प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांच्या हस्ते सुषमा चोरडिया यांना 'ईटी बिजनेस अवॉर्ड २०२३' प्रदान
- Get link
- X
- Other Apps
प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांच्या हस्ते
सुषमा चोरडिया यांना 'ईटी बिजनेस अवॉर्ड २०२३' प्रदान
-------------------------------------------------------------------------------
महिला सक्षमीकरण, समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल
'सूर्यदत्त'च्या सुषमा चोरडिया यांचा अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांच्या हस्ते सन्मान
पुणे : महिला सक्षमीकरण, समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा व सूर्यदत्त वूमन आंत्रप्रेन्युअरशीप अँड लीडरशीप अकॅडमीच्या अध्यक्षा सुषमा चोरडिया यांना 'ईटी बिजनेस अवॉर्ड २०२३' प्रदान करण्यात आला. प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांच्या हस्ते चोरडिया यांना सन्मानित करण्यात आले.
पुण्यातील वेस्टीन हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमावेळी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा उपस्थित होत्या. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने सुषमा चोरडिया यांचे अभिनंदन केले.
अभिनेत्री सान्या मल्होत्रा म्हणाल्या, "सूर्यदत्त संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचे, कौशल्याचे शिक्षण देण्यात तसेच महिला आणि समाजसेवा क्षेत्रात सुषमा चोरडिया उल्लेखनीय काम करत आहेत. परोपकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या सुषमा चोरडिया समाजाच्या भल्यासाठी आणि वंचितांच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम करत आहेत."
सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यदत्त एज्यु-सोशियो कनेक्ट, फूड बँक, नॉलेज बँक, क्लोदिंग बँक, प्रॉडक्ट बँक अंतर्गत विविध स्वयंसेवी कौशल्य आधारित प्रकल्प, जागरूकता कार्यक्रम आणि समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या वंचित वर्गाला मोफत शिक्षण देण्यात येते. समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासह गरीब व गरजू विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करणे आणि कोणताही भेदभाव न करता त्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याच्या, तसेच २००० पेक्षा अधिक नोकरदारांना उच्चशिक्षणासाठी 'लर्न व्हाईल अर्न' अंतर्गत शिष्यवृत्ती, महिला, रेल्वे कुली, रिक्षा ड्रायवर, अशा आर्थिक मागास वर्गातील मुलामुलींना कौशल्य विकासाचे, इंग्रजी भाषा व संगणकाचे प्रशिक्षण देत असल्याबद्दल त्यांना ओळखले जाते.
सूर्यदत्त ग्रुपने सुरू केलेल्या विविध महिला सक्षमीकरण कार्यक्रमांमध्ये चोरडिया यांचा मोलाचा वाटा आहे. गावातील महिलांना शिलाई मशीनचे मोफत वाटप, तसेच शिलाई प्रशिक्षण, मुलांना मोफत कपडे आणि सकस आहाराचे वाटप, महिला तसेच इतरांकरिता आरोग्य तपासणी शिबिरे, आरोग्यविषयक प्रशिक्षण आदी उपक्रमांचा समावेश आहे. नुकताच जल्लोष २०२४ हा दिव्यांग, सामान्य आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या उपक्रमाची दखल अनेक विश्वविक्रमी संस्थांनी घेतली.
सुषमा चोरडिया म्हणाल्या, "सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष होते. विद्यार्थ्यांना सर्वोत्तम आणि सर्वांगीण शिक्षण हेच संस्थेचे ध्येय आहे. रौप्य महोत्सवी वर्षात देशात आणि परदेशात मिळालेले सन्मान ही विशेष आनंददायी बाब आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण, कमवा आणि शिका तसेच शिष्यवृत्तीच्या योजनेतून आर्थिक सहकार्य, स्टार्टअपना संधी देत आहे. नवनवे सामाजिक उपक्रम हाती घेत आहे. या पुरस्काराने आणखी जोमाने काम करण्यास प्रेरणा मिळाली आहे."
------------------
सुषमा चोरडिया म्हणाल्या, "सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष होते. विद्यार्थ्यांना सर्वोत्तम आणि सर्वांगीण शिक्षण हेच संस्थेचे ध्येय आहे. रौप्य महोत्सवी वर्षात देशात आणि परदेशात मिळालेले सन्मान ही विशेष आनंददायी बाब आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण, कमवा आणि शिका तसेच शिष्यवृत्तीच्या योजनेतून आर्थिक सहकार्य, स्टार्टअपना संधी देत आहे. नवनवे सामाजिक उपक्रम हाती घेत आहे. या पुरस्काराने आणखी जोमाने काम करण्यास प्रेरणा मिळाली आहे."
------------------
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment