विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक व हॅन्ड सर्जरी शिबिर ९ व १० मार्चला

 विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक व हॅन्ड सर्जरी शिबिर ९ व १० मार्चला


डॉ. पंकज जिंदल यांची माहिती; अग्रवाल क्लब चॅरिटेबल ट्रस्ट, सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्र यांच्यातर्फे आयोजन


पुणे : अग्रवाल क्लब पुणे चॅरिटेबल ट्रस्ट व सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक अँड हॅन्ड सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (९ मार्च) आणि रविवार (१० मार्च) या दोन दिवशी हे शिबीर सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्र, लवळे, ता. मुळशी, जि. पुणे येथे होणार आहे, अशी माहिती प्रसिद्ध हॅन्डसर्जन डॉ. पंकज जिंदल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रसंगी 'सिम्बायोसिस'च्या डॉ. जयश्री गोरडे, अगरवाल ट्रस्टचे प्रकल्प संचालक उमेश कुमार जालान, राजीव अग्रवाल आदी उपस्थित होते. शिबिराचे हे तेरावे वर्ष आहे. आतापर्यंत जवळपास ५००० व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. डॉ. पंकज जिंदल यांच्यासह प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डॉ. शंकर श्रीनिवासन सुब्रह्मण्यम, डॉ. स्वप्ना आठवले, डॉ. नोएल ब्रिट्टो, डॉ. संजय देव, डॉ. ज्योती देशपांडे, डॉ. पंकज बनसोडे या शिबिरात शस्त्रक्रिया करणार आहेत. 

वाकड्या नाकात सुधारणा, हनुवटीच्या आकारात बदल, गोंदण, मस व चेहऱ्यावरील व्रण, जन्मतः असलेले व्यंग, दुभंगलेले ओठ, वाकडी बोटे, न पसरणारे कोड, अपघाताने आलेल्या विकृती, स्पास्टिक पॅरालिसिस आदी गोष्टींवर प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जरी करण्यात येणार आहेत. या सर्जरीसाठी स्त्री व मुलींना प्राधान्य देण्यात येणार असून, गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. सिम्बायोसिसने आजवर गरिबांसाठी रुग्णसेवा केली आहे. या शिबिरामुळे अनेकांना लाभ होईल, असा विश्वास डॉ. गोरडे यांनी व्यक्त केला.

गरजू रुग्णांनी सर्जरी पूर्व तपासणीसाठी ९ मार्च २०२४ रोजी सकाळी ८ वाजता उपाशी पोटी हजार राहावे. तसेच ७ मार्च २०२४ रोजी पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. सर्जरीसाठी रेशनकार्ड, आधारकार्ड, जुने रिपोर्ट गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी रेवती (७६६६३८१८२७), विनोद (८३२९६४९८१६) किंवा अनिल (७२६२००३२४४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---------------
फोटो ओळ : 
विनामूल्य प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जरी शिबिराविषयी पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. पंकज जिंदल. याप्रसंगी डावीकडून डॉ. जयश्री गोरडे, उमेश जालान, डॉ. पंकज जिंदाल, राजीव अगरवाल उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला