साधू वासवानी मिशन मेडिकल कॉम्प्लेक्सला 'पुणे राउंड टेबल इंडिया १०५'कडून अँब्युलन्स

 साधू वासवानी मिशन मेडिकल कॉम्प्लेक्सला

'पुणे राउंड टेबल इंडिया १०५'कडून अँब्युलन्स



पुणे : पूना रिव्हरसाईड राउंड टेबल इंडिया १०५ (पीआरआरटी १०५) कडून साधू वासवानी मिशन्स मेडिकल कॉम्प्लेक्सला अँब्युलन्स खरेदीसाठी जवळपास आठ लाखांचे अर्थसहाय्य करण्यात आले. समाजातील गरीब व गरजू रुग्णांना साधू वासवानी मिशनच्या माध्यमातून वेळेवर आरोग्य सुविधा पुरवणे या अँब्युलन्समुळे शक्य होणार आहे.

नुकतीच ही अँब्युलन्स संस्थेकडे सुपूर्त करण्यात आली. यावेळी 'पीआरआरटी १०५'चे चेअरमन परेश लोढा, वरिष्ठ सदस्य राजेश भारतिया, अर्थसहाय्य देणारे चिराग देढिया, सुजाता कम्प्युटर्सचे डॉ. सुमतीलाल लोढा, साधू वासवानी मिशनचे महाव्यवस्थापक सुंदर वासवानी आदी उपस्थित होते.

राजेश भारतिया म्हणाले, "राउंड टेबल इंडिया ही संस्था समर्पित व प्रामाणिक भावनेतून समाजाची सेवा करत आहे. विविध प्रकल्पातून समाजातील गरजा ओळखून वंचितांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही काम करत असतो. 'फ्रिडम थ्रू एज्युकेशन' व 'एचईएएल' या उपक्रमांतून शिक्षण व अन्य क्षेत्राला सक्षम करण्याचे काम सुरु आहे. देशाच्या विविध भागात पसरलेल्या या संस्थेच्या मार्फत हजारो लोकांचे जीवनमान आजवर उंचावले गेले आहे. एकत्रितपणे भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षण व आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान दिले जात आहे."

Comments

Popular posts from this blog

*नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती**आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक*

गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते

रिअल इस्टेटचा व्यवसाय भविष्यात आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करणार - दर्शन चावला