पुण्यात प्रथमच एकाच छताखाली मिळणार पेल्विक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी, कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजी आणि पेडियाट्रिक क्रिटिकल केअर सेवा
पुण्यात प्रथमच एकाच छताखाली मिळणार पेल्विक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी, कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजी आणि पेडियाट्रिक क्रिटिकल केअर सेवा
अंकुरा हॉस्पिटल्समध्ये घेता येणार आधुनिक सुविधांचा लाभ - प्रजनन आणि लैंगिक आरोग्याच्या समस्यावरही उपचार
पुणे - पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल्स येथे पेल्विक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी, कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजी आणि पेडियाट्रिक क्रिटिकल केअर सेवा पुरविल्या जाणार आहेत. याठिकाणी अत्याधुनिक पेडियाट्रिक क्रिटिकल केअर अँड रिट्रीव्हल सेवा सुरू केली. इन्व्हेसिव्ह हेमोडायनामिक मॉनिटरिंग, कार्डियाक सपोर्ट, ब्रेन प्रेशर मॉनिटरिंग, लहान मुलांमधील डायलिसिस सारख्या प्रगत सुविधा पुरविल्या जाणार आहे. या ठिकाणी प्रशिक्षित बालरोगतज्ज्ञ यांद्वारे विशेष सेवा पुरविल्या जातील.
अंकुरा हॉस्पिटल्स येथे पेल्विक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी, कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजी आणि ॲडव्हान्स्ड पेडियाट्रिक क्रिटिकल केअर अँड रिट्रीव्हलमध्ये या विशेष सेवा पुरविणारे हे पहिले सेंटर ठरले आहे. या अत्याधुनिक केंद्रामध्ये वेल वुमन क्लिनिक, पीसीओएस क्लिनिक आणि रजोनिवृत्ती क्लिनिकचा समावेश आहे जे महिलांच्या प्रजनन आणि लैंगिक आरोग्याच्या समस्या दूर करण्यास मदत करेल. पौगंडावस्थेपासून ते रजोनिवृत्तीपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींना याठिकाणी आरोग्य सेवा पुरविल्या जाणार आहेत. प्रगत लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, व्ही-नोट प्रक्रिया आणि पेल्विक समस्यांवर विशेष वैद्यकीय उपचार पुरवित महिलांना एकाच छताखाली या सर्व सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
सर्व वयोगटातील महिलांना पेल्विक समस्या, स्त्रीरोगविषयक समस्या आणि योनीमार्गासंबंधीत समस्यांचा सामना करावा लागतो. पेल्विक भागातील वेदना आणि लघवीवर संयम न राखता येणे, मासिक पाळीची अनियमितता आणि प्रजनन समस्या या सारख्या परिस्थिती दैनंदिन जीवनात व्यत्यय आणू शकतात आणि अस्वस्थता निर्माण करु शकतात. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (PCOS) आणि एंडोमेट्रिओसिस सारख्या समस्या प्रजनन आरोग्यावर दुष्परिणाम करतात. रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांना योनिमार्गासंबंधी तक्रारी आणि पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्ससारख्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन आवश्यक असून यामध्ये महिलांच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्याचा विचार केला जातो. नियमित तपासणी, तज्ञांशी मुक्त संवाद आणि जीवनशैलीतील बदल या समस्या प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यात मदत करू शकतात. पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल्स महिलांसाठी नाविन्यपूर्ण सुविधांनी सज्ज आहे.
डॉ. पंकज सरोदे सांगतात की, पेल्विक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी, कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजी आणि बालरोगांवर एकाच छताखाली उपचार करता येणार आहेत. नव्याने सुरू करण्यात आलेल्या या सुविधेमध्ये सर्व वयोगटातील महिलांसाठी विविवध प्रकारच्या आरोग्य सुविधांचा समावेश आहे. गर्भाशय, योनीमार्ग, ग्रीवा आणि व्हल्व्हर कर्करोगांवरही याठिकाणी प्रभावी उपचार केले जातील. अत्याधुनिक उपचार प्रदान करत सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधांचा लाभ याठिकाणी घेता येणार आहे. याठिकाणी तज्ज्ञ डॅाक्टरांची टिम रुग्णसेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्याचेही डॉ सरोदे यांनी स्पष्ट केले.
गंभीर आजारांनी ग्रस्त मुलांना याठिकाणी विशेष आरोग्य. सेवा पुरविल्या जात असून येथील बालरोग क्रिटिकल केअर युनिट अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि चोवीस तास सुविधा पुरविली जाते हे अंकुरा हॉस्पिटलच्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक आहे. बालरोग क्रिटिकल केअर युनिट हा उपचारासाठीचा बहुविद्याशाखीय दृष्टीकोन आहे. अतिदक्षता विभागापासून ते बालरोग शल्यचिकित्सक आणि बाल मानसोपचार तज्ज्ञांची टीम मुलाच्या आरोग्यासंबंधीच गरजा पूर्ण करण्यासाठी सहकार्याने करत असल्याची प्रतिक्रिया डॉ. चिन्मय जोशी(बालरोग अतिदक्षता विभागाचे प्रमुख आणि अंकुरा पुणेचे वैद्यकीय संचालक) यांनी व्यक्त केली.
कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजी मध्ये हायमेनोप्लास्टी, व्हजायनोप्लास्टी, लॅबियाप्लास्टी, हूडेक्टॉमी आणि मॉन्सप्लास्टी यासारख्या सेवांद्वारे योनीमार्गाचे सौंदर्य टिकविणारे उपचार याठिकाणी उपलब्ध आहेत. महिलांच्या लैंगिक आरोग्यासंबंधीच्या शंकांचे निरसन करून याठिकाणी उत्तम दर्जाचे उपचार पुरविले जाणार असल्याचे डॉ. मधुलिका सिंग( वरिष्ठ सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल,पुणे) यांनी स्पष्ट केले.
रजोनिवृत्तीदरम्यान अनेक महिलांना मधुमेह, फॅटी लिव्हर रोग आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या यासारख्या आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. तरुणींमधील पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) चे वाढते प्रमाण ज्यावर उपचार न केल्यास प्रजनन क्षमतेवर विपरित परिणाम होऊ शकतो. रजोनिवृत्ती आणि पीसीओएस क्लिनिक महिलांच्या शारीरीक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम असल्याचे डॉ सरोदे
यांनी स्पष्ट केले.
Comments
Post a Comment