प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न साकार करणार, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडकडून मिळणार शिष्यवृत्ती

 प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न साकार करणार, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडकडून मिळणार शिष्यवृत्ती







·       . वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि फाउंडेशन अभ्यासक्रमांसाठी 90% पर्यंत शिष्यवृत्ती 



•        शहीद जवानांच्या मुलांसाठी 100% शिक्षण शुल्क माफ करणार


•        संरक्षण कर्मचारी, सुरक्षा एजन्सी आणि दहशतवादाने प्रभावित व्यक्तींच्या मुलांसाठी विशेष शिष्यवृत्ती


•        2014 पासून 75,000 हून अधिक विद्यार्थ्यानी घेतला या उपक्रमाचा लाभ.


आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) ने स्पर्धा परीक्षेची तयारी करुन घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरी नामांकीत संस्था असून या संस्थेने विद्यार्थ्यांच्या मनात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. एप्रिल 2024 मध्ये नवीन सत्र सुरू होण्यापूर्वी या संस्थेकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे की ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर आणि अभियंता बनण्याची स्वप्ने पाहिली आहे अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.



यामध्ये पहिली शिष्यवृत्ती म्हणजे इन्स्टंट ॲडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट (IACST) जी वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि पायाभूत अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 90% पर्यंत शिष्यवृत्ती देते. याशिवाय शहीद जवान, संरक्षण कर्मचारी आणि दहशतवादग्रस्त व्यक्तींच्या मुलांना विशेष सवलत दिली जाणार आहे.आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे मुख्य व्यावसायिक अधिकारी श्री अनूप अग्रवाल सांगतात की, आम्ही भारतभरातील ताळागाळातील विद्यार्थ्यांना प्रभावी शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. इन्स्टंट ॲडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट (IACST) सारख्या उपक्रमांद्वारे आणि आमच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमांद्वारे, पात्र विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धा परीक्षेसाठि सक्षम करणार आहोत. जवानांच्या मुलांच्या शिक्षणाला पाठिंबा देण्याची आमची परंपरा सुरू ठेवत शिक्षणक्षेत्रात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आम्हाला याचा अभिमा असूम अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकर घेऊ.


इन्स्टंट ॲडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट (iACST) विद्यार्थ्यांना झटपट शिष्यवृत्ती पुरस्कार आणि तत्काळ प्रवेशाच्या संधी उपलब्ध करुन देते. याठिकाणी विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देऊन त्यांच्या ज्ञानाच्या बळावर त्वरित शिष्यवृत्ती मिळवू शकतात. ज्यामुळे त्यांना आकाश फॅकल्टीच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली त्वरित प्रवेशही मिळू शकतो. ऑनलाइन इन्स्टंट ॲडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट (iACST) ही  60 मिनिटे चालणारी परीक्षा नियोजित दिवशी  सकाळी 10 ते रात्री 8 दरम्यान घेतली जाऊ शकते.


इन्स्टंट ॲडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट (iACST)  हे इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीमधील करिअरची क्षमता तपासण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ म्हणून ठरते. वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि फाउंडेशन क्लास अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी IACST मार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरते. इन्स्टंट ॲडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट (iACST)  ही संगणक-आधारित चाचणी (CBT)  तसेच वेबसाइट आणि ॲंडरॅाईड आणि ॲपल या दोन्हींमध्ये कार्यरत आहे.


शिष्यवृत्ती उपक्रमांव्यतिरिक्त, एईएसएल संरक्षण कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणास पाठींबा देऊन सामाजिक जबाबदारीसाठी पेलण्याचे धाडस या संस्थेच्या वतीने दाखविण्यात आले आहे. आकाश शहीद जवानांच्या मुलांना 100% पर्यंत शिक्षण शुल्क माफ करते. त्याचप्रमाणे संरक्षण कर्मचारी आणि दहशतवाद प्रभावित व्यक्तींच्या मुलांना त्यांच्या IACST स्कोअर व्यतिरिक्त 10% अतिरिक्त सूट दिली जाईल. 2014 पासून 75,000 हून अधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे.


आकाशने नुकतेच जेईई मेन 2024 सत्र 1 मध्ये यशाचे शिखर गाठले असून संस्थेचे 41,263 विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले. उल्लेखनीय कामगिरीमध्ये 4,198 विद्यार्थ्यांनी 95 आणि त्याहून अधिक टक्केवारी मिळविली आहे, तर 939 विद्यार्थ्यांनी 99 टक्क्याहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. हैदराबाद येथील ऋषी शेखर शुक्ला यांनी 100 टक्के, कर्नाल येथील अभिराज सिंग, तिरुनेलवेली येथील श्री राम ए आणि हैदराबाद येथील विश्वनाथ केएस यांनी 99.99 टक्के मिळविले आहे.


क्लासरूम कोर्सच्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त, आकाशच्या डिजिटल प्रोग्रामच्या विद्यार्थ्यांनी जेईई मेन 2024 (सत्र-01) मध्ये उत्तम गुण मिळविले आहेत ज्यात रितम बॅनर्जी याने गणितात 99.96 टक्के गुण मिळवले तर रसायनशास्त्रात अरहा साहूने 99.910 टक्के गुण मिळवले. रसायनशास्त्रात धृतिशमन दत्ता 99.87, हरीश कुमार 99.86, ईश्वरवंत 99.86 टक्के रसायनशास्त्रात 100 टक्के, इशांत पटेल 99.85 टक्के, सायन मंडल 99.82, जेन जोन्स 99.78, सृजन गुप्ता 99.78, सृजन गुप्ता 79.9 , दिलीप कुमारA 99.70, रक्षित मोदी 99.67 ने 99+ टक्के एनटीए स्कोअर मिळवला आरे. शिवाय जेईई (ईडी) 2023 मध्ये, आकाश बायजूच्या डिजिटल प्रोग्रामचा विद्यार्थी मयंक सोनी याने एआयआर -26 (ओबीसी श्रेणीत दुसरा क्रमांक) मिळवला आहे. 


नीट युजी परीक्षा 2023 मध्ये, आकाश मधील 1,06,870 विद्यार्थी पात्र ठरले, त्यापैकी 17 राज्य/युटी टॉपर्स ठरले. एआयआर 03 कौस्तव बौरी, एआयआर 05 ध्रुव अडवाणी, एआयआर 06 सूर्य सिद्धार्थ नागराजन, एआयआर 08 स्वयं शक्ती त्रिपाठी आणि एआयआर 10 पार्थ खंडेलवाल यांचा यात समावेश होता.


Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला