इंडियन आयडॉल 14 मध्ये बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने ‘रंगीला’ चित्रपटासंबंधी काही रोचक गोष्टी सांगितल्या
इंडियन आयडॉल 14 मध्ये बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने ‘रंगीला’ चित्रपटासंबंधी काही रोचक गोष्टी सांगितल्या
या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 14 या लोकप्रिय गायन रियालिटी शोमध्ये उर्मिला मातोंडकर या बॉलीवूड सुंदरीचे स्वागत करण्यात येणार आहे. ‘सेमी-फाइनल्स विथ उर्मिला’ या विशेष भागात टॉप 6 मध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी सगळे स्पर्धक एकापेक्षा एक सरस कामगिरी करताना दिसतील. हे स्पर्धक चित्रपट उद्योगातील उर्मिलाचा प्रवास दर्शविणारी सुरेल गाणी सादर करतील आणि उर्मिलाला तिच्या सुंदर भूतकाळाच्या सफरीवर घेऊन जातील. भारावलेली उर्मिला आपल्या प्रवासातील काही रोचक किस्से प्रेक्षकांना सांगेल, त्यामुळे हा एपिसोड अवश्य बघा.
शुभदीप दास चौधरी आणि अनन्या पाल या दोघांनी मिळून एक अफलातून परफॉर्मन्स दिला, जो पाहून सर्व जण मंत्रमुग्ध झाले. शुभदीपने ‘हाय रामा’ आणि अनन्याने ‘तनहा तनहा’ आणि ‘हो जा रंगीला’ ही ‘रंगीला’ चित्रपटातील गाणी सादर केली, जी ऐकून उर्मिला थक्क होऊन गेली. त्यांच्या या अप्रतिम परफॉर्मन्सबद्दल सर्व परीक्षकांनी शुभदीप आणि अनन्यावर कौतुकाचा वर्षाव केला आणि त्यांची प्रतिभा आणि त्यांनी घेतलेले परिश्रम याची प्रशंसा केली.
त्यांचा परफॉर्मन्स पाहून भूतकाळात हरवलेल्या उर्मिलाने ‘हाय रामा’ या गाजलेल्या गाण्याशी निगडीत एक किस्सा सांगितला. ती म्हणाली, “हे खूप अवघड गाणे आहे आणि माझ्या मनात या गाण्याला विशेष स्थान आहे. मला या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटते की, हरिहरन सर ज्या बंदिशीचा रियाज करत होते, ती एकदाच ऐकून महान संगीतकार रहमान यांनी आपल्या स्वररचनेत तिला आयत्या वेळी स्थान दिले. हा किस्सा गाणे हे संगीतकार, गायक, निर्माते आणि अभिनेते यांच्या सहयोगाने बनत असते आणि तेव्हाच ते अशी जादू निर्माण करू शकते, याची साक्ष देतो. ‘रंगीला’ची कहाणी मला खूप जवळची वाटते, कारण चित्रपटातून यश मिळवू पाहणाऱ्या एका साध्यासुध्या मुलीची ती गोष्ट आहे, जी माझ्या गोष्टीसारखीच आहे.”
पुढे, रंगीला चित्रपटाविषयी बोलताना उर्मिला म्हणाली, “मी जेव्हा चित्रपटाच्या डबिंगसाठी गेले, तेव्हा मला चित्रपटातला सगळ्यांचा अभिनय बघण्याची संधी मिळाली. मी तिथल्या तिथे आमीरला फॅन लेटर लिहून टाकले, कारण मला हे लक्षात आले होते की, हा चित्रपट प्रदर्शित झाला की, या व्यक्तिरेखेबद्दल आमीरचे खूप कौतुक होणार आहे. त्याने किती सुंदर काम केले आहे हे सगळ्यात आधी आपण त्याला सांगावे असे मला वाटले.”
त्यानंतर उर्मिलाने अनन्यासाठी देखील एक फॅन लेटर लिहिले आणि एक गायक म्हणून तिच्या भावी वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या.
अधिक जाणून घेण्यासाठी बघायला विसरू नका इंडियन आयडॉल सीझन 14 या शनिवारी रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!
Comments
Post a Comment