गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते 
- उपाध्याय प्रवर श्री प्रवीणऋषीजी  
चिंचवड, २६ - संस्कार ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. गुरू ज्यावेळी शिष्यांशी नाते जोडतो त्यावेळी वेगळी निर्मिती होत असते. गुरू शिष्याची साथ कधीही सोडत नाही. असा उपदेश अर्हम विज्जा प्रणेता, उपाध्याय प्रवर श्री प्रवीणऋषीजी यांनी केला. 

श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, चिंचवड यांच्यातर्फे शनिवार २३ ते शुक्रवार, २९ मार्च दरम्यान सुखी धर्म सभामंडप, चिंचवड स्टेशन येथे 'पवित्र होळी पंच दिवसीय चातुर्मास 'चे आयोजन करण्यात आले असून, त्यात सकाळच्या प्रवचन सत्रात राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद ऋषीजी यांचे शिष्य अर्हम विज्जा प्रणेता, उपाध्याय प्रवर श्री प्रवीणऋषीजी बोलत होते. या प्रवचनासाठी पिंपरी-चिंचवड, पुणे महानगरासह पूर्ण राज्यभरातून भाविक दर्शन व प्रवचनासाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. 

२८ मार्च रोजी राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी यांच्या ३२ व्या आनंद स्मृती दिनानिमित्त गुरुमंत्र दीक्षा कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या विशेष पार्श्वभूमीवर श्री प्रवीणऋषीजी यांनी आपल्या प्रवचानात त्यांचे जीवनकार्य, तत्त्व, प्रेरणादायी प्रसंग आपल्या ओघवत्या शैलीत मांडले व त्यांच्या विविध आठवणींना त्यांनी प्रवचानादरम्यान उजाळा देत आहेत.

पाल्यांसाठी आई- वडील व गुरूचे सान्निध्य फार महत्त्वाचे असते. हा सहवास मुलांना मिळायला हवा. तो संस्कार मिळायला हवा, अशी गरज त्यांनी व्यक्त केली. दानाचे महत्त्व समजावून सांगताना श्री प्रवीणऋषीजी म्हणाले की, जे मला मिळू शकले नाही, ते इतरांना देण्याचा प्रयत्न करा. आपल्याला न मिळण्याच्या पीडेपासून मला मुक्त व्हायचे आहे, आणि ते दुखः इतरांच्या वाट्याला येवू देवू नका. 

मनुष्य जन्म हा समाधान शोधण्यासाठी आहे. समस्या आव्हाने, सहन करणे हा धर्म नाही, त्यावर उपाय शोधणे, त्यासाठी प्रयत्न करणे हा धर्म आहे. समस्या, संकटावर समाधान, उपाय शोधणाऱ्या तो आत्मविश्वास देणाऱ्या धर्मावर श्रद्धा असायला हवी असा उपदेश देखील यावेळी श्री प्रवीणऋषीजी केला. 

२४ मार्च ते २८ मार्च दरम्यान पाच दिवसीय विशेष सामायिक दिन, एकासना दिन, आनंद गुरवे नमः जाप, दया दिन आणि आयंबिल दिन साजरा करण्यात येणार आहे. या दरम्यान कार्यक्रम स्थळी विविध शिबिरे, प्रवचन जिनवणी, गौतम निधी परिवार संमेलन, आनंदगाथा प्रवचन, गौतम प्रसादी, गौतमनिधी कलश वितरण अनुष्ठान, अर्हम नाईट्स, अर्हम विज्जा इत्यादी कार्यक्रमा होणार आहेत. 
..

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला