पुण्यातील सर्वात मोठा फॅशन बॉलर रनवे नाइट

 पुण्यातील सर्वात मोठा फॅशन बॉलर रनवे नाइट



पुण्यात प्रसिद्ध फॅशन क्युरेटर व दिग्दर्शक संदीप धर्मा प्रस्तुत सर्वात मोठा फॅशन बॉलर रनवे नाईट संपन्न


 पुणे -

प्रसिद्ध फॅशन क्युरेटर आणि दिग्दर्शक संदीप धर्मा यांनी पुण्याच्या प्रीमियर क्लब, बल्लर येथे शहरातील बहुप्रतिक्षित फॅशन इव्हेंट, बॉलर रनवे नाइट केला सादर.

  

प्रतिभावान डिझायनर निवेदिता यांच्या उत्कृष्ट कलेक्शनचे प्रदर्शन करून, या कार्यक्रमाने ग्लॅमर आणि शैलीसाठी नवीन मानांकन स्थापित केले.

या बॉलर रनवे नाइट कार्यक्रमात फॅशनप्रेमी, उद्योगसमूह यांचा अनोखा संगम झाला.

 

फॅशन क्युरेशनच्या दूरदर्शी दृष्टिकोनासाठी ओळखल्या जाणाऱ्या संदीप धर्मा यांनी हा मंत्रमुग्ध करणारा फॅशन रनवे नाईट केला असून, यात फॅशनची कलात्मकता आणि सर्जनशीलता येथील रनवे सेटअपवर ट्रेंडिंग कलेक्शनचे अप्रतिम प्रदर्शन 30 मॉडेलसह, दिग्गज आणि सेलिब्रिटींनी जिवंत केली आहे.


फॅशन इंडस्ट्री, बॉलिवूड, बिझनेस आणि राजकीय क्षेत्रातील नामांकित मान्यवरांनी याला उपस्थिती लावल्यामुळे या फॅशन शो चे ग्लॅमर अधिकच वाढले. यावेळी शो स्टॉपर अपारशक्ती खुराणा, प्रसिद्ध फॅशन डिझायनर निवेदिता, सेलिब्रिटी गेस्ट गौरव चोप्रा, फॅशन दिग्दर्शक संदीप धर्मा तसेच या क्लबचे ओनर आर्यन नवले व अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.


 येणाऱ्या काळात फॅशन जग हे यापुढे नवनवीन फॅशन रनवे नाईट याची आतुरतेने वाट पाहील, अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसत होती.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला