जुनं ते सोनं या म्हणीनुसार प्रेक्षकांना पुन्हा एकदा तोच मनोरंजक अनुभव नव्या रुपात देण्यासाठी या नाटकाची पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. कसदार लेखनाला उत्तम अभिनयाची साथ असल्यानं हे नाटक रसिकांचं नक्कीच पुरेपुर मनोरंजन करेल यात शंका नाही.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष श्री. दीपक माधवराव मानकर यांना विधानपरिषदेची आमदारपदी संधी न दिल्यामुळे पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी दिला सामुहिक राजीनामा

नाटक हा समाजाचा आरसा: पद्मश्री सतीश आळेकर