प्लास्टिक सर्जरी शिबिरातून ३६ रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

 प्लास्टिक सर्जरी शिबिरातून ३६ रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

अग्रवाल क्लब चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने लवळे येथील सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालयात दोन दिवसीय शिबीर




पुणे : अग्रवाल क्लब पुणे चॅरिटेबल ट्रस्ट आणि सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने लवळे येथील रुग्णालयात विनामूल्य प्लास्टिककॉस्मेटिक्स आणि हॅन्ड सर्जरी शिबिर आयोजिले होते. या शिबिरात ३६ रुग्णांवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. शिबिराचे हे बारावे वर्ष होते. या शिबिरात जन्मजात, भाजलेले, अपघातात तुटलेले व मोडलेले, शारीरिक व्यंग नीट करणाऱ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ज्यामुळे रुग्णांना जीवन जगणे अधिक सुकर होणार आहे.


अग्रवाल क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र तुलस्यान, माजी अध्यक्ष व शिबिराचे आयोजक उमेश जालान, प्रकल्प समन्वयक कुंज टिबरेवाल, माजी अध्यक्ष राजीव अग्रवाल यांच्यासह इतर मान्यवर, तर सिम्बायोसिस रुग्णालयाकडून प्रमुख प्रशासक डॉ. जयश्री गोरडे, डॉ. टी विजय सागर, इतर डॉक्टर्सनर्सिंग कर्मचारी यांच्या देखरेखीत हे शिबीर पार पडले.


प्रसिद्ध हॅन्ड सर्जन डॉ. पंकज जिंदल यांच्यासह इतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीत या शस्त्रक्रिया झाल्या. डॉ. जिंदल गेल्या २० वर्षांपासून महाराष्ट्रातील चाळीसगाव, जळगांवजालनाशाहदावडूजशिर्डीरायपुर इत्यादि शहरात अशा शिबिरांचे आयोजन करत आहेत. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांच्या शस्त्रक्रिया करून त्यांचे जीवन सुखकर करण्याचा उद्देश यामागे असल्याचे डॉ. जिंदाल म्हणाले


डॉ. पंकज जिंदाल म्हणाले की, खेड्यापाड्यात राहणाऱ्या रूग्णांना अशा उपचारांची माहिती नसते, तसेच ते परवडणारे नसतात. म्हणून त्यांच्यात उदासीनता, मनोधैर्य कमी होणे, सामान्य दैनंदिन जीवन जगण्याची इच्छा जाणे अशा गोष्टी होतात. समाजाकडूनही ही माणसे उपेक्षित राहतात. या सर्व समस्यांतून सुटका करण्याची सुवर्णसंधी रुग्णांना शिबिराच्या माध्यमातून मिळते. त्यांना सुखी जीवन जगण्याचे साधन मिळते. रुग्णांचा आनंद म्हणजे हे शिबीर यशस्वी झाल्याची पावती मिळते.


Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला