आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील गोकुळनगर, वारजे, पुणे येथील विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील गोकुळनगर, वारजे, पुणे येथील विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहिले. विविध विकास कामांमध्ये गोकुळनगर भागातील १२०० कुटुंबांना पुणे महानगरपालिकेच्या २४/७ या योजनेअंतर्गत घरगुती नळ जोड देणे, याबरोबरच या भागातील मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरण करणे या कामाचा समावेश आहे. यासाठी माजी नगरसेवक सचिन दोडके यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या कामामुळे आगामी काळात या भागातील पाण्याचा व रस्त्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सोपान काका चव्हाण, माजी नगरसेविका सायली वांजळे, सुरेश अण्णा गुजर, विशाल कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment