बहुजनांना न्याय मिळण्यासाठी ‘परिवर्तन’ चा सर्वे
९५ टक्के मतदातांचा ईव्हीएमवर विश्वास नाही
बहुजनांना न्याय मिळण्यासाठी ‘परिवर्तन’ चा सर्वे
बसपा, वीबीए व भारिप पक्षांना अचूक रणनिती आखण्यास ठरेल उपयुक्त
पुणे, दि. २९ मार्च: लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाजाच्या प्रवर्गातील स्वयंप्रचेरित सामाजिक कार्यकर्त्यांच्या परिवर्तन संघटनेने बहुजन समाजांच्या गंभीर समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने नुकताच ऑनलाइन सर्वे केला. हा सर्वे नुसार ९५ टक्के मतदातांना ईव्हीएमवर विश्वास नाही. निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूकीसाठी पारंपारिक मतपत्रिका निवडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच बहुजन समाज पार्टी (बसपा), वंचित बहुजन आघाडी (वीबीए), आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष(भारिप) यांना अचूक रणनिती आखण्यास हा सर्वे उपयुक्त ठरू शकेल. अशी माहिती अॅड. अरूण कुमार डोळस, इनक्राफ्ट टेक्नॉलॉजीज प्रा.लि.चे पंकज जाधव व दत्तात्रय गोरखे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अॅड. अरूण कुमार डोळस यांनी सांगितले की, सर्वेनुसार सात प्रमुख निष्कर्ष काढण्यात आले आहेत. यानुसार युतीच्या रणनितीबाबतः वीबीए, बसपा आणि भारिप (आ) पक्षांनी इंडिया गटाबरोबर युती करावी. सर्वेनुसार ६३ टक्यांना वाटते की, वीबीए आणि इंडिया गटात युती व्हावी. ६२ टक्के सहभागीदारांना बसपा आणि भारत यांच्यात युती अपेक्षित आहे. तर ५२ टक्के सहभागीदार भारिप (आ) आणि इंडिया गटात युतीची अपेक्षा करतात.
बहुजन समाजाच्या मतदारांच्या पसंती बाबतः ४९ टक्के (सर्वोच्च) सहभागीदारांनी सूचित केले की बहुजन समाजाचे प्रतिनिधत्व करणार्या राजकीय पक्षांची एनडीए किंवा इंडिया या दोन गटांपैकी एका बरोबर युती व्हावी. अन्यथा मतदान करताना वीबीए त्यांचा सर्वाधिक पसंतीचा पक्ष असेल. ३१ टक्के सहभागीदरांनी अशा परिस्थितीत मत देताना इंडिया गटाला पसंती दर्शवली. बहुजन समाजातील नागरिकांमध्ये वीबीएची वाढती लोकप्रियता तसेच राज्यात इंडिया व वीबीए मध्ये युतीची गरज दर्शवते.
मतदान माध्यमाला प्राधान्य देण्याबाबतः ९५ टक्के लोकांचा मतदानाचे साधन किंवा माध्यम ईव्हीएमवर विश्वास नाही. निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी ईव्हीएमपेक्षा पारंपारिक मतपत्रिका निवडण्याची इच्छा आहे.
एकतेच्या निर्मितीतील अडथळ्यांविषयीः ६१ टक्के सहभागीदारांना वाटते की महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीत वीबीए आणि बसपा एका पक्षात एकत्र येऊ शकतात. ५९ टक्के सहभागीदारांनी वीबीए व भारिप (आ) यांच्यात ऐक्य होण्याची इच्छा व्यक्त केली. ५४ टक्के सहभागीदाराना बसपा, वीबीए आणि भारिप (आ) हे तिन्ही प्रमुख पक्ष, सध्या एकत्रित येण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. तर ६० टक्के सहभागीदारांना बसपा आणि भारिप (आ) यांच्यात ऐक्याची शक्यता दिसत नाही.
एकतेच्या निर्मितीतील अडथळ्यांविषयीः या सर्वेक्षणात नेत्यांचा अहंकार (२५ टक्के) स्वार्थ (२३ टक्के) आणि परस्पर विश्वासाचा अभावा (१५ टक्के) हे प्रमुख अडथळे दूर केले तर बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणार्या पक्षांच एकत्रीकरण शक्य आहे.
बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणार्या राजकीय पक्षांमधील ऐक्याबाबतः सर्वेतील ५५ टक्क्यांचा विश्वास आहे की बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणारे सर्व राजकीय पक्ष त्यांच्यात ऐतिहासिक मतभेद आहेत. त्यांना एकत्रित करण्याचे भूतकाळातील प्रयत्न अयशस्वी होऊनही एकत्र येऊ शकतात. तरूण म्हणजे ३८ वर्षे वयापर्यंतच्या ६५ टक्के स्त्रिया आणि ६२ टक्के पुरूष एकजूट होण्याविषयी अधिक आशावादी आहेत. ७७ टक्क्यांना मोठ्या गटाला या पक्षांनी एकत्र येऊन एक मजबूत राजकीय पक्ष उभारावा अस वाटतं.
राजकीय पटला बाबतः यात असे दिसते की बहुजन समाज भारताच्या लोकसंख्येच्या ८० टक्के पेक्षा अधिक आहे. तरीही त्यांच्या मतांचे विविध राजकीय पक्षांमध्ये विभाजन होत असल्याने त्यांचे प्रतिनिधित्व करणारा कोणताही मोठा राजकीय पक्ष केंद्रात किंवा महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार नाही.
सर्वे संदर्भात विस्तृत माहितीः
बहुजन समाजाच्या एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील स्वयंप्रेरित सामाजिक कार्यकर्त्यांच्या परिवर्तन या अनौपचारिक संघटनेने केलेला हा सर्वे आहे. १४ फेब्रुवारी ते २४ मार्च या कालावधित चाललेल्या सर्वेत बहुजन समाजातील १०२३ महाराष्ट्रीयन व्यक्तींनी प्रतिसाद दिला. या सर्वेत ५ विभागात ५० प्रश्न विचारण्यात आले. येणार्या निवडणुकीचे निकष लक्षात घेता युती, बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणार्या राजकीय पक्षांमधील एकता, ईव्हीएम, इत्यादींशी थेट संबंधित असलेल्या १४ प्रश्नांचे निष्कर्ष आहे.
Comments
Post a Comment